Google ads

Ads Area

मराठी भाषेचा उगम | marathi bhashecha ugam

 मराठी भाषेचा उगम | marathi bhashecha ugam


आपली मराठी भाषा ही फार  प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या आपल्या मराठी भाषेचा इतिहास आपणास माहीत असणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट अभ्यास करत असताना त्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचणे हे आपली जबाबदारी असते . मराठी भाषेचा अभ्यास करत असताना प्रथम मराठी भाषा कशी विकसित होत गेली हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर  लिपी आणि व्याकरण याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. त्यासाठी आपण  मराठी भाषेचा उगम कसा झाला ते पाहणार आहोत.


  आपल्या भारत देशामध्ये दोन गटामध्ये भाषा विभागल्या गेल्या आहेत. 


१.  इंडो /युरोपीय ( इंडो-आर्य- भाषा )  ( ७४% )


2. द्रविडीय भाषा (२४%) 


भारत हा एकसंघ राष्ट्र असले तरी प्रादेशिक विभागानुसार या मोठ्या देशात जवळपास 1652 एवढ्या भाषा बोलल्या जात आहे आपल्या राष्ट्राची हिंदी ही प्रमुख भाषा जरी असली तरी प्रादेशिक विभागानुसार 1652 या भाषा बोलल्या जात आहेत. 


 आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 343 अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली  इंग्रजी आणि हिंदी  ह्या संघराज्याच्या व्यवहाराचे भाषा ठरलेल्या आहेत. परंतु आपल्या भारत देशात 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा देण्यात  आलेला आहे.. 


मात्र आपल्या भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला नाही 


22 प्रादेशिक भाषा


  1.  मराठी

  2.  आसामी

  3.  बंगाली 

  4. गुजराती

  5. कोकणी 

  6.  मल्याळम

  7. मैतई 

  8. हिंदी 

  9.  डोंगरी 

  10. बोडो

  11.  कन्नड

  12.  काश्मिरी

  13.  ओरिया

  14.  पंजाबी

  15.  संस्कृत

  16.  सिंधी 

  17. उर्दू

  18.  संथाली

  19.  तेलगू

  20.  तमिळ

  21. मैथिली 

      22. नेपाळी 



आर्यन गटातील भाषा (देवनागरी लिपी)


 गुजराती

 मराठी

 हिंदी

 संस्कृत

 बंगाली 

 पाली


द्रविडीयन गटातील भाषा


 कानडी 

 तमिळ

 मल्याळम

 तेलगू


 अभिजात भाषा


 उडिया

मल्याळम

 कन्नड

 तेलगू

 तमिळ

 संस्कृत

 मराठी ( कार्यवाही सुरू आहे)


कोणतीही भाषा म्हटलं की त्याचा वैशिष्ट्यपूर्ण असा इतिहास असतो तसेच त्या भाषेला परंपरा लाभलेली असते मराठी भाषेचा विकास हा संस्कृत प्राकृत असा विकास झालेला आहे हे जरी असले तरी मराठी भाषेला अधिक संपन्न इंग्रजी,अरबी ,गुजराती ,हिंदी ,कानडी,फारशी या भाषांनी केले आहे.


वाचा 👉शाळेत मायक्रोग्रीन्स कसे राबवावे कोणती पिके घ्यावीत



मराठी भाषेच्या उगमासंदर्भात  मुद्दे


1. भाषा 

भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन होय .बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा पूल म्हणजे भाषा म्हटले जाते ही भाषा काही काळानंतर व प्रदेशानुसार बदलत जाते. 



 भाषा मुख्यत: दोन प्रकारची असते


1. नैसर्गिक भाषा /स्वाभाविक भाषा

बोलणे, पशुपक्ष्यांचे आवाज,हावभाव ( पडताळा करून पाहता येत नाही )


2. कृत्रिम भाषा

  ध्वनीच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा (अक्षरे) ( पडताळा करून पाहता येते)



भाषेचे उगमस्थान  

भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे व बोलण्याचा व्यवहार करणे असतो.

मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून विकसित होत आली आहे.


3.लिपी

आपण बोलण्यापेक्षा कधी कधी आपले विचार लिहून ठेवत असतो यासाठी वेगवेगळ्या आवाजांच्या सांकेतिक खुणा जातात त्यालाच लिपी असे म्हणतात. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून  रोड झाला आहे म्हणजेच ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हटले जाते.

मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी ही मराठी, गुजराती ,संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली या भाषांची आहे.

लिपीमुळे लेखनकार्य सुरू झाले आहे.. 


मोडी लिपी

 मोडी लिपी या भाषेला धावलीपी असेही म्हटले जाते. मोडी लिपी ही काही काळापर्यंत मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती .अशा या देवनागरी लिपीला बाळबोध  लिपी असेही म्हटले जाते. देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी म्हटले जाते ;कारण की प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र असे चिन्ह असल्याने देवनागरी लिपी ही परिपूर्ण  लिपी  म्हटली  जाते.


4. मातृभाषा

 आपण जी घरात भाषा बोलत असतो ती भाषा म्हणजे मातृभाषा त्यालाच आपण आईची भाषा असेही म्हटले जाते .


मराठी भाषेचा पुरावा


 मराठी भाषा ही केव्हापासून अस्तित्वात होती याचा पहिला पुरावा कर्नाटकातील श्रवणबेळगाव येथील बाहुबलीच्या (गोमटेश्वराच्या ) पुतळ्याखाली लिहिलेली अक्षरे ( इसवी सन 983 ) होय .


अक्षरे अशी  आहेत : श्री चावुण्डराजे करवियले 

हे असून अलीकडेच सप्तशती हा 2000 वर्षापूर्वीचा मराठीतून लिहिलेला पहिला ग्रंथ सापडला . 

मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी ,मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे असलेली दिसून येतात.





भाषेचे  मूलभूत घटक


 वर्ण

आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात .तोंडावटी हे निघणारी धोनी हवेत विरून नाहीसे होत असतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणूनआपण रंगाने म्हणजेच वर्णाने लिहीत असतो; म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात .हे ध्वनी लिहून ठेवल्यामुळे कायमचे राहत असतात ;म्हणून त्यांना अ-क्षर ,नाश न पावणारे असेही म्हटले जाते.


 अक्षर

अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहे म्हणून अक्षरांना आपण ध्वनीचिन्हे असेही म्हणत असतो. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पुण्याला म्हटले जाते .आपण जे बोलतो ते नष्ट होत असते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ म्हणजेच कायमचे राहतात ,म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात.


 शब्द

ठराविक क्रमाने आलेली अक्षरे असतात या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल तरच तो शब्द म्हणावा लागतो. 

उदा . डकमा  – माकड 


 वाक्य

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हटले जाते.


 व्याकरण 

भाषेचे व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. भाषा आधी बनते मग तिचे व्याकरण ठरते. भाषेचा मागोवा घेत व्याकरणाला जावे लागत असते 


आपण मराठी भाषेचे उगम पाहिले. मराठी भाषेतील व्याकरण याचा अभ्यास करणे गरजेचे आहे .मराठी भाषेचा अभ्यास करत असताना ती भाषा ज्या घटकाची बनलेली आहे. त्यांचा अभ्यास करायचा म्हणजेच बोलताना आपण विचार क्रमाणे मांडत असतो ,या संपूर्ण मांडलेल्या विचाराला वाक्य असे म्हणतात . 


आपली भाषा ही अनेक वाक्यांची बनलेली असते, वाक्य हे शब्दांचे बनलेले असते , शब्द हा वर्णांचा बनलेला असतो .म्हणून आपण वर्णविचार, शब्दविचार, वाक्यविचार अशा क्रमाने येणाऱ्या मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास पुढील लेखामध्ये पाहणार आहोत..







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area