Google ads

Ads Area

केवलप्रयोगी अव्यय मराठी | kevalprayogi avyay in marathi

केवलप्रयोगी अव्यय मराठी| kevalprayogi avyay in marathi

 आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.


     
केवलप्रयोगी अव्यय

         केवलप्रयोगी अव्यय

                          

                            शब्द 

     विकारी  (सव्यय)                  अविकारी ( अव्यय)

     नाम                                                     क्रियाविशेषण अव्यय 

     सर्वनाम                                                 शब्दयोगी अव्यय 

     विशेषण                                                उभयान्वयी अव्यय 

     क्रियापद                                               केवलप्रयोगी अव्यय 


केवलप्रयोगी अव्यय(toc)


1 ) विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay)

ज्या शब्दांचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.


2) अविकारी शब्द (अव्यय)

लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही वाक्यात बदल होत नाही, त्यास अविकारी शब्द असे म्हणतात.

वाचा 👉शब्दांच्या जाती सविस्तर 


अव्यय समजून घेऊ 


शब्दांच्या जातीमध्ये आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती आठ आहेत हे पाहिले .त्यापैकी आपण सव्यय  आणि अव्यय यांची विभागणी पाहिली. तसेच नाम,सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार जातींची (सव्ययांची) माहिती अभ्यासली वचन, लिंग, पुरुष ,विभक्ती ,काळ-अर्थ यांच्यामुळे  चार जातीच्या शब्दांच्या रूपात बदल होत असतो हे आपण अभ्यासले. 


शब्दांच्या जाती पैकी क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी ,केवलप्रयोगी या चार जाती अशा आहेत की त्यांना विभक्ती, लिंग, वचन यांचे प्रत्यय लागत नाहीत . त्यांच्या रूपात कोणताच बदल होत नाही. त्या जशाच्या तशाच  राहत असतात. त्यांचा व्यय होत नाही . वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापद यांचे लिंग, वचन ,पुरुष जरी बदलले तरी केवलप्रयोगी अव्यय बदलत नाही .




आपल्या मनातील भावना दाटून आल्यानंतर तोंडावर ते सहजपणे, अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाची शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.


केवळप्रयोगी अव्यय यांना विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत ते केवळ भावनेचे उद्गार असतात.


याना वाक्याचा भाग नसतात ते केवळ वापरावयाचे म्हणून वापरले जातात परंतु त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते हे हवे कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्यांचे खालील प्रकार पडत असतात ते भावनाप्रधान असतात.

केवलप्रयोगी अव्यय प्रकार 

१) हर्षदर्शक: 

आहाहा, आ -हा , अहा , वा, वा-वा , ओ, इत्यादी


२) शोकदर्शक:

शिव - शिव, हरहर, देवा रे, रामा रे, अगाई, आई ग, हाय, हाय हाय, ऊं, अं, अरेरे, इ.


३) आश्चर्यदर्शक:

ऑ, ओ हो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या, इ 


४) प्रशंसादर्शक :

छान, वाहवा, भले, शाब्बास, यंव, ठीक, फक्कड, खाशी , इ 


५) संमतीदर्शक :

ठीक , जी, हां , बराय,अच्छा इ .

६) विरोधदर्शक :

छे  छे, अंहं, उंह, ऊ:, हॅट, छट, छे, च इ .


७) तिरस्कार दर्शक :

धिक, थु, शी, इश्श, हुड, फुस, हत, छत, इ ,


८) संबोधनदर्शक

अंग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे


९) मौनदर्शक :

चूप , चुपचाप, अहो, ए अगा, अगो, बा, रे, चूप ,चुपच, गप, गुपचुप  इ .


व्यर्थ उद्गारवाची अव्यये

जी उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करीत नाहीत, तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही. अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात.


उदा .

बापडा, वेडे ,म्हणे, आपला

- शरीर बेटे साथ देत नाही मी -आता मी बापडा काय बोलणार  ती आपली काय तक्रार करणार!

- त्यांची म्हणे चांगली च फजिती झाली.



पादपूर्णार्थक केवळप्रयोगी अव्यय / पालुपदे.


बोलताना लख म्हणून किंवा उगीचच पुन्ह -पुन्हा आलेल्या शब्दांना पाद पुर्णत्मक णार्थक केवलप्रयोगी अव्यय किं पडजीलकत पदे म्हणतात.

त्यांची रूपे जशी आहेत तशीच राहतात; म्हणजेच त्यांचा व्यय  होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात


आणखी वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area