Google ads

Ads Area

शिक्षक दिन ०५ सर्वोत्तम भाषणे २०२३ teacher day speech in marathi| shikshak din bhashan Marathi|

 शिक्षक दिन ०५ सर्वोत्तम भाषणे २०२३| teacher day speech in marathi | shikshak din bhashan Marathi|2023

 

शिक्षक दिनाची माहिती पाहत असताना समाजात असलेली शिक्षकाची प्रतिष्ठा ही खरोखरच वाखाणण्यासारखी असते . समाजात असलेले शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचारी वर्गाचे नावलौकिक होत असतो .शिक्षक हा समाज घडविण्यासाठी महत्त्वाचा असा घटक असल्याने सगळ्यांना शिक्षकांविषयी आदर असतोच . शिक्षक असल्यामुळेच आपणही घडलो आहोत याची प्रत्येकाला जाणीव असतेच.शिक्षक समाजप्रबोधन करत असल्याने अनेक लहामोठ्या गोष्टींची माहिती असल्याने सगळ्यांना शिक्षकांविषयी आपुलकी निर्माण झालेली दिसते.शिक्षकांचे असलेले ऋण समाज कधीही विसरु शकत नाही. त्यामुळे अशा शिक्षकांविषयी कृतज्ञता असावी म्हणून शिक्षक दिन उत्साहात शाळेत साजरा केला जात असतो.मुलांनाही  शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण व्हावा, हे ही महत्वाचे असते. म्हणून त्यांना शिक्षक दिनानिमत्ताने निबंध लेखन , भाषण स्पर्धांचे आयोजन प्रत्येक शाळेत केलेले असते.आज आपण भाषण पाहणार आहोत.

शाळा आमची आहे किती छान

आम्ही रोज शाळेला जाणार 

अशा शाळेत जाण्यासाठी केवळ इमारत महत्त्वाचे नसते तर शाळेविषयी मला लावणारा हा शिक्षक असतो अशा शिक्षक दिनानिमित्त आज आपण पाच तुम्हाला आवडेल अशी भाषणे दिली आहे ते नक्कीच वाचावी

शिक्षक दिन भाषण मराठी
शिक्षक दिन भाषण मराठी



अक्र 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य

कालावधी व विशेष

1

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म

5 सप्टेंबर 1888

2

राधाकृष्णन यांचा मृत्यू

17 एप्रिल 1975

3

उपराष्ट्रपती

1952 - 1962 

4

राष्ट्रपती

1962 - 1967

5

शिक्षणातील योगदान

पाश्चात्य विचारांच्या तात्विक,विचारांच्या गुणात्मक, तर्कशुद्ध ,आणि रचनात्मक टीकासाठी ओळखले जात

6

बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू

1939 - 1948 

7

सोनियेत युनियन मध्ये भारताचे दुसरे राजदूत

1949 -  1952 

8

तत्त्वज्ञान

अद्वैत तत्वज्ञान 

9

राजकीय पक्ष 

भारतीय काँग्रेस पक्ष


10

पुरस्कार

भारतरत्न 1954  ,नाइटहूड 1931 

11

ग्रंथसंपदा

60 पेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके

12

पत्नीचे नाव

सिवाकामुअम्मा 

13

अपत्ये 

पाच मुली एक मुलगा ( सर्वपल्ली गोपाल ) 


शिक्षक दिन भाषण मराठी (toc)


अनु 

मराठी भाषण 

मराठी  भाषण  मुद्दे 

1

शिक्षक दिन मराठी भाषण १ 

  1. समाजातील महत्त्वाचा घटक

  2. शिक्षकांविषयी  श्रद्धा 

  3. कर्तव्यदक्ष

  4.  विश्वासाचे ठिकाण

2

 शिक्षक दिन मराठी भाषण २ 

  1. कृतज्ञता असावी

  2.  संस्कार

  3.  समाज परिवर्तनाचे माध्यम

  4.  सर्वगुणसंपन्न

3

  शिक्षक दिन मराठी भाषण 3

  1. शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश

  2.  आदर भाव वाढावा कृतज्ञता

  3.  आपुलकी निर्माण व्हावी 

  4.  उज्वल भविष्य घडविण्यासाठी

  5.  सन्मान व्हावा

4

शिक्षक दिन मराठी भाषण ४ 

  1. शिक्षकांचे ऋण

  2.  ज्ञानाची भूक 

  3. प्रोत्साहित करतात

  4.  जिज्ञासा वाढवतात

5

शिक्षक दिन मराठी भाषण ५ 

  1. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान

  2.  कधीपासून शिक्षक दिन सुरू

  3.  शिक्षकांमुळे होणारे बदल

  4. नवनवीन ज्ञान देत असतात

  5.  उत्तम नागरिक बनवतात 

  6. ज्ञानदान करतात

  7.  समतेचे मूल्य उजळतात 

  8. अनुकरणशील 

  9. भाषणाचा सारांश 



शिक्षक दिन भाषण १

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु 

     गुरुर्देवो महेश्वरा 

    गुरु साक्षात परब्रम्ह 

     तस्मै श्री गुरुवे नमः


अध्यक्ष महाशय आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हास शिक्षक दिनाविषयी माझे छोटेसे भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करत आहे .

आज शिक्षक दिनानिमित्त मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि गुरुजनांचे आभार.

आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व खूप आहे <<<वाचा

1. समाजातील महत्त्वाचा घटक 

शिक्षक हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक असल्याने माझे जीवन घडण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

५ सप्टेंबर डॉ . सर्वपल्ली राधकृष्णन् यांचा जन्मदिवस असल्याने संपूर्ण भारत देशात शिक्षक दिन साजरा करत आहेत.


 

.2. शिक्षकाविषयी श्रद्धा 

मला खरंच अभिमान वाटतो की शिक्षक दिन साजरा होत आहे . ज्यांच्यामुळे समाज सुधारला जात आहे, त्यांच्याविषयी समाजात असलेली समाजाची असलेली श्रद्धा दिसून येते.

3. कर्तव्यदक्ष

आपल्या भारतीय संस्कृतीत मला हेच महत्त्वाचे सांगायला आवडेल की शिक्षक हा नेहमीच कर्तव्यदक्ष असतो तो समाजातील सगळ्या जबाबदाऱ्या पेलत असतो, 

4. विश्वासाचे ठिकाण 

कोणत्याही कामात अग्रेसर असून विश्वासाचे ठिकाण म्हणजे  शिक्षक होय. अशा शिक्षकांविषयी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे .


शिक्षक दिन भाषण २


          छडी लगे छम छम 
          विद्या ये घम घम 



डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे राष्ट्रपती यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक थोर विचारवंत, विद्वान ,आणि आदर्श शिक्षक होते. विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम, आपुलकी असल्यामुळे अध्यापक म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याची जवळजवळ चाळीस वर्षे घालवली.

म्हणून अशा थोर महान व्यक्तीचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे याचा मला खरोखरच अभिमान वाटत आहे ;की आज अशा महान व्यक्तींच्या जन्मदिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. आणि आज मला तुमच्यासमोर शिक्षकांविषयी बोलण्याची संधी दिली याबद्दल  मी माझे भाग्य समजत आहे.

  1. कृतज्ञता असावी 

शिक्षकांप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करत असताना शिक्षक हा समाज घडवत असतो .

आणि या समाजामध्ये आपल्यातील  कितीतरी मोठे शास्त्रज्ञ, अधिकारी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या प्रति आज कृतज्ञता व्यक्त करत असताना संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा होत आहे .

.2. संस्कार 

लहान -लहान मुलांमध्ये शिक्षकांविषयी असलेले संस्कार ते जपण्यासाठी याची रुजवणूक करणे खरोखर महत्त्वाचे आहे. आणि अशा समाजाबद्दल आपल्यामध्ये चांगली भावना असणे गरजेचे आहे.

3. समाज परिवर्तनाचे माध्यम शिक्षक

शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मार्गदर्शन करत असतो . शिक्षक हा समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम  असतो .

4. सर्वगुणसंपन्न                                 

मुलांमध्ये सर्वगुणसंपन्न असे कौशल्य प्राप्त करण्यासाठी तो सारे कौशल्य त्याच्यासमोर मांडत असतो. अशा शिक्षकांविषयी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद ! एवढे बोलून माझे छोटेसे भाषण थांबवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र !


शिक्षक दिन भाषण ३

अध्यक्ष महाशय आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हास शिक्षक दिनाविषयी माझे छोटेसे भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करत आहे .

            शिक्षक

       शि.  : शिस्तप्रिय

       क्ष    : क्षमाशील

       क.    : कर्तव्यदक्ष

अशा शिक्षकांविषयी शिक्षक दिनादिवशी मला बोलण्याचा योग आला. तुमच्यासमोर शिक्षकाविषयी असणारी भावना व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल प्रथमतः सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज मी शिक्षक दिनानिमित्त माझे शिक्षकांविषयी माझ्या मनातील विचार , भावना सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे. ही विनंती.


 शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश

या अगोदरच्या भाषणामध्ये आपले सहकारी मित्र यांनी शिक्षक आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे सांगितले .आज मी शिक्षक दिन का साजरा करतात याविषयी बोलणार आहे.शिक्षक दिन साजरा करण्याचे उद्देश सांगणार आहे .तुम्ही शांततेत आणि ऐकून घ्यावी अशी विनंती आहे .

1. आदर वाढावा, कृतज्ञता

आज देशभरात शिक्षक दिन हा साजरा होत आहे. या शिक्षक दिनाचे उद्देश काय आहे हे तुमच्या समोर विद्यार्थ्यांनामध्ये शिक्षकांविषयी असलेला आदरभाव वाढावा.

2. आपुलकी निर्माण व्हावी 

समाजात असलेल्या शिक्षकांविषयी आपुलकी राहावी , शिक्षक जबाबदार असल्यामुळे शिक्षकांना जाणीव व्हावी, आणि त्यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरी होत समाज घडवत असताना कोणत्याही विद्यार्थ्यावर  दुजाभाव होणार नाही, ज्ञानाची भूक भागवणे हे महत्वाचे संस्कार शाळेत दिले जात असल्याने समृद्ध शाळा व्हाव्यात, शिक्षकांविषयी असलेला आदर वाढावा.

3. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षक दिन

समाजाला शिक्षणाविषयी आणि शिक्षकांविषयी चांगले संबंध निर्माण असावेत ,जेणेकरून विद्यार्थी आपले भविष्य उज्वल करणार आहे.

अशा प्रकारे शिक्षकांचा सन्मान केला तर सर्वच स्तरातील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल .

आपण ज्यांच्याकडून ज्ञानाचे धडे घेतोय ते आपण योग्य मार्गदर्शनाखाली आणि चांगल्या शिक्षकांजवळ आपणही घडलो आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवला. त्यामुळेच आपण या ठिकाणी आलो आहोत.

4. सन्मान व्हावा 

आपल्याला ज्ञान देण्यासाठी त्यांचाच खूप मोलाचा वाटा आहे, अशा प्रसंगी ज्यांनी मला शिकवले किंवा जे शिकत आहेत त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम, निष्ठा ,श्रद्धा असणे हे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्तम नागरिक बनवण्यासाठी शिक्षकांविषयी असा आदरभाव आणि त्यांचा सन्मान करणे हे उचितच असणार आहे .

 मला अशा शिक्षकांप्रति असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन का साजरा करावा . याबद्दल भाषण सांगण्यासाठी तुम्ही मला थोडी संधी दिली, याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि आपले  कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहवे आणि मी सर्व शिक्षक बांधवांना अभिवादन करून माझे हे छोटेसे भाषण थांबवित आहे. 


शिक्षक दिन भाषण ४

     गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु 

     गुरुर्देवो महेश्वरा 

    गुरु साक्षात परब्रम्ह 

     तस्मै श्री गुरुवे नमः

अशा या महान गुरुवर्य यांना प्रथमतः नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

1. शिक्षकांचे ऋण

आज शिक्षक दिन म्हणून मला खूप आनंद वाटत आहे आणि सर्व शिक्षकांसमोर मला या ठिकाणी बोलण्यासाठी मार्गदर्शन केले, लायक बनवले असे हे माझे सर्व शिक्षक बांधव यांचा आम्ही खूप खूप ऋणी आहे.

आपल्या जीवनात गुरुचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षक म्हणा किंवा गुरू आपण त्यांच्याकडून ज्ञान घेत असतो.

2. ज्ञानाची भूक

आपण हे ज्ञान शाळेमध्ये घेत असतो. म्हणजे शाळेतील संस्काराचे शिक्षकांकडून घेत असतो. आपले ज्ञान वाढवण्यासाठी आपण नेहमी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो पाहिजे. त्यांना सतत प्रश्न विचारून आपले ज्ञानाची भूक वाढवणे आवश्यक आहे. 

3. प्रोत्साहित करतात

शिक्षक आपल्याला घडवण्यासाठी नेहमी आपल्याला जागृत ठेवण्याचे काम करत असतात. शिक्षक म्हणून आपल्याला रागवतात बोलतात कधी कधी मायेने पाठीवर हात ठेवून शाबासकीही देतात .

4. जिज्ञासा वाढवत असतात

शिक्षकांनी प्रोत्साहन दिले की मनाला खूप उभारी मिळत असते.काहीतरी आत्मसात करण्याची जिद्द निर्माण होत असते ,आणि या जिद्दीने आकाशामध्ये उंच भरारी घेऊन जोपर्यंत यश त्यांच्या पुढ्यात आणून ठेवत नाही तोपर्यंत सतत कार्यशील राहावे, असे शिक्षक प्रोत्साहन देऊन जिज्ञासा वाढवण्याचे कार्य करत असतात.

एवढे बोलून मी शिक्षक दिनादिवशी शिक्षकांविषयी बोलण्याचे भाग्य मिळाले आणि त्यांच्याविषयी माझ्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा योग आला; अशा आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना विनम्र अभिवादन करून माझ्या छोट्याशा भाषणाला पूर्णविराम देतो.


शिक्षक दिन भाषण ५


"गुरुने दिला ज्ञानरूपी वसा 

आम्ही चालवू पुढे हा वारसा..

आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांविषयी करुणा दाटून आली . माझ्या मनामध्ये शिक्षकांनी जो धडा दिलेला आहे, त्यांच्याविषयी मला भावना व्यक्त करण्यासाठी जो आपला अमूल्य असा वेळ दिला ,त्याबद्दल मी प्रथमतः सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे धन्यवाद मानतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू या ठिकाणी  झाला. त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे जवळपास 40 वर्षे अध्यापन केले आणि भारताचे राष्ट्रपती बनण्याचा मान शिक्षक यांना मिळाला. 

1.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान

विद्यार्थ्यांनी डॉ .राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करावा असे विचारले असता ,त्यांनी सांगितले की माझा वाढदिवस करण्यापेक्षा हा दिवस ' शिक्षक दिन 'म्हणून साजरा केला ; तर तो भारतासाठी अभिमानाचा दिवस असेल.

2. कधीपासून शिक्षक दिन सुरू

अशा पद्धतीने 1962 पासून शिक्षक दिन हा साजरा करण्यात आला .आज सुद्धा शिक्षक दिनानिमित्त खूप उत्साहाचे वातावरण संपूर्ण देशात दिसत आहे.

3. शिक्षकांमुळे होणारे बदल

शिक्षकामुळे आपल्यामध्ये कोणते बदल होतात हे मी आज माझ्या छोट्याशा भाषणा सांगत आहे शिक्षक असल्यामुळे मला संस्काराची शिदोरी मिळाली ते शिदोरी मला आयुष्यभर पुरणार आहे.

अ) नवनवीन ज्ञान देत असतात

नवनवीन काहीतरी शिकत राहण्यासाठी माझ्यात जिज्ञासा निर्माण केली आणि मला एक प्रयोगशील व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

शिक्षक म्हणून त्यांनी जे मला योग्य वेळी संस्कार दिले. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. ते जर नसते तर मी आज या ठिकाणी उभा राहिलो नसतो .

शिक्षक आहेत म्हणून आपले जीवन सुखकारक होण्यासाठी मदत ही होतच असते .

आ) उत्तम नागरिक बनवतात

आपले भविष्य उज्वल करण्यासाठी त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा असतो. हे आपण जाणून घेणे गरजेचे असते ,त्यांनी आपल्यामध्ये एक उत्तम नागरिक बनवण्यासाठी जे जे काही केले तेथे शब्दात व्यक्त करणे शक्य नाही; पण जे आहे ते त्यांचेच आहे, त्यांनी घडवले ,याचा कधीही माझ्या मनामध्ये विसर पडणार नाही आणि त्यांचा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील त्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे.

इ ) ज्ञानदान करत असतात 

शिक्षक म्हणून ज्ञानदान करत असताना  बालवाडीचा शिक्षक आहे की महाविद्यालयाचा शिक्षक आहे हे महत्त्वाचे नसून शिक्षक आहे हेच महत्त्वाचे आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रातील असला तरी ज्ञानदानाचे काम करत असतात. म्हणून महाविद्यालयातील शिक्षक मोठा आणि बालवाडीचा शिक्षण लहान असा भेदभाव समाजामध्ये होता कामा नये त्यांच्याविषयी शिक्षक म्हणूनच आदराचे  नाते असले पाहिजे. 

ई) समतेचे मूल्य रुजवतात 

शिक्षकांमध्ये समता हा गुण दिसत असतो .त्यांना जसे सगळे विद्यार्थी हे सारखेच असतात. सगळी मुले सारखीच आहेत असे समजून सगळ्यांना समान न्याय समान शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतो त्यामुळे शिक्षकांविषयी समाजात चांगले स्थान आहे.

जसा कुंभार मडक्याला घडवण्यासाठी मातीच्या चिखलाला आकार देत असतो. तशीच शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. 

शिक्षकांचे विचार विद्यार्थ्यांना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी ज्या मार्गाने जाण्यास सांगितले असते तो मार्ग आपण अनुसरला तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

बालसंस्कार हे शिक्षकांडून होत असतात त्यांचा विचार कवळ्या मनावर शिक्षकांचे बोललेले विचार प्रभाव पाडत असतात.

ड) अनुकरणशील 

 विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात विद्यार्थ्याना शिक्षकाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत असतात , म्हणून लहान विद्यार्थ्यांवर संस्काराचे धडे देण्यासाठी शिक्षकाची खूप गरज असते, शिक्षक दिन साजरा करणे सुद्धा खूप हितकारक आहे असे मला वाटते. 

मला बोलण्यासाठी संधी दिली. मला शिक्षक दिनाविषयी बोलण्याचा योग आला याचे मी भाग्य समजतो आहे.  माझे छोटेसे भाषण संपवतो. 


शिक्षक दिन केव्हा असतो ?

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असतो.


शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ?

शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.


शिक्षक दिन केव्हापासून सुरू झाला ?

शिक्षक दिन 1962 सालापासून सुरुवात झाला.


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


 राष्ट्रपती कोणते ज्यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


डॉ. डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? केंव्हा?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू या राज्यात झाला.५ सप्टेंबेर १८८८ 


शिक्षक दिन का साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे चांगले अध्यापक, विद्वान ,तज्ञ वक्ते, व्यासंगी राष्ट्रपती होते .अध्यापन करण्यासाठी त्यांची भूमिका चांगली होती .विद्यार्थी प्रिय होते, अध्यापनात त्यांना खूप आवड होती .असे विद्वान डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन असल्यामुळे त्यांचे विद्यार्थी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी तयारी करून लागले आणि त्यावेळेस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले "माझा वाढदिवस साजरा न करता माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल". अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले .तेव्हापासून 1962  पासून शिक्षक दिन साजरा केला जातो.


भाषणाचा सारांश

शिक्षक दिनानिमित्त भाषण देत असताना मलाही खूप आनंद होत आहे की ,आज शिक्षक म्हणून ज्यांनी ज्यांनी मला घडवले त्यांचा मी खूप ऋणी आहे .आज शिक्षक दिनानिमित्त मला त्यांच्या स्मरणात राहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्याच आशीर्वादाची गरज भासली आणि त्यांचा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तसेच आपणही शिक्षक दिनानिमित्त का होईना आपण शिक्षकांविषयी आदर ,सन्मान ठेवला पाहिजे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area