मराठी संपूर्ण डॉट कॉमविषयी
"मराठी संपूर्ण " या ब्लॉगविषयी लिहिताना अत्यानंद होत आहे की, माझ्या सर्व मराठी रसिकांना गाव पातळीपासून शहरापर्यंत सर्वसामान्य पासून मोठ्या साहित्यिक अधिकारी यांना रुचेल अशा सोप्या शब्दात नवीन नवीन विचार आणि प्रत्येक मराठी संस्कृतीतील सण ,उत्सव, जयंती ,पुण्यतिथी, दिनविशेष ,थोर व्यक्ती आपली ग्रामसंस्कृती, आपल्या दैनंदिन जीवनातील वाटचाल आणि विशेष म्हणजे आपले असणारे इतरांशी नातेसंबंध या सगळ्या गोष्टींचा उलगडा या आपल्या ब्लॉगमधून होत आहे.
म्हणून हा ब्लॉग लिहिताना संतांनी मराठीविषयी आपले कोडकौतुक केले तेच आज आपल्याला मराठी जिवंत ठेवण्यासाठी अशा या "मराठी संपूर्ण " ब्लॉगमधून आपणाला ते देत आहोत.
माझा मराठाची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
हे ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीविषयी असलेला अभिमान दिसत आहे. खरोखरच "मी मराठी " या शब्दात किती अभिमान दडलेला आहे हे संत ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये बोललेले वाक्य जर आपणही आज उच्चारले तर रोमारोमात आपली मराठी संचारते .म्हणून आज लोकांच्या मनात मराठी "जगते की मरते" अशी जी द्विधा अवस्था निर्माण झाली आहे ती अवस्था काढून टाकण्यासाठी "मराठी संपूर्ण " ह्या ब्लॉगवर आपण जर नित्य वाचन केले तर नवनवीन घडामोडी, ग्रामीण बोली, मराठी मातीतील संस्कृती पाहता आपल्यासमोर मांडताना आनंद होत आहे की, ज्या ज्या शब्दांचा उल्लेख पुढच्या पिढीला कधीही ऐकायला मिळणार नाही असे शब्द या ब्लॉगमधून मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझं भाग्य आहे की मी महाराष्ट्रामध्ये जन्मलो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये राहून मला खरोखर मराठी ही एक अभिमानाची आणि जगण्याची उमेद देणारी अशी भाषा आहे. एकमेकांविषयी आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपली मातृभाषा मराठी आहे आणि या मराठीविषयी असणारे विचार आजच्या युगात इंग्रजीला महत्त्व असले तरीही आपल्या मराठीचे महत्त्व कमी होऊ द्यायचे नाही,
ही प्रत्येक मराठी भाषिकांची जबाबदारी आहे ,कारण आपण सहज घराबाहेर गेलो तरी हिंदी भाषेत किंवा इंग्रजी भाषेचा वापर न करता जाणून-बुजून आपण मराठीच शब्द वापरले तर आपण कुठेतरी मराठी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत,याचे समाधान खूप मोठे आहे .यासाठी आपल्यामध्ये मराठीविषयी अस्मिता असावी लागते म्हणून आपल्यासाठी हा ब्लॉग घेऊन येत आहोत की जेणेकरून शैक्षणिक दृष्ट्या, स्पर्धा परीक्षासाठी आणि काळाच्या ओघात बोली भाषेतील दुर्मिळ शब्द, म्हणी याचा विचार आपल्या समोर मांडताना आनंद वाटत आहे की हे जरी शब्द ऐकायला येत नसतील,तरीही या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार याची मी ग्वाही देतो.
मित्रांनो या ब्लॉगविषयी तुम्हाला नक्कीच आवड निर्माण होईल अशा पद्धतीचे माझ्याकडून लेखन करून घेण्यासाठी तुमच्या कृपाशीर्वादाची अत्यंत गरज आहे. ईश्वर कृपेने हा ब्लॉग तयार करण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असून मला तुमच्यापर्यंत " संपूर्ण मराठी " विषयज्ञान आहे ते पोहचविण्याचे महतभाग्य लाभले यातच माझे सार्थक समजतो. आणि आपली सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली हेच मी सद्भाग्य समजून माझ्या या विचाराला तुमच्यापर्यंत पोहचवत आहे.
माझ्याबद्दल
श्री मल्हारी विठ्ठल जाधव माध्यमिक शिक्षक अध्यापन अनुभव -13 वर्षे शिक्षण : एम.ए.मराठी नेट, शिक्षणशास्त्र सेट , एम.ए.तत्त्वज्ञान . |