रयत शिक्षण संस्था माहिती | RAYAT SHIKSHAN SANSTHA INFORMATION
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला तर त्यांचे निधन 9 मे 1959 रोजी झाले.
या संस्थेत सुमारे 700 संस्था असून साडेचार ते पाच लाख पर्यंत विद्यार्थी संख्या शिकत आहे .कर्मचारी 17000 आहेत. ही शिक्षण संस्था छोटेसे रोपटे असलेले आता महावटवृक्ष झालेला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रयत शिक्षण संस्था मोठी आहे.
🏷️कर्मवीर यांचा विवाह
कर्मवीरांचे लग्न वयाच्या 25 व्या वर्षी झाले. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यावेळेस त्यांचे वय 12 वर्षाचे होते. त्यांचे घराणे प्रतिष्ठित होते. कर्मवीरांनी आपल्या पत्नीला म्हणजे लक्ष्मीबाईंना 120 तोळे सोन्याचे दागिने घातले होते. कर्मवीर यांनी शिक्षण सोडल्यानंतर ते कोरेगाव या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत लक्ष्मीबाई होत्या. लक्ष्मीबाई यांना वहिनी या नावाने सगळे बोलत असत .
जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग
कर्मवीरांच्या घरी एकदा पाहुणे आले आणि त्यावेळेस कर्मवीर यांचा पाहुण्यांनी अपमान केला . वहिनीसाहेबांना सहन झाले नाही ; म्हणून त्यांनी पतीला जेवण वाढत असताना आपल्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या ताटात पडले आणि त्यांना खूप वाईट वाटले. ते जेवनाच्या ताटावरून उठले आणि त्यांनी मनाशी निश्चय केला. कोरेगाव ते सातारा पायी अंतर चालत आले. त्यावेळेस त्यांना एक कल्पना सुचली की आपण मुलांना शिकवले पाहिजे म्हणून त्यांनी शिकवणे सुरू केली .
शिकवणी चालू असताना आपला उदारनिर्वाह व्हावा यासाठी त्यांना 90 ते 95 रुपये मिळत असेल त्यांनी लक्ष्मीबाईंना कोरेगाव वरून सातारा या ठिकाणी आणले .साताऱ्यात भाऊरावांना अण्णा पाटील या नावाने ओळखले जात होते.
🏷️कर्मवीर यांचे ध्येय
शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होणार नाही ;म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाची खूप गरज आहे म्हणून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली .स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ! कमवा व शिका या मूलमंत्रातून त्यांनी विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न केले . असे कार्य करणाऱ्या भावराव पाटील यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी झाली .
रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्व समाजासमोर मांडली आणि शिक्षण सर्व स्तरातील मुलांनी घ्यावी म्हणून सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये या बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करावी असा ठराव मांडला आणि हा ठराव सर्वांनुमते मान्य झाला.
संस्था स्थापन करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमी शुभ मुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली .
रयत हे नाव का दिले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रजेला रयत म्हणून संबोधित होते आणि जमीनदारही आपल्या स्वतःची मालकी असणाऱ्या म्हणजेच जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास रयत असे म्हटले जात होते; म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी,बहुजन समाज ,शेतमजूर अशांची मुले शिक्षणासाठी पुढे यावेत अशा सर्व स्तरातील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेला रयत शिक्षण संस्था हे नाव सार्थ वाटत असावे म्हणून रयत हे शिक्षक संस्था नाव दिले असावे .
🏷️रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्टे
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचे शिक्षण थांबू नये ,यासाठी संस्था स्थापन केली . या संस्थेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे .
1) कमवा आणि शिका योजना सुरू करणे .
2) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
3) गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
4) विविध धर्मातील मुलांना एकमेकांमध्ये प्रेमभाव निर्माण करणे.
5) एकतेचे महत्व पटवून देणे.
6) बहुजन समाजासाठी शिक्षण प्रसार होण्यासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविणे.
7) स्वावलंबी शिक्षण देणे.
आणखी वाचा 🏷️
ONE DAY MARRIGUE एक दिवसीय विवाह
महाराष्ट्र शासनाचा निर्णय दुधाला हमीभाव