क्रियाविशेषण अव्यय मराठी | kriyavisheshan avyay
आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत. या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
क्रियाविशेषण अव्यय |
शब्द
विकारी (सव्यय) अविकारी ( अव्यय)
नाम क्रियाविशेषण
सर्वनाम शब्दयोगी अव्यय
विशेषण उभयान्वयी अव्यय
क्रियापद केवलप्रयोगी अव्यय
1 ) विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay)
ज्या शब्दांचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
2) अविकारी शब्द (अव्यय)
लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही वाक्यात बदल होत नाही, त्यास अविकारी शब्द असे म्हणतात.
अव्यय समजून घेऊ
शब्दांच्या जातीमध्ये आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती आठ आहेत हे पाहिले .त्यापैकी आपण सव्यय आणि अव्यय यांची विभागणी पाहिली. तसेच नाम,सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार जातींची (सव्ययांची) माहिती अभ्यासली वचन, लिंग, पुरुष ,विभक्ती ,काळ-अर्थ यांच्यामुळे चार जातीच्या शब्दांच्या रूपात बदल होत असतो हे आपण अभ्यासले.
शब्दांच्या जाती पैकी क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी ,केवलप्रयोगी या चार जाती अशा आहेत की त्यांना विभक्ती, लिंग, वचन यांचे प्रत्यय लागत नाहीत . त्यांच्या रूपात कोणताच बदल होत नाही. त्या जशाच्या तशाच राहत असतात. त्यांचा व्यय होत नाही . वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापद यांचे लिंग, वचन ,पुरुष जरी बदलले तरी त्यांची रूपे जशी आहेत तशीच राहतात; म्हणजेच त्यांचा व्यय होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण किंवा नामविशेषण म्हणतात तसेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात.
क्रियापदबद्दलची विशेष माहिती म्हणजे कोणती ? क्रियापदाने जी क्रिया दाखविली जाते ती केव्हा घडली ? कोठे घडली ? कशी घडली ? किती वेळा ?किती प्रमाणात घडली ,अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात त्यांनाच आपण क्रियाविशेषण म्हणत असतो.
वाचा 👉 विभक्ती व त्याचे प्रकार
क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक
अशा प्रकारे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार
क्रियाविशेषण अव्ययांची दोन गटात विभागणी होत असते आणि आठ प्रकार मानले जातात.
अ ) अर्थावरून पडणारे प्रकार
आ ) स्वरूपावरून पडणारे प्रकार
1 ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
अ . कालदर्शक (क्षणवाचक)
क्रिया केव्हा घडली हे दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणाना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा .
उद्या
आधी
सध्या
आता
हल्ली
परवा
लगेच
केव्हा
जेव्हा
दिवसा
रात्री
तुर्त
सांप्रत
पूर्वी
मागे
येरवाळी
1. पाऊस रात्री झाला.
2. तुम्ही केव्हा जाणार आहात.
3. तो उद्या शाळेत जाणार आहे.
ब) सातत्यदर्शक ( अवधिदर्शक )
अखंड क्रिया दर्शवणाऱ्या काललवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा .
नेहमी
आजकाल
हमेशा
नित्य
सर्वदा
दिवसभर
सर्वकाळ
सदोदित
1. माधव सतत बडबड करत होता.
2. दिवसभर पावसाची जर रिपोर्ट चालू होती.
3. सुसंगती सदा घडत.
क ) आवृत्तीदर्शक ( पौन:पुण्यवाचक )
घटनेची पुनरावृत्ती दाखवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा .
फिरून
वारंवार
दररोज
पुन्हा पुन्हा
सालो साल क्षणोक्षणी
1. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित केला आहे.
2. रमेश दररोज मंदिरात जातो.
3. अभ्यास करत असताना क्षणोक्षणी आपल्या परिस्थितीची जाणीव असायला हवी.
2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
याचे दोन प्रकार पडतात.
अ) स्थितीदर्शक: येथे ,जिथे ,तिथे ,वर ,खाली ,कोठे, मध्ये ,अलीकडे ,पलीकडे,मागे , पुढे ,जिकडे, तिकडे, सभोवार
1. पलीकडे एक नारळाचे झाड आहे.
2. पक्षी वर आहे.
3. तो खाली उतरला.
ब) गतीदर्शक : इकडून, तिकडून ,मागून ,पुढून ,वरून ,खालून, लांब ,दूर
1 . जंगलातून जाताना पुढून सिंह आला.
2. शाळेत जाताना इकडून ये.
3. वाघ पाहून कोल्हा दूर पळाला.
3)रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शवणाऱ्या क्रियाविशेषणना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात .
याचे तीन प्रकार
अ ) प्रकारदर्शक : जलद, हळू ,जेवी ,मुद्दाम , सावकाश ,तेवी, आपोआप, फुकट, व्यर्थ, उगीच ,जसे ,तसे, असे, कसे
1. ती जलद धावली
2. वेळ फुकट गेला
3. ग्लास आपोआप फुटला
ब ) अनुकरणदर्शक:
पटपट ,झटपट ,बदाबद, चमचम ,धपाधप, खळखळ
( सामान्यता ध्वनीची पुनरावृत्ती झालेली क्रियाविशेषण अव्यय या प्रकारात मोडत असतात.)
1. मला पाहून तो पटकन गेला..
2. नदी खळखळ वाहते.
3. मुले चिखलात धपाधप पडली.
क ) निश्चयदर्शक ( प्रकर्षवाचक)
खचित, खरोखर, नक्की ,खुशाल, निखालस
1. शब्द दिल्याप्रमाणे तो खरोखर आला.
2. खचितच तो खोटे बोलतो.
3. त्याने खुशाल जावे.
4 ) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय( संख्यावाचक)
क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी क्रियाविशेषण ही संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असतात.
1. संख्यावाचक : पहिला, दुसरा ,दोनदा ,चौपट
2. अधिक्य वाचक : अधिक, फार, अतिशय, पुष्कळ
3. पर्याप्तिवाचक: पुरेसा, बस ,बेताचा, पुरे ,बरोबर
4. श्रेणी वाचक: क्रमश:, क्रमाने
काही परिणामवाचक : कमी ,जास्त ,किंचित ,जरा ,काहीसा ,थोडा ,क्वचित, अत्यंत,अगदी ,बिलकुल ,मुळीच ,भरपूर, अतिशय, मोजके,पूर्ण
1. तो मुळीच घाबरला नाही .
2. तो भरपूर पळाला.
3. मुले किंचित हसली.
5 ) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
का, ना, केव्हा, कोठे,कसे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय होतात.
1. ते मला तुझी वही देशील का?
2. तुम्ही मला तुमच्याबरोबर बाजारात न्याल ना ?
3. केव्हा आलास तुम्ही ?
4. कसे सांगू तुला?
6 ) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
न / ना चा वापर नकार किंवा विरोध दर्शविण्यासाठी केला जात असतो.
1. तू न आलेले बरं .
2. त्याने खरे सांगितले तर ना !
1 ) सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
मूळ क्रियाविशेणं|ना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा:
मागे, पुढे, येथे , तेथे, आज
1 . तो मागे गेला.
2. तू पुढे पळ .
2 ) साधित क्रियाविशेषण अव्यय
नाम, विशेषण, क्रियापद,सर्वनाम ,शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणना साधित क्रियाविशेषण म्हणतात.
साधित क्रियाविशेषणाची दोन गटात विभागणी होते .
अ ) प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय
1. नामसाधित : रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तीश: वस्तूत:
2. सर्वनाम साधित : त्यामुळे,ह्यावरून, कित्येकदा
3. विशेषण साधित : एकत्र, मोठ्याने ,चांगला, सर्वत्र
4. धातू साधित : रडताना, पडताना, खाताना, खेळताना
5. अव्यय साधित : कोठून, तिकडून, वरून, खालून
आ) सामासिक साधित क्रियाविशेषण अव्यय
द्विरुक्त किंवा सामासिक शब्द काही वेळा क्रियाविशेषणाचे कार्य करतात.
उदा. यथाशक्ति ,आजन्म, घरोघर, गावोगाव, हरघडी, गैरहजर
1. आज मधु शाळेत गैरहजर आहे.
2. भाकरीच्या शोधात आम्ही गावोगाव फिरलो.
3. तो दररोज येतो
आणखी वाचा