Google ads

Ads Area

सुनील खचकड mpsc ( psi ) परीक्षेत अव्वल | Sunil Khachkhad topper in mpsc ( psi ) exam

सुनील खचकड mpsc ( psi ) परीक्षेत अव्वल |Sunil Khachkad topper in mpsc ( psi ) exam

विद्यार्थी मित्रहो आपले करिअर करत असताना परिस्थिती कधीही आडवी येऊ द्यायची नसते. हे आपण एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम येणारा सुनील खचकड हा अपयश पचवूनही यशाच्या शिखरावर कसा पोहचला नुसता पोहचला असे नसून राज्यात प्रथम आला हे खूप विशेष आहे .या यशस्वी विद्यार्थ्यांची थोडक्यात प्रेरणादायी माहिती पाहूया !





सुनील खचकड psi (toc)


#परिस्थितीवर केली मात आणि psi परीक्षेत अव्वल


प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुनील कचखड एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे. फौजदार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले .

मित्रांनो सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की घरची अत्यंत गरिबी  थोडीशी जमीन ते  ती ही खडकाळ असल्यामुळे उदार निर्वाह कसा करावा असा प्रश्न घरच्यांवर होता. कॉलेजला जाऊन वेळ न घालवता तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेजची फी भरणे, त्या ठिकाणी जाऊन राहणे, हे सगळा खर्च ते परवडणारा नव्हता, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए उत्तीर्ण झालेला सुनील कड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पी.एस.आय परीक्षेत राज्यात पहिला येण्याचे भाग्य मिळवले.



 4 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेलय पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.  या परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अत्यंत दुर्गम भाग असलेला रंजितनगर पाड्यावर राहणारा सुनील कचखड पोलीस निरीक्षक म्हणून राज्यामध्ये प्रथम  आला .




🏷️ जिद्द,प्रयत्न,आत्मविश्वास 

 अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न, चिकाटी, आत्मविश्वास,जिद्द असेल तर यश हे निश्चितच मिळत असते हे सुनील कचखड या व्यक्तीमत्त्वातून आपणास सांगता येते.

 सुनील मुक्त विद्यापीठातून बीए उत्तीर्ण होऊन दोन वेळा अपयश पदरीआले तरीही खचून न जाता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला .


आई -वडील हे रस्त्यावरचे गिट्टी फोडण्याचे काम करत होते . अतिशय दुर्गम भाग असलेला हा सुनील आपले मोलमजुरी करत असे .


अपयश हाच गुरू 

आपली ही परिस्थिती बदलायची असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही हे सुनीलने ओळखले होते , यासाठी  घरी अभ्यास होत नाही हे त्यांनी जाणले आणि थेट त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले. त्या ठिकाणी जाऊन मोठमोठ्या क्लासची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मित्रांच्या बरोबरीने त्यांनी अभ्यास चालू केला . दोन वेळा अपयश आले तरी खचून न जाता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला . वय वाढत असल्याने लग्न करावे अशी आईवडिलांना वाटत होते .




💥नवी मुंबई मनपात गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती  👈


पत्नीची मिळालेली साथ

सुनीलचे स्वप्न पूर्ण व्हावे असेमनात असूनही मनात असतानाही आपल्या सुनीलचे लग्न करावे असे आईवडिलांना वाटले . सुनीलने त्याच्याच आत्याच्या मुलीशी लग्न केले. सुनीलकडे जिद्द आत्मविश्वास चिकाटी,अभ्यासूवृत्ती हे गुण असल्यामुळे त्यांना पोलीस दलात काम करत असलेली आत्याची मुलगी (मेहुणी ) हिच्याशी विवाह केला . सुनीललाही आर्थिक बाजू सांभाळून,सुनीलला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित घर चालवण्यासाठी हातभार लावणारी त्यांची पत्नी उर्मिला यांचाही मोलाचा वाटा आहे . म्हणूनच सुनीलने धावकवीत घवघवीत यश आणले. 


आदर्श उभा केला 

आणि तो राज्यात एका दुर्गम भागातील अशा सुनीलने संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे ,या त्याच्या उत्तुंग यशाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुनील कचखड यांनी आहे. आदर्श समोर ठेवून अभ्यास करण्याचा ध्यास धरावा आणि आपले हे करिअर चांगल्या उत्साहाने आत्मविश्वासाने आणि जिद्द आणि चिकाटीने पूर्ण करण्यासाठी आपणास अशा व्यक्तींचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल त्यात तीळ मात्र शंका नाही ,तर मित्रांनो अशा अनेक व्यक्ती आहेत की परिस्थितीचा बाऊ न करता त्यांनी आपले यश हे अभ्यासाच्या जोरावर कसे ओढून आणले आहे याचाही आपण अभ्यास करणे गरजेचे आहे .


तुम्हीही अशाच पद्धतीचे यश मिळवा अशी अपेक्षा आहे!.




🏷️आमचे इतर लेख वाचा 

अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area