Google ads

Ads Area

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी | rakshabandhan information in marathi

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी | rakshabandhan information in marathi


रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेला येत असतो .श्रावण महिना म्हटले की पवित्र महिना समजला जातो .या महिन्यात खूप सण ,उत्सव आणि मंगलमय कार्य करत राहण्यासाठी हा सण आणि महिना मानला जात असतो. या श्रावण महिन्यात नागपंचमी, गोपाळकाला, रक्षाबंधन असे अनेक सण येत असतात शिवाय एखादा ग्रंथ वाचायचा असेल तर तो श्रावण महिन्यातच वाचला जातो आणि अशा या श्रावण महिन्यातील रक्षाबंधन हा एक नात्याला जोडणारा महत्त्वाचा सण आहे . आपण रक्षाबंधन या सणाची माहिती पाहणार आहोत. रक्षाबंधन करत असताना बहीण भावाचे नाते कसे असावे? रक्षाबंधनचे महत्व काय आहे ? साजराकसा करावा हे माहित असणे गरजेचे आहे, ते आपण पाहूया !

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी
रक्षाबंधन सणाची माहिती मराठी




रक्षाबंधन हा बहीण भावाचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो .या सणाला बहीण आपल्या भावाच्या हातामध्ये एक प्रेमाचा धागा बांधत असते .त्यातून भाव हा आपल्या बहिणीचे रक्षण करत असतो ..हा बहीण भावाचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरात अनेक घडामोडी घडत असल्या तरीही या घडामोडी एकमेकांचे दुखावलेले मन, राग, द्वेष ,तिरस्कार हे सगळे या प्रेमाचा धागा बांधत असताना याचा विसर पडत असतो ; म्हणून हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आज आपण राखी पौर्णिमा या सणाची माहिती घेणार आहोत. हा सण का साजरा केला जातो ? या रक्षाबंधनाचा इतिहास काय आहे ? याचे धार्मिक महत्त्व काय आहे.?या सणात होणारे नवनवीन बदल काय आहेत हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.


गुढीपाडवा सण माहिती वाचा 

रक्षाबंधन माहिती (toc)

रक्षाबंधन सणाचे महत्त्व |rakshabandhan sanache mahattv 


राखी पौर्णिमा हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा करत असतात . हा सण साजरा करत असताना काही भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे असलेली दिसून येतात. भारतीय संस्कृतीच्या सणामध्ये हा सण भाऊ बहिणीसाठी महत्त्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात उत्तर भारतामध्ये 'कजरी पौर्णिमा' असे म्हटले जाते. तर पश्चिम भारतामध्ये 'नारळी पौर्णिमा' या नावाने सण साजरा करत असतात .

नागपंचमी सणाची महिती.👈  पहा 

नाते टिकून राहते 

या सणात बहिणीने भावाला राखी त्याच्या मनगटावर बांधून बहीण भावाचे प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. नात्यातील गोडवा टिकून राहावा म्हणूनही असा सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन सण साजरा करत असताना बहीण भावाला छोटा भाऊ असो किंवा मोठा असो तो आपला आनंद भाऊला राखी बांधण्यात खूप असतो . तसा आनंद इतर सणांमध्ये स्त्रियांना भावासाठी नसतो .खरंतर हिंदू प्रथेनुसार असे सण उत्सव साजरे होणे खूप गरजेचे असते . या सणाला बहीण ही कितीही लहान असो किंवा मोठी असो किंवा सासरी गेली असली तरीही एक दिवस का होईना ती आपल्या भावासाठी राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी जाण्यासाठी खूप उत्सुक असते. 

वट पौर्णिमा सणाची माहिती 

आनंदाचा सण 

तिच्यासाठी हा दिवस म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखामध्ये साथ देणारा भाऊ हा  संसारात व्यस्त असला तरी नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा असा सण साजरा करण्यासाठी उत्सुकता असते, असेही त्यामागे कारण आहे. 


  असेही असते की बहीण मोठी आणि भाऊ लहान असतो, तरीही आपला भाऊ जरी बहिणीचे रक्षण करण्यासाठी सज्ज नसला, सक्षम नसला तरीही त्याच प्रेमाने त्याच आवडीने त्याच उत्सुकतेने बहीण राखी बांधण्यासाठी उतावीळ झालेली असते. भाऊही अशा बहिणीकडून  राखी बांधण्यासाठी आल्यानंतर तिला काही ना काही तरी माहेरची आठवण म्हणून भेटवस्तू याचे स्मरण म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे देत असतो .


होळी धुलीवंदन सणाची माहिती वाचा 


माहेरची ओढ 

राखी बांधण्यासाठी बहिणीला यामध्ये प्रेमाचा थोडासा दिलासा भेटत असतो. मायेचे चार शब्द माहेरच्या लोकांना आवडीने बोलून येण्यातच धन्यता मानत असते. भावाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नसते .परंतु वर्षानुवर्षे माझ्या भावासाठी राखी बांधण्यासाठी मला येता यावे, यासाठी ती भगवंताकडे मनोमन प्रार्थना करत असते .


भावाने तिच्यासाठी खूप महागडी साडी किंवा इतर मौल्यवान वस्तू घ्यावी अशी अपेक्षा बहिणीला नसते .भाऊ माझा चांगला सुखा- समाधानात राहावा अशीच फक्त अपेक्षा ती बाळगत असते


आशीर्वाद मिळत असतो 

भावालाही या दिवसात बहीण येणार म्हणून तो आनंदाने सण साजरा करण्यासाठी तिच्यासाठी आवडीने काही ना काही तरी देण्यासाठी त्याची धडपड चालू असते. घरात कितीही आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरीही तो काही ना काही तडजोड करून या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडत असतो. बहिणीचा आशीर्वाद घेणे हे सुद्धा याच सणाला अधिक योग जुळून आलेला असतो .तसेच बहिणीलाही भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी असा योग जुळलेला असतो. म्हणून या राखी पौर्णिमेचे महत्त्व आपणास अधिक सांगता येईल .

अक्षय्य तृतीया सणाची माहिती वाचा

दोन कुटुंबाला एकत्र आणतो 

रक्षाबंधन दोन कुटुंब एकत्र येण्यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. बहिण -भाऊ हे जरी एका रक्ताचे नाते असले तरीही संसारामध्ये व्यस्त असणारे बहिण भाऊ काही कालानुसार त्यांच्यामध्ये काही ना काही मन दुखावेल अशा घटना घडत असतात परंतु अशा घडामोडी जरी घडत असल्या तरीही राखी पौर्णिमा असा हा सण आहे की मनात कितीही राग, द्वेष असला तरीही भावासाठी भावाच्या सुखा समाधानासाठी बहीण राखी बांधण्यासाठी थोडा वेळ का होईना त्याच्या संसारात येऊन सुखदुःखाची विचारपूस करून आनंदाने सासरी जात असते ,म्हणून हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अत्याचारास आळा बसतो

रक्षाबंधन या सणामुळे समाजात काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक ही असतात .अशा वेळेस अशा या दृष्ट प्रवृत्ती बाळगणाऱ्या व्यक्तीलाच राखी बांधली तर तो त्या बहिणीचा स्वीकार करत असतो. त्यामुळे बहिणीकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही किंवा भावाच्या मित्रांना राखी बांधली तर मित्रही मित्राच्या बहिणीकडे  बहीण म्हणून पाहत असतो .त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत आणि इतरांनाही या प्रवृत्तीपासून दूर ठेवत असतो .त्यामुळे समाजात राखीचे महत्व खूप आहे म्हणून रक्षाबंधन हा सण बहिण भावाचे अतूट नाते सांगणारा जरी असला तरी समाजामध्ये घातक प्रवृत्तीला ,अत्याचाराला या रक्षाबंधन सणामुळे आळा बसला आहे.



रक्षाबंधन सणाचा इतिहास |rakshabandhan sanacha itihas| history of rakshabandhan


रक्षाबंधन प्राचीन काळापासून राखी बांधणे चालू आहे. आपण महाभारतामध्ये ही गोष्ट पाहिलीच आहे, श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची कथा सर्वांना माहीत आहेच ज्यावेळेस श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती त्यावेळेस पांडवांची पत्नी द्रोपदीने  साडीची किनार काढून श्रीकृष्ण यांच्या बोटाला बांधली . जेणेकरून त्यातून रक्तस्त्राव हा बंद व्हावा, तिने आपल्या मौल्यवान साडीची कोणतीही पर्वा न करता क्षणाचाही  विलंब न करता श्रीकृष्णाच्या बोटाला साडीची किनार बांधली . हेच प्रेमाचे ऋण प्रेमाचा धागा समजून श्रीकृष्ण हा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच कथा सांगितली  जाते की चित्तोडगढ या ठिकाणची राणी कर्मावती बहादूरशाह यापासून संरक्षण व्हावे यासाठी मुघल बादशहा हुमायूला राखी बांधली. राखी बांधल्यानंतर राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी मुघल  बादशहा हुमायून याने राणीचे रक्षण करण्यासाठी आपली  जबाबदारी स्वीकारली त्याच रक्षणासाठी नेहमी सज्ज राहत असे.



रक्षाबंधन सणाचे धार्मिक महत्व | rakshabandhan dharmik sanache mahattv 


 रक्षाबंधन हा सण म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधून भावाने बहिणीचे रक्षण करणे असे जरी असले तरी सर्व महिलांचे रक्षण करण्यासाठी अशा धाडसी पुरुषाकडून रक्षण करणे हा धर्म समजला जातो. आपल्या देशात परकीय  होणारे आक्रमण आणि त्यातच स्त्रियांना होणारा त्रास यासाठी स्त्रियांचे रक्षण व्हावे यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. परकीय आक्रमण थांबवण्यासाठी बहीण आपल्या भावाच्या मनगटात राखी बांधून त्याचेही रक्षण व्हावे म्हणून राखी बांधली  जात असे. या सणाला धार्मिक धार्मिक महत्त्व आहे. 

तसेच हा सण कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा म्हणून खूप महत्त्वाचा मानला  जातो .याच दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्रापासून संपत्ती धन दौलत कोळी लोकांना मिळत असते, म्हणून समुद्राला नारळ अर्पण करत असतात. श्रावण महिना हा सर्व महिन्यातील एक महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात पूर्ण महिनाभर श्रद्धावान लोक महिनाभर उपवास करत असतात ,काही शुभ मुहूर्त या महिन्यात काढत असतात तर काहींना घरामध्ये  पुराण ग्रंथ वाचून महिनाभर त्याची आराधना केली जाते . संपूर्ण महिना हा लहानापासून मोठ्यापर्यंत कोणताही मांसाहार  न करता कडक पाळला जातो , असे काही लोक करत असतात आणि अशा श्रावण महिन्यात रक्षाबंधन अगदी उत्सवात साजरा केला जातो. त्यामुळे रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्व खूप आहे.


बहीणभावाचे नाते जपण्यासाठी आपण घ्यावयाची काळजी 


आजकाल सगळीकडे स्वार्थ भरलेला असतानाही रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. बहीण ही स्वतःच्या संसारात व्यस्त असली तरीही एक दिवस का होईना ती  भावासाठी माहेरी जाऊन राखी बांधून येत असते. या ठिकाणी भावाकडून बहिणीला कोणतीही अपेक्षा नसते. तर भावालाही असे वाटत असते की बहिणीने येऊन आपल्या सोबत चार घास खाऊन तिच्या संसारातील होणाऱ्या घडामोडी, उत्कर्ष आनंदाने ऐकत असतो .


 मात्र सासरचे लोक बहिणीला भावाकडून वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळावा यासाठी तगादा लावून राहिलेले असतात. यामुळे बहिण भाऊ यांच्या नात्यांमध्ये घट आलेली अनेक उदाहरणे पाहिला मिळत आहेत . तसेच जसे बहिणीला  भावाने वडिलोपार्जित संपत्ती देण्यासाठी नकार दिला तर त्यांच्यातील नातेसंबंध संपुष्टात येण्यास सुरुवात होत असते. जरी बहिणीला संपत्तीचा वाटा दिला तर स्वतःच्या पत्नीलाही वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा मिळावा यासाठी अट्टहास  केला जात असतो. त्यामुळे या वडिलोपार्जित संपत्ती वरून अनेक वाद सध्या निर्माण होताना दिसत आहेत . यामधून बहीण आणि भाऊ दोघांच्या विचाराने आणि समजूतदारपणाने या वाटाघाटी होऊन कुठेतरी थांबले पाहिजे आणि या पवित्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने का होईना एकत्र येण्यासाठी त्यांना योग चांगला जोडून आलेला असतो. अशा या घडामोडी कितीही घडत.

 रक्षाबंधन या सणाने बहिण भाऊ एकत्र येण्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. राखीचे  महत्व या दिवशी खूप असते. राखी ही केवळ आपल्याच भावाला बांधावी  असा नसतो. आपल्या भावाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला आपण राखी बांधत असतो आणि हे नाते कायमस्वरूपी भाऊ-बहीण म्हणून टिकत असते तसे ते टिकवण्याचा प्रयत्नही केला जातो .

रक्षाबंधन या दिवशी सर्वजण गोडी गुलाबी ने राहत असतात. बहिणीसाठी गोडधोड जेवण करून तिच्या मुलाबाळांसह खायला घालणे हा भावासाठी अत्यंत आवडीचा सण असतो. सुखदुःखात साथ देणारी बहिण ही आपली पाठीराखी असते याचा विसर या रक्षाबंधन सणामुळे पडत नाही.

 Rakshabandhan date |रक्षाबंधन केव्हा आहे,?


यावर्षी अधिक मास असल्यामुळे रक्षाबंधन नेहमीप्रमाणे उशिरा येत आहे. यावर्षी 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन आहे .या दिवशी बुधवार हा वार आला आहे.

रक्षाबंधननाची वेळ काय आहे ?  What is timing raksha Bandhan 2023

यावर्षी रक्षाबंधन भाद्र कालावधी मध्ये येत आहे .30 ऑगस्ट ला रक्षाबंधन असून याचा कालावधी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत असणार आहे. रक्षाबंधन भाद्र टप्पा संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होणार असून त्या दिवशी रात्री आठ वाजून अकरा वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन भाद्रची सांगता रात्री नऊ वाजता होणार आहे .

भद्रकाल म्हणजे काय? What is meaning of Bhadra


भद्रा असलेल्या काळाला भद्रकाल म्हणतात. या काळात कोणत्याच प्रकारची शुभ कार्य करण्यास मनाई असते.
भद्राकाळ हा अशुभ काळ किंवा अपवित्र काळ मानला जातो. या काळात कोणतेही चांगले काम करणे टाळणे चांगले असते. भद्राच्या शरीराच्या भागांच्या स्थानानुसार अशुभ आणि शुभ कार्याची विभागणी केली जात असते.

रक्षाबंधनाचा मुहूर्त|raksha Bandhan muhurat


राखी बांधणेचा कालावधी जाणून घ्या. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्या संपूर्ण दिवशी भद्रा आहे. रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हा कालावधी आहे. म्हणजेच या काळात राखी बांधू नये ,असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच सर्वसाधारणपणे 30 ऑगस्ट च्या रात्री नऊ वाजलेपासून 31 ऑगस्टच्या सकाळी सात वाजेपर्यंत राखी बांधता येईल, असे शास्त्रामध्ये सांगितले आहे.


आणखी वाचा

शिक्षक दिनाची माहिती 

One day marriage वाचा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area