संधी मराठी व्याकरण | sandhi marathi vyakaran | sandhiche prakar | संधीचे प्रकार | संधी म्हणजे काय
मराठी व्याकरणात प्रथम आपण मराठी भाषेचा उगम पाहिला त्यानंतर आपण मराठी वर्णमाला हा घटक अभ्यासला म्हणजेच व्याकरण पाहत असताना भाषेची उत्पत्ती किंवा भाषेचा उगम त्यानंतर मराठी वर्णमाला शब्द विचार वाक्य निकालविचार असे आपण क्रमाने पहात जाणार आहोत आपण मराठी भाषेचा उगम पाहिला आणि वर्णमालाही अभ्यासली यानंतर आपण शब्द विचाराकडे वळणार आहोत शब्द विचारांमध्ये संधी हा महत्त्वाचा घटक आहे त्याचा आज आपण अभ्यास करूया तर विद्यार्थी मित्रहो आपण बोलत असताना संधी ही अनेक वेळा शब्द उच्चारत असतो परंतु संधी म्हणजे व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक असून अनेक जणांना संधी विषयी बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात संधी बोलताना खूप सोप्पी वाटत असते परंतु व्याकरण एक दृष्ट्या जर विचार केला तर संधी हा सोपा जसा भाग आहे तसाच जसजसा अभ्यास करून तस तसा थोडा क्लिष्ट जरी वाटत असला तरी आधी सोपा कसा करता येईल हे आपण आज अभ्यासणार आहोत आपण या लेखात संधी कशा पद्धतीने अभ्यासाची आणि ते परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने स्मरणात ठेवायची हे आपण आज पाहूया.
वाचा 👉हरतालिका व्रताची माहितीसंधी म्हणजे काय
संधी म्हणजे काय |
जोडशब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचे पहिला वर्ण हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळत असतात हे मिसळल्यामुळे दोघांबद्दल एकच वर्ग तयार होतो या वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रक्रियेस संधी असे म्हणतात.
आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक उच्चारत असतो त्यावेळी एकमेका शेजारी असणारे दोन वर्ण एकमेकात मिसळत असतात त्यांचा एक वर्ण तयार होतो म्हणजेच जोडशब्द तयार होतो.
उदा.
सूर्य उदय झाला असे आपण न म्हणता सूर्योदय एवढेच म्हणत असतो .तसेच इति आदि असे ना म्हणता इत्यादी असे म्हणत असतो.
अशा प्रकारचे जोडशब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो .वर्णांच्या अशा या एकत्र होण्याच्या प्रक्रियेस संधी म्हणतो.
वाचा 👉 अपंग महिला असूनही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा
संधी= जोडणे, सांधणे
संयुक्त शब्द (जोडशब्द) = शुभ-लाभ
सामासिक शब्द = आईवडील
संधी = महात्मा
संधीचे प्रकार |
संधीचे प्रकार
1. स्वरसंधी.
2. व्यंजनसंधी
3. विसर्गसंधी
1. स्वरसंधी
स्वरसंधी = स्वर+ स्वर
हे एकमेकाशेजारी येत असतील तर त्या स्वरसंधी असे म्हणतात.
गुरु + उपदेश उ + उ =ऊ गुरुपदेश
2 . व्यंजनसंधी
जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास व्यंजनसंधी असे म्हणतात.
व्यंजन + व्यंजन
किंवा
व्यंजन + स्वर
सत् + जन = ( त् + ज ) = सज्जन
चित + आनंद = ( त + आ ) = चिदानंद
सत् + आचार = ( त् + आ ) = सदाचार
3. विसर्गसंधी
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसऱ्या वर्णन व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. ( विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर )
उदा . नि :+ अंतर = निरंतर
दु :+ जन = दुर्जन
स्वरसंधी
दीर्घत्वसंधी
दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोन्हींबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर होतो याला दीर्घत्वसंधी म्हणतात.
दीर्घत्वसंधी कशी ओळखावी?
संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते तेव्हा दीर्घत्व संधी होत असते.
अ + अ = आ
सूर्य +अस्त = सूर्यास्त
प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
सह + अनुभूती = सहानुभूती
कट+ अक्ष = कटाक्ष
रूप +अंतर= रूपांतर
स्वभाव +अनुसार = स्वभावानुसार
सह +अध्यायी = सहाध्यायी
पुरुष +अर्थ = पुरुषार्थ
अ + आ = आ
हिम+आलय= हिमालय
देव +आलय=देवालय
फल + आहार =फलाहार
गोल + आकार = गोलाकार
अनाथ + आश्रम = अनाथाश्रम
मंत्र + आलय = मंत्रालय
जन + आदेश = जनादेश
नील + आकाश = निलाकाश
कार्य + आरंभ = कार्यारंभ
आ + अ = आ
विद्या + अर्थी = विद्यार्थी
विद्या = अमृत = विद्यामृत
भाषा + अंतर = भाषांतर
आ + आ =आ
महिला + आश्रम = महिलाश्राम
राज्य + आश्रय = राजाश्रय
कला + आनंद = कालानंद
विद्या + आलय = विद्यालय
राजा + आज्ञा + राजाज्ञा
चिंता + आतुर = चिंतातुर
इ = इ = ई
कवि + इच्छा = कवीच्छा
अभि + इष्ट = अभीष्ट
मुनि+ इच्छा =मुनिच्छा
इ + ई = ई
गिरी + ईश = गिरीश
पारी + ईक्षा = परीक्षा
कवि + ईश्वर + कवीश्वर
ई + इ = ई
रवी + इन्द्र =रवींद्र
मही = इन्द्र = महिंद्र
गोमती + इच्छा = गोमतीच्छा
ई + ई = ई
मही + ईश =महीश
पार्वती + ईश = पार्वतीश
उ + उ = ऊ
गुरु + उपदेश = गुरुपदेश
भानू+ उदय = भानुदय
ऊ + उ = ऊ
भू + उद्धार = भूद्धार
वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष
लघु+ उत्तरी = लघूत्तरी
ऋ + ऋ = ऋ
मातृ + ऋ = मातृण
आदेश म्हणजे काय ?
संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला आदेश म्हणतात.
अ / आ + ई / ई = ए
अ / आ + उ / ऊ = ओ
अ / आ +ऋ = अर
गुणादेश
वरील प्रकारे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ ,अर असे बदल झाल्याने याला गुणादेश म्हणतात.
अ + इ = ए
ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा
लोक + इच्छा = लोकेच्छा
अ + ई = ए
गण + ईश = गणेश
राम +ईश्वर = रामेश्वर्
आ + ई = ए
रमा + ईश = रमेश
उमा = ईश = उमेश
महा +ईश + महेश
अ + उ = ओ
चंद्र + उदय = चंद्रोदय
सूर्य + उदय =सूर्योदय
प्रश्न + उत्तर = प्रश्ननोत्तर
अ + ऊ = ओ
एक + ऊन = एकोन
समुद्र + ऊर्मी = समुद्रोर्मी
आ + ऊ = ओ
गंगा + उदक = गंगादोक
महा = उत्सव = महोत्सव
आ + ऊ = ओ
गंगा + ऊर्मी = गंगोर्मी
वृध्दयादेश
वरील प्रकारे स्वर तयार झाल्यास त्यास वृद्धयादेश असे म्हणतात .
अ + ए = ऐ
क्षण + एक = क्षनैक
एक+ एक = एकैक
आ + ए = ऐ
सदा + एव = सदैव
यणादेश
ई ,उ , ऋ ( ऱ्हस्व /दीर्घ ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ /ई बद्दल य् , उ /ऊ बद्दल व् तर ऋ बद्दल र वर्ण येतात आणि त्यातपुढील स्वर मिसळून संधि होते . अशा प्रकारे य,व,र असे बदल होतात त्याला यणादेश असे म्हणतात .
ई+ अ = य् + अ = य्
प्रीती + अर्थ = प्रीत्यर्थ
अति +अंत = अत्यंत
वाचा👉 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो
व्यंजनसंधी म्हणजे काय
स्पर्श व्यंजनांपैकी अनुनाशकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. यालाच प्रथम व्यंजन संधी म्हणतात..
संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील क,च,ट,प या कठोर व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती प्रथम व्यंजन संधी असते .
स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्यात वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात.
संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील ग,ज ड,द,ब यापैकी असते तेव्हा ती तृतीय व्यंजन संधी असते .
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजना पुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला अनुनासिक संधी असे म्हणतात .
अनुनासिक संधीत संधी झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिके असतात.
त या व्यंजना पुढे च, छ झाल्यास तू बद्दल च येतो व पुढील च \ छ बरोबर संधी होते .
विसर्गसंधी
विसर्गाच्यापुढे मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून हो होतो याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.
विसर्ग उकार संधी कशी ओळखावी या संधीयुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला कान मात्र असतो .
मन:+ रंजन= मनोरंजन
यश:+ धन= यशोधन
मन: + रथ = मनोरथ
अध: + वदन =अधोवदन
मन:+ राज्य = मनोराज्य
तप: +बल =तपोबल
तेज:+ निधी = तेजोनिधी
यश: + गिरी = यशोगिरी
रज:+गुण = रजोगुण
मन: + वृत्ती = मनोवृत्ती
विसर्गाच्या मागे अ +आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व पुढील वर्ण|बरोबर संधी होते याला विसर्ग र संधी म्हणतात.
नि:+ अंतर= नि+ र+ अंतर= निरंतर
दु:+ जन= दु:+ र+ जन =दुर्जन
बहि:+अंग = बहि +र+अंग =बहिरंग
दु:+वासन=दु+र+वासन= दुर्वासन
धनु:+वात + नु +र+वात = धनुर्वात
मराठीतील विशेष संधी
पूर्वरूपसंधी
कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा लोप पावतो याला पूर्वरूपसंधी म्हणतात.
नाही+ असा - ई +अ = नाहीसा
नदी+ आत - ई +आ + नदीत
साजे+ असा -ए +अ =साजेसा
खिडकी + आत - ई + आ = खिडकीत
आळी + आत - ई + आ = आळीत
पररूपसंधी
काही मराठीतील शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात .
हात + ऊन = अ + ऊ = हातून
घर + ई = अ + ई = घरी
भरड +ऊन = अ + ऊ= भरडून
हर + एक = अ + ए =हरेक
चिंधी + ओटी = ई + ओ = चिंधोटी
आणखी वाचा