उभयान्वयी अव्यय मराठी | ubhayanvayi avyay marathi

उभयान्वयी अव्यय मराठी | ubhayanvayi avyay marathi 

 

 आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या लेखामध्ये आपण उभयान्वयी अव्यय (Ubhayanvayi avyay) या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

       

उभयान्वयी अव्यय ubhayanvayi avyay
उभयान्वयी अव्यय

 

        शब्द

     विकारी  (सव्यय)                  अविकारी ( अव्यय)

     नाम                                                     क्रियाविशेषण अव्यय 

     सर्वनाम                                                 शब्दयोगी अव्यय 

     विशेषण                                                उभयान्वयी अव्यय 

     क्रियापद                                               केवलप्रयोगी अव्यय 

उभयान्वयी अव्यय(toc)

1 ) विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay)

ज्या शब्दांचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.

 

2) अविकारी शब्द (अव्यय)

लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही वाक्यात बदल होत नाही, त्यास अविकारी शब्द असे म्हणतात.

 

अव्यय समजून घेऊ 

 

शब्दांच्या जातीमध्ये आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती आठ आहेत हे पाहिले .त्यापैकी आपण सव्यय  आणि अव्यय यांची विभागणी पाहिली. तसेच नाम,सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार जातींची (सव्ययांची) माहिती अभ्यासली वचन, लिंग, पुरुष ,विभक्ती ,काळ-अर्थ यांच्यामुळे  चार जातीच्या शब्दांच्या रूपात बदल होत असतो हे आपण अभ्यासले. 

 

शब्दांच्या जाती पैकी क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी ,केवलप्रयोगी या चार जाती अशा आहेत की त्यांना विभक्ती, लिंग, वचन यांचे प्रत्यय लागत नाहीत . त्यांच्या रूपात कोणताच बदल होत नाही. त्या जशाच्या तशाच  राहत असतात. त्यांचा व्यय होत नाही . वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापद यांचे लिंग, वचन ,पुरुष जरी बदलले तरी त्यांची रूपे जशी आहेत तशीच राहतात; म्हणजेच त्यांचा व्यय  होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात. 

 

वाचा👉 शब्दांच्या जाती सविस्तर 

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय अर्थ :

 दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार

१) प्रधानत्चसुचक ( संयुक्त वाक्य)

समुच्चयबोधक 

विकल्पबोधक 

न्युनत्वबोधक 

 परिणाम बोधक

2 ) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रधानत्चसुचक उभयान्वयी अव्यय

अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्य प्रधान वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्य म्हणतात.

जर एखाद्या उभयान्वयी अव्ययाने दोन शब्द एकत्र जोडले तर ते एकाच जातीचे असतात.

वाचा 👉मराठी  वर्णमाला 

१) समुच्चय बोधक

या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते.

उदा. आणि, व, आणखी, अन, न, शिवाय, नि, आणिक 

वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली

श्यामने काटे घेतली व मांजराला मारली

मी आज भजी आणि वड्या आणलेत

मी गुरुदेवांच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली.

(व, आणि कधी कधी दोन वाक्यात येतात.)

केवल वाक्य : सचिन आणि महेंद्रसिंह क्रिकेट खेळतात.

संयुक्त वाक्य : सचिनने भरपूर अभ्यास केला व पास झाला.

 

वाचा👉 विशेषण व त्याचे प्रकार 

२) विकल्प बोधक:

 या उभयान्वयी अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते.

उदा. अथवा, वा, की, किंवा ,अगर इ.

तुला च्या हवा की नाश्ता?

देह जावो अथवा राहो.

मी किंवा माझी मुलगी या अर्जावर सही करेल.

३) न्यूनत्वबोधक

न्यूनत्च या शब्दाचा अर्थ कमीपणा असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते.

उदा. परंतु, पण ,बाकी, किंतु, परी इ.

-तिने अभ्यास केला, परंतु नापास झाली.

-तिने स्वयंपाक करून ठेवला पण पाहुणे आलेच नाहीत.

-मरावे, परी कीर्ती रूपे उरावे. -बाबांना थोडा ताप होता, बाकी सर्व ठीक.

४) परिणाम बोधक: 

पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो.

उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव , याकरिता ,तस्मात, तेंव्हा, की. इ.

-पाऊस पडत होता; म्हणून तो शाळेत आला नाही.

-त्याने मनापासून अभ्यास केला नाही; सबब तिला पहिला वर्ग मिळाला नाही.

2 ) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

 ह्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ( प्रधान वाक्य ) ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो.

१) स्वरूपबोधक

या उभयान्वयी अव्ययाने मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे स्पष्ट करणारे गौण वाक्य जोडले जाते.

(स्वरूप दर्शवणारे वाक्य गौण वाक्य असते.)

उदा. म्हणून ,म्हणजे, की, जे, इ.

-संभाजी म्हणून शिवाजी एक पुत्र होता.

-एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.

-गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे.

२) उद्देशबोधक :

 प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश गौण वाक्यातून दर्शविला जातो.

उदा. म्हणून ,सबब, यास्तव,कारण ,की, इ.

-चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करतो.

-त्याला दिल्लीला जायचे आहे; सबब तो शाळेला येणार नाही.

-चांगले आरोग्य मिळावेत ;जास्त तो शहरात जात आहे.

( स्पष्टीकरण कोणाचा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले तर ते मिश्र वाक्य असते; परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते.

उदा. रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला (मिश्र वाक्य)

-आमचे शरीर सुदृढ व्हावे; म्हणून आम्ही व्यायाम करतो ( मिश्र वाक्य)

-तिला ताप आला ‘म्हणून तो शाळेत गेला नाही. (संयुक्त वाक्य)

३) संकेतबोधक

 गौणवाक्यात अट संकेत दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो.

उदा . जर -, म्हणजे, की, तर

-जर अभ्यास केला, तर पास व्हाल.

-पास झालो की, पेढे वाटेल.

– तुम्ही इशारा केलास, की मी येईन.

[ यातील अट दर्शवणारे वाक्य सामान्यपणे गौण वाक्य असते.]

४) कारण बोधक:

 या प्रकारात प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शविणारे गौणवाक्य जोडणाऱ्या उभयान्वये अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

उदा . कारण, का-की

-त्याला शिक्षा झाली; कारण त्याने चोरी केली.

– भारताने सामना जिंकला; कारण खेळाडूंनी चांगला खेळ केला.

( मूळ उभयान्वयी अव्ययाव्यतिरिक्त सर्वनामे, क्रियाविशेषणे यांचा सुद्धा उभायान्वयी अव्ययाप्रमाणे वापर होतो.

उदा. जो -, जेथे-तेथे, जेव्हा-तेव्हा जसे-तसे, ज्याला-त्याला  इ .

– जसे करावे तसे भरावे

-जेथे पाणी खोल होते, तेथे जहाज बुडाले.

-जेव्हा पाऊस आला, तेव्हा मोर नाचू लागला.

जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात.

 

आणखी वाचा

मराठी शुद्धलेखनाचे नियम

भारत देशाची माहिती

संधी व त्याचे प्रकार

मराठी भाषेचा उगम

विभक्ती व त्याचे प्रकार

   

 

Leave a Comment