Google ads

Ads Area

शिक्षक दिन निबंध मराठी |teacher day essay in marathi

शिक्षक दिन निबंध मराठी |teacher day essay in marathi 

शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांपर्यंत आदरभाव निर्माण होत असतो गुरु शिष्य संबंध, विद्यार्थी शिक्षक संबंध आणि समाजात असलेली शिक्षकाची भूमिका, सर्व समाजाला शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. आज आपण शिक्षक दिनानिमित्त शिक्षक दिनाविषयी निबंध पाहणार आहोत.

शिक्षक दिन निबंध मराठी
शिक्षक दिन निबंध मराठी

अक्र 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य

कालावधी व विशेष

1

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म

5 सप्टेंबर 1888

2

राधाकृष्णन यांचा मृत्यू

17 एप्रिल 1975

3

उपराष्ट्रपती

1952 - 1962 

4

राष्ट्रपती

1962 - 1967

5

शिक्षणातील योगदान

पाश्चात्य विचारांच्या तात्विक,विचारांच्या गुणात्मक, तर्कशुद्ध ,आणि रचनात्मक टीकासाठी ओळखले जात

6

बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू

1939 - 1948 

7

सोनियेत युनियन मध्ये भारताचे दुसरे राजदूत

1949 -  1952 

8

तत्त्वज्ञान

अद्वैत तत्वज्ञान 

9

राजकीय पक्ष 

भारतीय काँग्रेस पक्ष


10

पुरस्कार

भारतरत्न 1954  ,नाइटहूड 1931 

11

ग्रंथसंपदा

60 पेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके

12

पत्नीचे नाव

सिवाकामुअम्मा 

13

अपत्ये 

पाच मुली एक मुलगा ( सर्वपल्ली गोपाल ) 



शिक्षक दिन मराठी निबंध (toc)

शिक्षक दिन मराठी निबंध :१ (१००शब्द)|teacher day essay in marathi 100 word 

शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण होत असतो. या आदरभावामध्ये आपल्याला ज्यांनी घडवले अशा शिक्षकांविषयी अनेक वेळा आपण नतमस्तक होत असतो. शिक्षकांचे आपल्यावर खूप ऋण असते.

शालेय जीवनातील आपल्याला घडवण्याचा त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांनी जरी त्यांच्या शिकवण्याचा, अध्यापनाचा पैशाच्या स्वरूपत मोबदला घेतला असला ;तरीही शिक्षक- विद्यार्थी यांचे नाते खरोखरच मोलाचे असते. 

शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी भरपूर कष्ट असते; म्हणूनच विद्यार्थीही आपले ज्ञान पुढे पुढे वाढवत राहतो .चांगले मार्गदर्शन मिळाले तर शिक्षकांना समाजात चांगले स्थान मिळाले आहे. शिक्षक एक संस्काराची शिदोरी असते आणि ती शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिक्षक करीत असतात ,म्हणून शिक्षकांविषयी आपण नेहमी विनम्र अभिवादन करण्यात कमीपणा वाटू द्यायचा नाही. त्यांच्यामुळेच आपण आज या स्तरावर पोहोचलेलो आहे.


हे पण वाचा ➡️ शिक्षक विद्यार्थी संबंध कसे असावेत 


शिक्षक दिन मराठी निबंध २ (२०० शब्द)|teacher day essay in marathi 200 word 

शिक्षकाचे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे .अशा शिक्षकाविषयी आपल्यामध्ये कृतज्ञता भाव असणे गरजेचे आहे. जर आपण शिक्षकांविषयी आधार भाव ठेवला नाही ,त्यांच्या विचाराने आपण गेलो नाही तर आपले नुकसान होत असते यावर आपला विश्वास पाहिजे .

शिक्षक हे कधीही विद्यार्थ्यांचे अहित करत नाहीत .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही गोष्टीचा संकोच न बाळगता भरभरून देण्यासाठी सांगत असतात.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा शिल्पकार असतो. हा शिल्पकार घडवण्यासाठी शिक्षकाला सुद्धा अपार कष्ट घ्यावे लागत असते. या कष्टातून शिक्षक विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत ठेवत असतो. शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अपार प्रेम निर्माण झालेले असते.

मूल जन्मल्यापासून त्याचा पहिला गुरु जरी आईवडील असले तरी शिक्षक हा त्याचा दुसरा पालक, गुरु म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. अशा ह्या शिक्षकांविषयी आपण नेहमी सहानुभूतीपूर्वक त्यांच्या विचाराशी सहमती दर्शवून आपण पुढचे पाऊल टाकत असतो.

समाजामध्ये चांगल्या -वाईट गोष्टी घडत असतात. काही वेळा शिक्षकांविषयी लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण होत असतो; पण असा तिरस्कार आपल्या गुरुविषयी करणे चुकीचे आहे. कारण एखादी घटना कुठे काही घडली तर सगळा दोष हा शिक्षण व्यवस्थेला आणि शिक्षकांविषयी राग व्यक्त केला जात असतो.

 शिक्षक अध्यापन करत असताना कोणत्याच गोष्टीचे दुजाभाव न करता समानतेने वागत असतो. विद्यार्थ्यांवर मूल्य रुजवण्यासाठी तो नेहमी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तन,मन रूपाने आयुष्य खर्च करत असतो.

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे मित्रत्वाचे असणे महत्त्वाचे आहे; कारण शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात थोडीशीही भीती असून नये आणि विद्यार्थ्यांनाही ज्ञानाची शिदोरी देत असताना शिक्षकाच्या मनात कोणताही संकोच येता कामा नये.

खेळीमेळीचे वातावरण असावे आणि त्यातच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरभाव असणे गरजेचे आहे .जर आदरभाव नसेल तर नुसते मैत्रीचे संबंध काहीच उपयोगी पडत नाहीत. म्हणून शिक्षक हा एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असतो .समाजाने ,विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनादिवशी त्यांच्या प्रती शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेणे योग्य ठरेल.


शिक्षक दिन मराठी निबंध :३ (५०० शब्द)|teacher day essay in marathi 500 word 

भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो .त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर असून या दिवशी संपूर्ण भारतामध्ये उत्सहात  शिक्षक दिन साजरा केला जातो. हा शिक्षक दिन का साजरा केला जातो? हे आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत. आ शिक्षक दिनाचे महत्त्व काय आहे? हे ही आपण या निबंधात पाहूया. 

५ सप्टेंबर हा सर्वपल्ली डॉ .राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती आणि महत्त्वाचे एक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ४० वर्षे आपले अध्यापनाचे कार्य चालू ठेवले होते. ते एक विद्वान विद्यार्थीप्रिय ,व्यासंगी व्यक्तिमत्त्व असलेले आदर्श शिक्षक होते. अशा महान विद्युतप्रचूर असणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

सर्वपल्ली डॉ .राधाकृष्णन  यांचा जन्मदिवस असल्याने त्यांचे काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी इच्छुक होते. त्यावेळेस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असा सल्ला दिला की ; "माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माझा जन्मदिवस हा एक शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला तो अभिमानाचा वाटेल". अशा प्रकारे 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो .

शिक्षक दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की, शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांना समतेची वागणूक देऊन ज्ञानाची शिदोरी त्यांच्यासमोर ठेवत असतो. त्यांच्यामध्ये जिज्ञासावृत्ती वाढावी यासाठी शिक्षकांचा अभ्यास असतो. विद्यार्थी घडत असताना जशी आई आपल्या घरातील सर्व मुलांवर सारख्याच प्रमाणात प्रेम करते ,तशाच प्रकारचे प्रेम शिक्षक आपल्यावर करत असतात.

 शिक्षक  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा ठाम विश्वास शिक्षक विद्यार्थ्यांना देत असतात .विद्यार्थी हा कोणीतरी अधिकारी, वैज्ञानिक, समाजसुधारक, व्यावसायिक व्हावा यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे धडे देत असतो. असे संस्काराचे धडे देण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे पवित्र सागर असतो.

 शिक्षकाविषयी आवड निर्माण होईल तेवढेच तो शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना देत असतो. जर विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेण्यास उत्सुक नसेल तर त्यासाठी कधी कधी रागावेल , ओरडेल पण विद्यार्थ्यांचे नुकसान कधीच त्याच्या मनात येणार नाही.

शिक्षक दुजाभाव करत नाही, तो नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नेमून दिलेली  कर्तव्य, जबाबदारी स्वीकारून विद्यार्थी घडवत असतो.

 शिक्षक  विद्यार्थ्यांच्या जीवनात खरा मार्गदर्शक हा शिक्षकच असतो .शालेय जीवनामध्ये जे संस्कार बालमनावर होत असतात तेच संस्कार मोठे झाले तरी ते कधीच विसरू शकत नाही, म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना आपले जे शिक्षक म्हणून लाभलेले असतात ते शिक्षक त्यांच्या कायमच स्मरणात राहिलेले असतात. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढीस लागलेली असते, शिवाय वेगवेगळे क्षेत्र निवडून विद्यार्थी आपली प्रगती करण्याचे ध्येय ठेवलेले असते.

  शिक्षक असल्याने आणि माध्यमिक शाळेमध्ये ज्ञानाची शिदोरी जी लाभलेली असते ती महाविद्यालय शिक्षण घेत असताना त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. समाजात राहत असताना नेहमी आपल्या शिक्षकांनी आपला पाया घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न सफल झाले आहेत असेच वाटत असते.

शिक्षकाचे महत्व आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. आज आपण जे काही घडलेलो आहोत ते केवळ शिक्षकांनी आपल्याला शिकवले, संस्कार दिले यामुळेच आपण घडत गेलो. आहे याचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे. समाजामध्ये शिक्षकाचे महत्त्व अजूनही चांगलेच आहे. आपली भूमिका अशी असली पाहिजे की आपल्याही आजूबाजूच्या मुलांना शाळेविषयी, शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण होईल अशा पद्धतीचे विचार आपण मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे.

 शिक्षक हा विद्यार्थी या नात्याने आपण शिक्षक दिनादिवशी शिक्षकांचे महत्त्व पटवून देत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की, हे  लिहिण्यासाठी मला शिक्षकांनी घडवले यामुळेच मला हे सुचत गेले ,त्याचे श्रेय मला प्रत्येक वळणावर घडविलेल्या शिक्षकांना देत आहे.

म्हणून ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन  माझ्या सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ! शिक्षकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमच असणार आहेत. मी नेहमी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव असेल यासाठी  ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शिक्षकांविषयी  लिखाणास पूर्णविराम देतो.   


शिक्षक दिन केव्हा असतो ?

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असतो.


शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ?

शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.


शिक्षक दिन केव्हापासून सुरू झाला ?

शिक्षक दिन 1962 सालापासून सुरुवात झाला.


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


 राष्ट्रपती कोणते ज्यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


डॉ. डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? केंव्हा?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू या राज्यात झाला.५ सप्टेंबेर १८८८ 


आणखी वाचा 

शिक्षक दिन ५ भाषण उत्कृष्ट 

मी शाळा बोलतेय 

आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्व


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area