Google ads

Ads Area

जगातील सर्वात उंच पुतळा नरेंद मोदींचा| Statue of Narendra Modi

 

जगातील सर्वात उंच पुतळा नरेंद मोदींचा| Statue of Narendra Modi 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा पुण्यात भव्य दिव्य  उभारणार आहेत. यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे, कौतुकाचे, आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
 लवासा हे  ठिकाण अधिकच पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे .जगामध्ये सर्वात उंच पुतळा उभारण्यात  येणार असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

नरेंद्र मोदींना पुरस्कार



 🏷️1 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पुण्यातील अनेक ठिकाणी भेट दिली. पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच पुणे मेट्रो दोन मार्गीकेचे लोकार्पण  करण्यात आले ,शिवाय पुण्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 1200 घरे आणि पुणे महानगरपालिकेने 1650 बांधलेली घरे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली .

 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 6400 पेक्षा जास्त बांधण्यात येणाऱ्या घरांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.

 पुतळ्याची उंची


🏷️मुंबई -पुणे हायवेजवळ असलेले लवासा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरू असून, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. या पुतळ्याची उंची सुमारे 190 ते 200 मीटर उंच असेल अशी माहिती मिळाली आहे.

हा पुतळा उभारण्यासाठी डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ,( DPIL) या कंपनीची मदत होणार आहे . ही कंपनी मोदींचा पुतळा अतिभव्य  उभारणार आहे. हा  पुतळा उभा राहण्यास चार ते पाच महिन्याचा कालावधी असणार आहे.

 31 डिसेंबर 2023 च्या अगोदरच या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शीणा 

भारताचे प्रभावशाली पंतप्रधान असल्याने सगळ्यांचे आधारस्तंभ आणि त्यांचा असलेला दूरदर्शीपणा त्यांच्यात असलेले नेतृत्वगुण, अखंड एकता या सर्व गुणांमुळे हा पुतळा त्यांच्या विचारसरणीला समर्पित करण्यात आला आहे .हा पुतळा देशाच्या भव्य निर्माणाचे एक प्रतीक असणार आहे , त्यामुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे .

राजदूत यांची भेट 


या पुतळ्याचे अनावरण 31 डिसेंबर 2023 पर्यंत होणार असल्याने अनेक देशातील राजदूत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत .त्यापैकी जर्मनी, अमेरिका, सौदी अरेबिया, इस्त्राईल ,फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात या देशातील राजदूत अनावरणाला हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळ्या उभारणार असल्याने याची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे.

लवासा निसर्गम्य ठिकाण 


div>
🏷️लवासा हे ठिकाण पुण्याजवळ निसर्गरम्य परिसरात असल्याने पर्यटकांना अधिकच आकर्षित करून घेत असते. पावसाळ्यामध्ये हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. याच ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारला जाणार असल्याने अनेक पर्यटकांचे लावासा या ठिकाणी भेटी होणार आहेत .देशातील  नागरिकांना लवासा हे ठिकाण परवणीच ठरणार आहे.

लवासा या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार असल्याने जगाचे लक्ष या होणाऱ्या लवासा ठिकाणी आणि पंतप्रधान मोदी यांच्या पुतळयाकडेच लक्ष लागले आहे. लवासा  हे ठिकाण जगातील पर्यटकांना खुणावत आहे.

प्रश्न

१) नरेंद्र मोदी यांना पुण्यात कोणता पुरस्कार देण्यात आला - ==लोकमान्य टिळक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.

2) नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर केव्हा आले होते,?
= 1 ऑगस्ट २०२३

3) लवासा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे 
  =पुणे

4,) नरेंद्र मोदी यांचा पुतळा लावासा या ठिकाणी कधीपर्यंत अनावरण होण्याची शक्यता आहे.
==31डिसेंबर 2023 अखेर

5) नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारण्यासाठी कोणती कंपनी मदत करणार आहे?
==डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ,( DPIL)

6) नरेंद्र मोदी यांच्या पुतळा साधारण किती उंच असणार आहे?
==सुमारे 190 ते 200 मीटर उंच

🏷️आणखी माहिती पहा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area