Google ads

Ads Area

विभक्ती व त्याचे प्रकार | vibhakti & vibhaktiche praka

विभक्ती व त्याचे प्रकार |vibhakti & vibhaktiche prakar 


विद्यार्थी मित्रहो मराठी व्याकरणामध्ये विभक्ती प्रत्यय हा महत्त्वाचा घटक शालेतील परीक्षेसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. या अगोदर आपण वर्णमाला , शब्दविचार त्यामध्ये शब्दांच्या जाती, संधी अभ्यासल्या आहेत. यामध्ये आपण विभक्ती प्रत्यय म्हणजे काय ? आणि या विभक्तीचे प्रकार किती आहेत ? याचा अभ्यास  करणार आहोत . 

विभक्ती व त्याचे प्रकार

विभक्ती व त्याचे प्रकार                      

विभक्ती व त्याचे प्रकार(toc) 


विभक्ती म्हणजे काय


नाम  व  सर्वनाम यांचे  वाक्यातील क्रियापदांशी व इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जात असतात त्या विकारांना विभक्ती म्हणतात.  

लिंग ,वचन, विभक्ती,नामाच्या मूळ रूपात विकार होतात. विभक्ती म्हणजे नामांची प्रथमा ,द्वितीय, तृतीया अशी गटवार विभागणी होय. विभक्ती म्हणजेच विभक्त करणे होय असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. 


विभक्तीचे प्रत्यय नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडले जात असतात त्यास विभक्ती म्हणतात .                    


उदय. रामास  ,रामाचा, रामाने 


   


सामान्यरूप म्हणजे काय


नामाच्या किंवा सर्वानामाचे विभक्तीत रूपातर होताना  जो बदल होतो, त्यास  सामान्यरूप असे म्हणतात .


उदा . फूल —-   मूळ शब्द

         फुलाचा— विभक्तीचे रुप

         फुला–      सामान्य रूप

         चा —       प्रत्यय  


कारकार्थ म्हणजे काय 


वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी  जो संबंध असतो, त्याला कारक संबंध किंवा कारकार्थ म्हणतात .आणि त्या विभक्तीला कारकार्थ विभक्ती म्हणतात.    



उपपदार्थ म्हणजे काय


 वाक्यातील नामाचा  किंवा सर्वनामांचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर  शब्दांशी  जो संबंध असतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात.        



                                           विभक्ती तक्ता 



विभक्ती

    विभक्तीचे 

प्रत्यय

कारकार्थ 


एकवचन

अनेकवचन


प्रथमा 

      -

      -

  कर्ता 

द्वितीया

स, ला, ते 

स, ला, ना, ते 

  कर्म 

तृतीया

ने, ए, शी 

नि, शी, ई, ही 

  करण ( साधन ) 

चतुर्थी

स, ला, ते 

स, ला, ना, ते 

  संप्रदान (दान/भेट )

पंचमी

ऊन ,हून 

ऊन, हून 

अपादान ( दुरावा / वियोग )

  षष्ठी

चा, ची, चे 

चा, ची, चे, च्या 

संबंध 

सप्तमी 

त, ई, आ 

त, ई, आ 

  अधिकरण ( स्थल / वेळ )

संबोधन 

  -

नो 

हाक 




नामाचा क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण आठ प्रकारचा असतो .

म्हणून विभक्तीचेही आठ प्रकार मानले जातात, तर एकूण कारकार्थ सहा मानले जातात.


 कारकार्थमध्ये षष्ठी व संबोधन यांचा समावेश होत नाही.  



विभक्ती व  कारकार्थ 


विभक्ती प्रत्यययावरूनच मानाव्यात, तर कारकार्थ ते वाक्य कोणत्या उद्देशाने वापरले आहे, यावरून ओळखावेत .एकाच प्रत्ययाचे  वेगवेगळे कारकार्थ असू शकतात .   


उद्देश्य : ज्याच्याबद्दल वाक्य माहिती सांगते ,तो उद्देश्य असतो.

   

राम राजा होता. 


 कर्ता –प्रत्यक्ष क्रिया करणाऱ्याला कर्ता म्हणतात . 


  उदा . राम आंबा खातो   



१ )     प्रथमा     
          कारकार्थ


क्रिया करणारे कोण, क्रिया कोणावर घडते, क्रिया कोठे व कधी घडते, हे दर्शवणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत  असतात. तर वेगवेगळे कारकार्थ असू शकतात.  

एकवचनी व अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही ,ते प्रथमेत  मानावे


 उदा. 


  सदू चार आठवडे क्रिकेट खेळाला. 


  सदू –  कर्ता ( प्रथमा  )


   क्रिकेट - कर्म ( प्रथमा ) 


उपपदार्थ


 उद्देश्य, विधानपूरक, परिमाण, अंतर ,मूल्य हे दर्शविणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत असतात.


1. रावण राक्षस होता.

रावण  - उद्देश्य (प्रथमा)

राक्षस  -विधानपूरक (प्रथमा )


रामरावांनी पाच पोती गहू पिकवले.

पाच पोती -परिमाण (प्रथमा)


मी पाच मैल चालतो.

मैल - अंतर ( प्रथमा)


दूध 40 रुपये लिटर मिळते.

रुपये - मूल्य (प्रथमा)


२) द्वितीया 



कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला स,ला ,ना ,ते प्रत्यय असतील व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल, तर कर्माची विभक्ती द्वितीया मानावी.


1.राजाने प्रधानाला बोलावले . - कर्म (द्वितीया )

2) पोलिसाने चोरास पकडले.

कर्म ( द्वितीया) 


कर्म सोडून इतर कोणालाही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते. द्वितीयेला उपपदार्थ नाहीत.


३)  तृतीया


क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना जर ने, ए, शी, नी प्रत्यय  असतील तर विभक्ती तृतीया असते व कारकार्थ खालीलप्रमाणे असतात.


करकार्थ

1. मुलाने चाकूने सफरचंद कापले. >> मुलाने - कर्ता (तृतीया)

     चाकूने - ( करण /साधन) तृतीया 

2 . मी रस्त्याच्या कडेने गेलो. कडेने - (स्थळ / अधिकरण ) तृतीया


उपपदार्थ


वरील अर्थाव्यतिरिक्त रीत, निमित्त, न्यूनत्व ,परिमाण, प्रमाण सानिध्य, कालावधी हे उपपदार्थ दर्शवण्यासाठीसुद्धा तृतीयेचे प्रत्येय वापरतात.


1) ती तोऱ्याने चालते (रीत) तृतीया 

2) घर पावसाने पडले (निमित्त) तृतीया 

3) तो कानाने बहिरा आहे (न्यून त्व) तृतीया 

4) साखर किलोने मिळते (परिमाण) तृतीया 

5) ती चार इंचांनी कमी भरते (प्रमाण) तृतीया 

6 ) कुत्रा पायथ्याशी बसला ( सानिध्य ) तृतीया 

7) काका चार वर्षांनी येतात ( कालावधी) तृतीया


४) चतुर्थी


कारकार्थ

दान ,भेट , कर्ता/कर्म (दान /भेट) साधन दुरावा स्थळ दर्शवताना नामाला जोडलेले सला ना ते प्रत्येक दर्शवतात.

1. दशरथाने कैकेयीला दोन वर दिले.(अप्रत्यक्ष कर्म ) - चतुर्थी

2. काम काम करवते (कर्ता ) चतुर्थी

3. नदी सागराला भेटते कर्मा चतुर्थी

4. तो रेल्वे लटकून गेला (करण/ साधन) चतुर्थी

5. त्याच्या डोळ्याला धार लागली (अपदान / वियोग) चतुर्थी  

डोळ्यातून पाणी आले

6. काका पुण्यात गेले (अधिकरण/ स्थळ )चतुर्थी.


द्विकर्मक वाक्यात दान जाणारे प्रत्यक्ष कर्म तर दान घेणारे अप्रत्यक्ष कर्म असते. दान जाणारा प्रथमेत तर दान घेणारा चतुर्थीत असतो.


उदा. आजोबांनी नातूला गोष्ट सांगितली.

नातूला : अप्रत्यक्ष कर्म - चतुर्थी

गोष्ट: प्रत्यक्ष कर्म  :प्रथमा 


काही प्रसंगी कर्ता स्वतःचे दान कर्माला करतो तेव्हा विभक्ती खालीलप्रमाणे असते.


 ओढा नदीला भेटतो.

 ओढा (कर्ता ) प्रथमा ,

नदीला (कर्म ) चतुर्थी


कर्माला स, ला, ना ,ते प्रत्यय असतील ; परंतु दान किंवा भेट नसेल तर ती द्वितीया असते.


उदा.

रामाने रावणास मारले

रामाने  (कर्ता -)  तृतीया 

रावणाला ( कर्म ) -तृतीया


उपपदार्थ

वरील कार्यकर्ताशिवाय उद्देश्य, परिमाण ,मूल्य ,विषय, स्वामित्व योग्यता हे पदार्थ दर्शवण्यासाठी चतुर्थी प्रत्यय वापरली जाते.


1.मी खेळायला जातो (उद्देश्य )- चतुर्थी

2. दुधासाठी लिटरला वीस रुपये पडतात. (परिणाम ) -

3 त्याला गणिताला चांगले गुण आहेत.( विषय )- चतुर्थी

4.त्याला मुलगा आहे.( नाते )- चतुर्थी

5.तात्याला मोटार आहे,( स्वामीत्व)- चतुर्थी

6.तो बालपणीस आईस मुकला (वियोग )-चतुर्थी

7.मुलगी लग्नाला आली (योग्यता)- चतुर्थी


५) पंचमी


दुरावा दर्शविताना व साधन म्हणून वापरलेल्या नामाला जर ऊन , हुन जाते असतील तर तो खालील प्रमाणे करकार्थ दर्शवितो.


कारकार्थ

1.0साप घरातून बाहेर गेला. (अपादान ) वियोग) -

2. फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते.(करण/साधन) पंचमी


उपपदार्थ


अंतर, तुलना, भेद दर्शविताना वापरलेले ऊन प्रत्यय उपपदार्थ दर्शतात व विभक्ती पंचमी असते.

1. पुण्याहून मुंबई 200 किलोमीटर आहे तर ( अंतर)- पंचमी

2. खेड्याहून शहर मोठे असते. (तुलना पंचमी )

3घोड्याहून खेचत दिसायला वेगळे (भेद )- पंचमी


६ . षष्ठी


षष्ठीचा संबंध क्रियापदाशी येत नसला तरी काही प्रसंगी कर्ता , करण अपदान, अधिकरण दर्शविण्यासाठी षष्ठीचे प्रत्येक वापरतात.

1. त्याचे खाऊन झाले (कर्ता ) षष्ठी 2. आमचा बसचा प्रवास संपला करण षष्ठी 

3. दिवसाचे झोपणारे रात्रीचे जागतात (अधिकरण /वेळ) षष्ठी 

4. ससा हातचा निसटला.


वरील प्रकाराशिवाय पुढील बाबी दर्शवण्यासाठी षष्ठीचे चा, ची, चे ,च्या हे प्रत्येक वापरले जातात. प्रयोजन, मूल्य, कार्यकारण, जनकत्व, मालकी ,योग्यता, नाते बाह्यवाहक ,साकल्य इ.


1. जेवायची खोली बंद आहे (प्रयोजन ) -षष्ठी

 2.बर्फाचे पाणी झाले (स्थित्यंतर )-षष्ठी 

3.मी रुपयांची भाजी आणली (मूल्य )-षष्ठी 

ती सोन्याची मूर्ती आहे (कार्यक्रम) -षष्ठी 

4. ती मुलाची मावशी आहे (जनकत्व) षष्ठी )

5.ती काकांची गाडी आहे (मालकी ) -षष्ठी 

6 .ती लग्नाची मुलगी आहे( योग्यता) षष्ठी 

7. तो रामाचा भाऊ आहे (नातेसंबंध)- षष्ठी 

8, ) मला घोड्याची गाडी आवडते (बाह्यवाहक)- श्रेष्ठ 

9. तमाशाला गावच्या गाव लोटला (साकल्य, ) षष्ठी


सर्वनामांचे झा ,झी , झे, झ्या प्रत्ययसुद्धा षष्ठीचे असतात.


७) सप्तमी 

कारकार्थ

स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या नामांना जोडलेले त, ई, आ प्रत्यय कारकार्थ दर्शवतात.

उदा.

1. साधु संत येती घरा तो ची दिवाळी दसरा (स्थळ) सप्तमी 

2. मी सकाळी अभ्यास करतो (वेळ) सप्तमी 

3. मी पायी शाळेत जातो ( करण) सप्तमी


उपपदार्थ


 याशिवाय, हेतू ,विषय , सहितत्व ,श्रेष्ठत्व दर्शवताना जोडलेले त, ई , आ प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात .

1. दारूपायी त्याने घरदार विकले (हेतू) सप्तमी

2. तो इतिहासात कच्चा आहे. (विषय) सप्तमी

3. त्याने वाद्यात ठेका धरला (सहीतत्त्व) सप्तमी 

4. त्याची बायको लाखात देखणी आहे ( श्रेष्ठत्व ) सप्तमी 


८ ) संबोधन 


ज्या नावाने हाक मारली जाते त्याला संबोधन म्हणतात. संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात .त्याचबरोबर त्यांचा विकारही होतो. सर्वनामांना हाक मारता येत नाही त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही.


 उदा.


1. मुलांनो रांगेत उभे राहा

 2. रामा पाणी टाक



अशा प्रकारे आपण आज विभक्ती आणि त्याचे प्रकार पहिले आहेत .


आणखी वाचा


मराठी भाषेचा उगम 


मराठी शुद्धलेखनाचे नियम 


मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 


सर्वनाम म्हणजे काय 


मराठी व्याकरण समास 


विशेषण आणि त्याचे प्रकार 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area