जागतिक लोकसंख्या दिन 2023 | world population day 2023
संपूर्ण जगात 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संपूर्ण जगाला लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या समस्या त्यामुळे या वाढणाऱ्या लोकसंख्येकडे लक्ष वेधून त्यावर विचारमंथन केले जात असते. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाचअब्ज वे बालक युगोस्लाव्हिया या ठिकाणी जन्माला आले, यामुळे वाढणारी लोकसंख्या यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली . या लोकसंख्या वाढीवर काहीतरी नियंत्रण असले पाहिजे असे सर्वच लोकांना वाटू लागले असल्यामुळे संपूर्ण जगात यावर विचार होऊ लागले . त्याच वेळेस युनोने सुद्धा या विचारावर दखल घेऊन 1989 सालापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला.
#11 जुलै चे महत्त्व | 11 jully information
लोकसंख्या वाढ ही जगाच्या पातळीवर खूप मोठी समस्या बनली आहे .ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण बेरोजगारी, महागाई, अत्याचार, भ्रष्टाचार,दारिद्र्य या सगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अशा समस्यांना तोंड देणे प्रत्येक देशाला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे; म्हणून लोकसंख्या दिन पाच अब्जावधी बालक जन्माला आल्यावर पाच अब्जावधी पूर्ण झालेल्या बालकाचा जन्म म्हणजे लोकांमध्ये या प्रचंड वाढत असलेल्या लोकांना याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक आहे; नाहीतर संपूर्ण जगाला या लोकसंख्या वाढीमुळे अनेक गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे ,हे वेगळे सांगणे गरजेचे नाही .
11 जुलै लोकसंख्या दिन साजरा का करतात,उद्देश काय ?
संपूर्ण जग हे लोकसंख्या वाढीमुळे त्रस्त आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत सुख सुविधा पोहोचवणे हे गरजेचे असूनही लोकसंख्या वाढीमुळे हे होत नसल्याने भरमसाठ वाढलेली लोकसंख्या ही आटोक्यात आणणे हा महत्त्वाचा उद्देश आहे
लोकसंख्या कशी नियंत्रणात ठेवावी ..
लोकसंख्या वाढीमुळे अनेकांना बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई भ्रष्टाचार ,रोगराई ,सुविधांचा अभाव या मिळत नसल्यामुळे 11 जुलै या लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने दिलेले कायदे, नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. शासनाने जे कायदे नियम दिले असतील त्यानुसार प्रत्येक देशाच्या नागरिकांनी या कायदे नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे .लोकसंख्या ही गेल्या दोन दशकापूर्वी भरपूर प्रमाणात वाढलेली दिसून येते. जसजसे लोकांमध्ये जनजागृती आणि समस्याचा सखोल विचार केला असता लोकसंख्या वाढीस थोडेफार का होईना मदत होऊ लागली आहे . प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरापासून ही लोकसंख्या वाढत जाते ते नियंत्रणात आणले पाहिजे . काही देशांमध्ये "एकच अपत्य' हे ग्राह्य धरले आहे .आपल्या भारत देशात "हम दो हमारे दो हे मान्य केले आहे यामुळे दोनपेक्षा अधिक मुले जन्माला आली तर तर त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला शासकीय योजनांचे कोणतेही लाभ मिळत नाहीत . अनेक सुविधांपासून अलिप्त राहावे लागणार असल्यामुळे 'हम दो हमारे दो" हे या विचारानुसार लोक आपला उदरनिर्वाह कसा भागेल आणि मुलांचे संगोपन कसे केले जाईल याचा विचार करा लागले आहेत . काही लोकांना वंशाचा दिवा मिळावा यासाठी 10 मुली झाल्या तरी वंशाचा दिवा म्हणून मुलाचा जन्म होईपर्यंत वाट पाहावे लागत. तशीही कृती होत असल्याने लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे हे थांबवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत याचा पाठपुरावा करणे प्रत्येक देशातील नागरिकांनी ठरवले पाहिजे.
खालील आकडेवारी वाचा
★★जगाची लोकसंख्या किती आहे
सुमारे 8 अब्ज आहे
जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ?
किती आहे ?
>>>> चीन ,सुमारे 1अब्ज 42 कोटी
★★ भारताची लोकसंख्या सुमारे 1अब्ज 39 कोटी आहे .
जगात कितवा क्रमांक आहे ?
>> भारताचा दुसरा क्रमांक आहे
चीनच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो .
काही दिवसांत चीनच्या पुढे जाण्याची शक्यता आहे .
★★ भारताने लोकसंख्येच्या बाबतीत जगातील किती क्षेत्र व्यापले आहे .
भारताने जगातील भूमीपैकी 2.4 क्षेत्र व्यापले आहे .
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या बाबतीत भारतात 17.5℅ लोक आहेत
★★ सर्वांत कमी लोकसंख्या असलेला देश
व्हेटिकीन सिटी
क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे
लोकसंख्या सुमारे 800 आहे .
भारतात जास्त लोकसंख्या असलेली शहरे
मुंबई, कलकत्ता ,दिल्ली
महाराष्टाची लोकसंख्या किती आहे ?
सुमारे 12 .63 कोटी आहे
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर
>>मुंबई