लोकमान्य टिळक छोटे भाषण | lokmanya tilak little speech
- लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै १८५६ रोजी झाला .
- .त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते
- बाळ गंगाधर टिळक यांचे खरे नाव केशव होते हे नाव त्यांना त्यांच्या गावातील ग्राम दैवत केशव यावरून पडले
- गंगाधर हे गावामध्ये खोत म्हणून होते ,संस्कृत गणित विषयात ते पारंगत होते, ते शिक्षक म्हणून काम करत होते .
- त्यांची बदली पुणे या ठिकाणी झाले म्हणून लोकमान्य यांनाही पुण्यात जाऊन अनेक शिक्षकांशी परिचय झाला,
- कॉलेज जीवनामध्ये आगरकर यांची ओळख झाली ते चांगले मित्र बनले.
- त्यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले.. लोकांना संघटित करावे यासाठी वृत्तपत्र याचा आधार घेतला.
- आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते दोघांचे विचार हे वेगळे असले तरी देशनिष्ठा दोघांमध्ये होती.
- .अतिशय परखड हजारजबाबी असलेले लोकमान्य टिळक लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले म्हणून लोकांना ते हवेसे वाटत गेले त्यांच्याशी आदर वाटत गेला म्हणून सर्व लोकांना मान्य असलेले हे लोकमान्य झाले म्हणजेच लोकमान्य ही उपाधी दिली.
- स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा शब्दात लोकमान्य टिळक यांचे विचार जनतेसमोर आले .
- आपल्या अग्रलेखात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ह्या शब्दात विचार मांडत होते; म्हणून त्यांना राजद्रोहाचा आरोप लादला गेला आणि त्यांना तुरुंगात दाबून ठेवण्यात आले .
- सामान्य कायद्यासारखी लोकमान्य यांना वागणूक मिळाली.. याचा परिणाम जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली; म्हणून त्यांना भायखळा येथून पुण्यात येरवडा तुरुंगात आणण्यात आहे.
- लोकमान्य टिळक यांना जनतेवर होणारा अन्याय सहन होत नव्हता म्हणून या अन्यायाला वाचा फोडणे आवश्यक होते यासाठी लोक एकत्र यावे असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी करावे यासाठी आग्रह धरला ..
प्रश्नावली
◆लोकमान्य टिळक यांचा जन्म केव्हा झाला
>>23 जुलै १८५६
◆लोक टिळकांना कोणत्या नावाने संबोधित होते
>>लोकमान्य
◆◆लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय
>>सत्यभामाबाई
◆◆लोकमान्य टिळक यांनी मंडळाच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?
>>गीतारहस्य
◆◆लोकमान्य टिळक यांचे निधन केव्हा झाले
>>1 ऑगस्ट 1920
◆◆लोकमान्य टिळक यांचे लग्न कोणत्या वर्षी झाले
>>सोळाव्या वर्षी
◆◆लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्रे सुरू केले
>>केसरी व मराठा 1881 साली
◆◆फर्ग्युसन महाविद्यालय केव्हा स्थापन झाले
>>1885
◆◆होमरुल चळवळीची ची स्थापना केव्हा झाली
>>1916
◆◆होमरुल चळवळीसाठी कोणाचे सहकार्य मिळाले
>>डॉ.अँनी बेझंट
◆◆लोकमान्य टिळक यांचे खास मित्र कोण होते
>>आगरकर