१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन|15 Augast sutrasanchalan |76 वा स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन
@सुस्वागतम ! सुस्वागतम ! सुस्वागतम
...............................................
नमस्कार ! शुभ प्रभात ! आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा विशेषदिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत .आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्याचा आनंद हा गगनात मावेना .म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांना आवाहन केले होते . आजह आपण 76 वा स्वयंत्रय दिन साजरा करत आहोत .
सर्वप्रथम तुम्हाला मी ...15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात करतो .
आपला भारत देश जगात सर्वश्रेष्ठ असून या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले हे आज अनुभवत आहे .ज्यांनी या मातृभूमीसाठी आपले प्राण पणास लावले अशा महान क्रांतिकारक ,देशभक्त ,समाजसुधारक यांना कृतज्ञता व्यक्त करतो .
भाग्यवान म्हणून स्वातंत्र्याचा उपभोग घेतो
भाग्यवान म्हणून स्वतंत्र राज्याचा आदर करतो
ज्यांनी भारतभूमी रचली, प्राणपणास लावले
ज्यांनी भारतभूमीसाठी आयुष्य वेचले
त्यासी चरणी नतमस्तक होतो ...
अशा महान कार्य कर्तुत्वान देशबांधवांना अभिवादन !
मी ..... सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो ,आपल्या कार्यक्रमास सुरुवात करतो.
स्थानपन्न होण्यास आग्रह ..
हम तो निकल गये थे
अपनी की ख्वाईश की तरह
हमे न पता चला की
मकरंद ही क्या है
आपसे मिलते ही पता चला
अपने की अंदर का सारापन है
आणि तुम्ही आम्हास अध्यक्ष म्हणून लाभला हे आमचे परमभाग्य !
श्री ........ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ...
अध्ययनरूपी संस्कार घेऊन उद्याच्या जगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्याचं धाडस आपल्याला मिळावे यासाठी आपल्याला नेहमी सत्कार्य ,संस्कार घडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन हवे असते; म्हणून आजच्या कार्यक्रमात ........ हे मार्गदर्शक म्हणून यांनी स्थानापन्न व्हावे / स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती आग्रहाची करतो .
असतो मा सदगमय ..तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय मां विधाविषामहें
वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टीकडे,अज्ञानातून प्रकाशाकडे मरणशीलतेकडून अमरत्वाकडे नेणारे असे कुशल ,नेत्तुत्वगुण असलेले म्हणजे ज्यांचा व्यासंग मोठा आहे त्यांनी आपल्या मौलिक विचारातून आम्हाला मार्गदर्शन करणारे.....
आजचे प्रमुख पाहुणे...... यांनी स्थानापन्न व्हावे अशी मी आग्रहाची विनंती करतो ...
# दीपप्रज्वलन :
ज्योत तेवते समानतेची ,त्यागाची आणि शौर्याची
ज्योत तेवते क्रांतीची अन समर्पणाची
ध्वजप्रतीक बलिदान ,शांती अन समृद्धीचे
ध्वज प्रतीक गतिमानतेचे अन एकतेचे
माणुसकी धर्म हे नाते माझ्या देशाचे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो ,की त्यांनी सरस्वती पूजन , ईशपूजन / प्रतिमापूजन / दीपप्रज्वलन करावे .
मी अशी विनंती करतो की .......यांनी ध्वजपूजन करुन ध्वज वंदन करावे .
order
एक साथ सावधान ,विश्राम ,सावधान
प्रमुख पाहुणे झेंडावंदन करतील
झेंडा फडकवितात.
राष्ट्रगीत आणि झेंडावंदन घ्यावे.
सर्व पाहुणे आणि विद्यार्थी यांनी आपल्या स्थानी बसून घ्यावे अशी मी विनंती करतो
जपून राहावेत आमचे नाते
येवो समृद्धी दारी ,वाढो आनंद मनोमनी
उजळत राहो सदा विजयी पताका
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी मंगलमय क्षणी
तुम्हासाठी हा आनंदाचा स्वागत सोहळा..
/
मी झेंडा बोलतोय वाचा
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष.... यांचे स्वागत.... हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे... यांचे स्वागत ... हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो ..
तसेच इतर पाहुणे आणि मान्यवर यांचे स्वागत .....करतील
स्वागत गीत :
"भावना हृदयात (मनात ) तयार होतात शब्दांच्याच रूपाने त्या हृदयातून ओठावर येतात त्यातूनच साकारल्या जातात खऱ्या हृदयाच्या भावना."
अशाच शब्दसुमनाने भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत....
स्वागत गीत :
स्वागत अतिथी स्वागत तुमचे..........
पाहुण्यांचा परिचय:
माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख आचार, विचार आणि उच्चार यांनीच होते म्हणून आपल्या येथे आलेल्या पाहुण्यांचा परिचय होणे गरजेचे आहे त्यासाठी मी ... यांना आमंत्रित करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा..
परिचय करुन झाल्यावर:
असे हे आपणाला थोर व्यक्ती लाभलेले आहेत . त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वर्षाव होण्यासाठी आपण उत्सुकतेने वाट पाहत आहे.
प्रस्ताविक :
मानवी जीवन जगत असताना प्रत्येक कार्यास उद्देश असला तर त्यास अनन्यसाधारण महत्त्व आलेले असते कोणत्याही कार्य हाती घ्यायचा असेल तर त्यासाठी उद्देश काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ह्या कार्यक्रमाचे उद्देश माहित असणे आवश्यक आहे .
उद्देशाशिवाय आपले जीवन परिपूर्ण होऊच शकत नाही कारण उद्देश असेल तरच यशाची असते खात्री असते आपल्या कार्यक्रमालासुद्धा विशिष्ट असा उद्देश आहे तोच प्रास्ताविकातून आपण जाणून घ्यायचा आहे.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक .......यांनी.सादर करावे अशी मी त्यांना विनंती करतो..
विद्यार्थी भाषण : मी आदर्श विद्यार्थी बोलतोय वाचा
आपल्या शाळेतील हुशार ,नम्र ,अतिशय चाणाक्ष असलेला इयत्ता.....मधील ,.........सगळ्यांचा आवडीचा आदर्श विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे.
धन्यवाद ......
शिक्षक भाषण : मी मुख्याध्यापक ,
आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक, विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय असलेले आपणासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत..
इतर सांस्कृतिक कार्यक्रम : कवायती ,लेझीम,मनोरे ,पथनाट्य ,नाटिका यापैकी काहीही असेल ते ...
ये मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी
अशा या भारत भूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होय .या स्वातंत्र्य दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे आज अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे .
आपल्या आजच्या कार्यक्रमास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनास आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आपले विचार व्यक्त करतील त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ..
यानंतर आपल्या कार्यक्रमास आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले ........... हे मार्गदर्शन करतील.
अध्यक्ष भाषण
जीवनात यशस्वी होणे प्रत्येकाच्याच हाती असते असे नाही पण प्रयत्नावादी कधीही अपयशी होत नाहीत म्हणून ..
गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी
सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी
पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी
फुलाकडून सुवास घ्या, दुःखात सुद्धा हसण्यासाठी
काट्याकडून धार घ्या ,अन्यायाच्या नाशासाठी
वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतीपथावर अग्रेसर
होण्यासाठी
( एका थोर कवीची कविता )
असेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याकडून जीवनात विचार घ्या माणूस बनण्यासाठी. तुम्हास सर्वांना नक्कीच स्फूर्तीदायक आनंद प्रेरणा मिळेल म्हणून मी कार्यक्रमाचे अध्यक्ष .........हे भाषण करतील .अशी मी त्यांना विनंती करतो....
अध्यक्ष भाषण :@
अनेक कामांमध्ये एकात्मता हीच आमची शान आहे आणि याचसाठी माझा भारत देश महान आहे ,देश विविध गंधाचा ,आदेश विविध ढंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, माझा भारत देश महान आहे.
अशा या महान देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत.
जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वह भारत देश है मेरा
आपला भारत महासत्तांक बनण्यासाठी प्रत्यक्षात कृती आणण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणे आवश्यक आहे . प्रत्येकाच्या मनात देश भावना जागृत होणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी समर्पण ,त्याग आणि भारताचे ब्रीद म्हणजे सत्यमेव जयते या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत .
आभार प्रदर्शन
पावसाच्या सुगंधाने पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसाच्या सानिध्याने मन आनंदी होते आणि नाते घट्ट होते ,म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते . तुमचे प्रेम ,आपुलकी ,स्नेह अशीच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते .
पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते .
खरं तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात कारण स्वतंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे पण स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ......हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो .
अशा अथक परिश्रमाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे . म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की, आपणही असे महान , वीर, थोर व्यक्ती भारताच्या भूमीसाठी लढले, झटले ,बलिदान दिले त्यांचे आज कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूया .
भूल न जाना भारत मा के सपूतो का बलिदान
इस दिन के लिए हुए थे जो हंसकर कुरबान
आजादी की ये खुशिया मना कर लो ये शपथ की
बनायेंगे देश भारत को और भी महान
प्रश्नावली
आणखी वाचा