संत ज्ञानेश्वर महाराज| sant dnyaneshwar maharaj
संत ज्ञानेश्वर महाराज
वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे संत ज्ञानेश्वर हे असून त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला . संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती आपण पाहूया
नाव: संत ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी जन्म आपेगाव विशेषण १२००७५ शालिवाहन शके 1197
संजीवन समाधी : 2 डिसेंबर इ .स. 1296, शालिवाहन शके 1217
हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर ,ज्ञानदेव आणि माऊली या नावाने ओळखले जाते .ज्ञानेश्वर महाराज हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते.
फक्त 16 वर्षाच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य )आणि अमृताअनुभव या ग्रंथाची रचना केली .या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.
संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला.त्यांच्या विचाराने एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यासारख्या संत कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील वारकरी भक्ती परंपरेचे संस्थापक मानले जातात.
ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण
ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७ इसवी सन १२७५ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ व सोपान देव मुक्ताबाई हे धाकटी भावंडे त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५ ११९९ व 1201 मध्ये झाला .
आपेगाव हे ठिकाण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गाव आहे. ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्याशी होते. विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला निघून गेले गुरूंना विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांना परत पाठवले . गुरूंच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली .निवृत्तीनाथ ,ज्ञानदेव ,सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.विठ्ठलपंत चालता चालता यात्रा करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्याकाळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हटाळणी करत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ काढावा लागला .ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले .
त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारल्यावर त्यावर केवळ देह दंडाचीच शिक्षा असे ब्राह्मणांनी सांगितले .
मुले संस्कारापासून वंचित राहो नयेत व त्यांचे पुढे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणी बाईंनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित घेतले .आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास झाला त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींना त्यांनी नाकारले गेले. पुढेही भावंडे पैठणला गेले आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वर यांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आणि भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणारे या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्रज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दु:खी होत. त्यांनी विचार केला की आई-वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे हे योग्य नाही .शेवटी 1288 साली पैठणमधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात सम्मिलित केले.
ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन
ज्ञानेश्वर यांच्या सुमारे 21 वर्षाच्या अल्फा आयुष्यातील चरित्रात्मक तपशिलाबद्दल वाद आहे आणि त्याची सत्यता संशयास्पद आहे रेड्याला वेद वदवण्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यासारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्काराने उपलब्ध साहित्य भरपूर आहे.
जे साहित्य उपलब्ध आहे त्या उपलब्ध साहित्यानुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठी असलेले आपेगाव गावातील कुलकर्णी होते .कुलकर्णी हे लेखापाल असायचे .जे सहसा ब्राह्मण होते ते गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत. हा वारसा त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाला होता आणि या विठ्ठलपंत यांचा विवाह आळंदीच्या कुलकर्णी यांची कन्या रखमाबाई यांच्याशी झाला
त्यांना आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती .बरेच दिवस लग्न होऊन मूल न झाल्यामुळे आणि वडिलांच्या मृत्युमुळे जीवनाबद्दलचा भ्रम वाढला.आपल्या पत्नीचे रुक्माई यांची परवानगी घेऊन संसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्याशी होण्यासाठी ते काशीला निघून गेले.
विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरू रामा शर्मा यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली.
जेव्हा रामाश्रयाला समजले की विठ्ठलपंतांनी आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे .तेव्हा त्यांनी विठ्ठलपंत यांनी आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ आश्रम स्वीकारण्याचे आणि आपले कर्तव्य पार पाडण्याची सूचना केली .विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रुक्माईबाईंनी चार मुलांना जन्म दिला.
निवृत्तीनाथ 1273, ज्ञानेश्र्वर 1275, सोपान 1277 आणि मुक्ताबाई 1279
तत्कालीन ऑर्थोडोक्स ब्राह्मणांनुसार हे घटना म्हणजे एक संन्याशी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्ताच्या रूपात परतली होती .ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ' धागा समारंभ' घेण्याचा अधिकार त्यांनी नाकारला होता .याचा अर्थ ब्राह्मण जातीतून बहिष्कार असा मानला जात असे.
म्हणून विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह नाशिकला गेले एक दिवस त्यांचा नित्य विधी करत असताना विठ्ठल पंतांचा सामना वाघाशी झाला. विठ्ठलपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले पळून गेली परंतु निवृत्तिनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपले असताना त्यांना गहिनीनाथ भेटले. निवृत्तीनाथांना नाथ योगींच्या बुद्धीची दीक्षा दिली नंतर विठ्ठलपंत आळंदीला परतले आणि ब्राह्मणांना त्यांच्या पापासाठी प्रायश्चित करण्याचे साधन सुचविण्यास सांगितले. त्यांनी प्रायश्चित म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंताना केली. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना चांगले जीवन जगता यावे या आशेने इंद्रायणीत आपला जीव दिला.
काही लोकांच्या मते त्या दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली . दुसरी आख्यायिका सांगते की विठ्ठल पंतांनी त्यांच्या पापातून क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला गंगा नदी फेकून दिले.
ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले गेले. त्यांचे पालक या परंपरेत आधीपासूनच होते नंतर तिघे भाऊ आणि बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योगी आणि संतकवी बनले
ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी
ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव ग्रंथ लिहून झाल्यावर पंढरपूरला गेले. तिथे त्यांचे नामदेव महाराज यांच्याशी भेट झाली. नामदेवान आणि ज्ञानेश्र्वर भारतात विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली.
त्याकाळी त्यांच्या समकालीन असलेले गोरोबा कुंभार, सावतामाळी, संत चोखोबा, पारिसा यासारखे अनेक संत सहभागी झाले होते.
ज्ञानेश्वर महाराज यांनी नामदेव महाराज यांना संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली.ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वच्छेने शरीर सोडण्याची प्रथा होती. संजीवन समाधीची तयारी नामदेव महाराज यांच्या मुलांनी केली .संजीवन समाधी बद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधाबद्दल जोरदारपणे सांगितले आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष तेराव्या दिवशी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज यांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधीत प्रवेश केला .त्यांची समाधी आळंदीत सिद्धेश्वर मंदिर शेजारी आहे . अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्र्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत .
ज्ञानेश्र्वर महाराज यांचे कार्य
ज्ञानेश्र्वर यांचे गुरू त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ होते.नेवासा या ठिकाणी गुरुंच्या आज्ञेने त्यांनी भगवद्गीता यावर प्रख्यात टीका केली.
ज्ञानेश्र्वर महाराज यांनी ही टीका सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय त्यालाच भावार्थदीपिका असेही म्हणतात.
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रुपाने प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठी बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके |
ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन |
असे मनात ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेविषयी असलेला अभिमान मराठीची असलेली महती व्यक्त केले आहे.
ज्ञानेश्वरीत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तयोग असून या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये लिहिला आहे असे मानले जात आहे.
अमृतानुभव
हा ग्रंथ विशुद्ध तत्त्वज्ञान तसेच जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे 800 ओव्या आणि दहा प्रकरणे या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो.
चांगदेव पासष्टी या ग्रंथामध्ये त्यांनी चांगदेवांचे गर्व हरण केले असून त्यास उपदेश केला आहे. चांगदेव हे महान योगी होते 1400 वर्षे जगले असे म्हणले जाते ,पण त्यांचा अहंकार गेलेला नव्हता यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय .यात अदैत सिद्धांतचे अप्रतिम दर्शन होत आहे.
हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठात 28 अभंग असून हा नामपाठ आहे. यात हरी नामाचे महत्त्व सांगितले आहे. नामस्मरण कसे हिताचे आहे हे हरिपाठातून सांगितले आहे. आजही वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी हरिपाठ नित्यनेमाने घेत असतात.
पसायदान
ज्ञानेश्वर महाराज यांनी अखिल विश्वाची काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदयासह सर्व भक्त प्रेमाने माउली म्हणतात. वारकरी संप्रदायाचा त्यांनी पाया रचला.
आणखी पहा