Google ads

Ads Area

भरतवाक्य कवितेचा भावार्थ l bharatvakya poems meanings l मोरोपंत यांची प्रसिद्ध कविता l moropanthachi poem l सुसंगती सदा घडो कविता अर्थ l susangati sada ghado

                                                      

भरतवाक्य कवितेचा भावार्थ |  bharatvakya poems

meanings | मोरोपंत यांची प्रसिद्ध कविता  | moropanthachi poem | सुसंगती सदा घडो कविता अर्थ |  susangati sada ghado 


                                                      सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो 

कलंक  मतीचा झडो विषय सर्वथा नावडो 


 सदंगघ्रि कमळी दडो मुरडितां  हटाने अडो ;

 वियोग घडता रडो ; मन भवचरित्री जडो ll 


न निश्चय कधी ढळो कूजनविघ्न बाधा टळो 

न चित्त भजनी चळो  मति  सदुक्तमार्गी वळो 


स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो 

 पुन्हा न मन हे मळो  दुरित आत्मबोधे जळो 


मुखी हरी  वसो तुझी कुशलधामनामावली

 क्षणात पुरविल जी  सकलकामना मावली 


कृपा करिशी तू  जगत्रयनिवास दासावरी 

तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सावरी



भरतवाक्य या कवितेत मोरोपंत यांनी संसारी लोकांना कसे वागावे याचा मोलाचा संदेश या कवितेमध्ये दिला आहे..संसार करत असताना कोणत्याही गोष्टीचा खोटा अभिमान धरू नये आणि कोणत्याही मोहाला बळी पडता कामा नये, आपले सत्कर्म करत राहवे आणि भगवंताचा भक्तिमार्ग स्वीकारायचा असा संदेश मोरोपंत यांनी या कवितेत केला आहे ..त्याचा शब्दशः अर्थ आपण खाली पाहणार आहोत..


 

# सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो 
कलंक  मतीचा झडो विषय सर्वथा नावडो 


सुसंगती म्हणजे चांगले संगती सज्जनांची संगती ही सज्जनांची संगती सतत मला घडत राहील आणि ह्या सज्जनांचे चांगले वाक्य चांगले विचार माझ्या कानावर पडू दे म्हणजेच संत सज्जनांचे विचार सतत मला ऐकायला मिळावे असा त्याचा अर्थ होतो. 


 कलंक मतीचा झडो म्हणजेच आपल्या मनाला कोणताही डाग लागता कामा नये विशेष सर्वता न आवडो म्हणजेच कोणत्याही  सहाविकारापैकी एक विषय आपल्या मनाला स्पर्श करता कामा नये,हे जरी असले तरी काम असणार आपल्या मनामध्ये असता कामा नये कामाविषयी सर्वता सगळीकडे नावड निर्माण झाली पाहिजे; तरच आपण संसारात चांगल्या रीतीने अग्रमान होऊ शकतो ..यावरून असे स्पष्ट करता येते की आपण सजनांच्या संगतीमध्ये राहून ह्या कामवा सनेला कुठेही येऊ न देण्यासाठी सज्जनांचेच विचार आपल्या मनामध्ये असले; तर आपल्या मनामध्ये काम हा  कोणताच विचार येणार नाही ..




सदंगघ्रि कमळी दडो मुरडितां  हटाने अडो ;

 वियोग घडता रडो ; मन भवचरित्री जडो l


सदंग्री म्हणजे सज्जनांचे पाय,,

 कमळी म्हणजे कमळफुलात,

 दडो म्हणजे लपावा ,

मुराडीता म्हणजे मागे वळताना 

,हट्टाने म्हणजे हट्टाने,

आडो म्हणजे अडकून राहावे 

,वियोग म्हणजे विरह. 


 याचा अर्थ असा आहे की भुंगा जसा कमळामध्ये गुंतून पडतो त्याला कोणताही वियोग झाला तर तो रडतो कमळाच्या सुगंधाने तो एवढा धुंद झालेला असतो की तो तिथून माघारी फिरू शकत नाही त्याच पद्धतीचे जीवन आपण  सज्जनांच्या संगतीमध्ये घातल्यावर जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. 


 जसा भुंगा कमळामध्ये अडकून राहतो तसा आपण सुद्धा सज्जनांच्या पायाला स्पर्श केल्यानंतर आपण सज्जनापासून दूर राहू शकत नाही एवढा ध्यास  आपण घेतला पाहिजे.. एवढे  आपण परमार्थामध्ये वाहून घेतले पाहिजे; तरच आपण या संसाररुपी  सागरात तरुण जाऊ शकतो..


आपले मन सतत भुंग्याप्रमाणे परमार्थात भक्ती मार्गात भवचरित्रात सतत गुंतून राहिले पाहिजे.. भुंगा जसा कमळामध्ये गुंतून; पडतो तसे आपणही या परमार्थामध्ये भक्तिमय होऊन राहिले पाहिजे..





न निश्चय कधी ढळो कूजनविघ्न बाधा टळो 

न चित्त भजनी चळो  मति सदुक्तमार्गी वळो 


आपल्या मनाने  जो निश्चय केलेला आहे तो कधीही ढळता कामा नये,आपण जी एखादी गोष्ट करण्यासाठी पुढे सरसावतो त्यासाठी आपला निश्चय चांगल्या मार्गासाठी सतत असला पाहिजे ..वाईट माणसाचे विघ्न ट ळून जाऊ दे कोणतेही अडचण येता कामा नये ;असा आपला निश्चय असला पाहिजे.. चांगला विचार समाजासाठी उपयोगी असेल तर त्यातून मार्ग हा निघतच असतो आपले हे विघ्न टळत असते.. 


आपले मन हे भगवंताच्या नामस्मरणापासून कधीही विचलित होता कामा नये.. भगवंताच्या नामस्मरणाचा विसर पडू  द्यायचा नाही.. आपली  बुद्धी, आपले विचार सतत चांगल्या मार्गासाठी वळवले पाहिजेत , आपण जर भक्तीमार्गाचा ध्यास घेतला; भक्तिमार्ग हाच आपल्या ला संसारातून तरुण जाण्यासाठी उपयोगी आहे हे लक्षात घेऊन आपली बुद्धीही चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असते.. चांगल्या  कामासाठी आपण विचार करू लागतो तशा पद्धतीने आपली कृतीही होत असते..





स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो 

 पुन्हा न मन हे मळो  दुरित आत्मबोधे जळो 



स्व तत्व  म्हणजे स्वत्व, आत्मविश्वास 

हृदया म्हणजे हृदयाला

 दुराभिमान म्हणजे खोटा अभिमान 

गळो गळून गेला पाहिजे 

पुन्हा न मन हे मळो म्हणजे पुन्हा हे मन मलीन झाले नाही पाहिजे 

दुरित म्हणजे वाईट कृत्य, वाईट गोष्टी 

आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान

 जळो म्हणजे जळून गेले पाहिजे



स्वतःचे सत्व आपल्या हृदयाला म्हणजेच मनाला कळाले पाहिजे.. आपlले  हित कशात आहे हे आपल्या मनाला समजलं पाहिजे.कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये अभिमान करू नये ,त्याने आपला घात होऊ शकतो ..खोटा अभिमान कधीही टिकत नाही म्हणून आपले सत्व आहे ते आपण जपले पाहिजे.. कधीही कोणत्या गोष्टीचा आपल्या मनाला अहंकार लागता कामा नये, कधीही कोणती गोष्ट चिरकाल टिकणारी नसते ;म्हणून त्या खोट्या भ्रमात राहायचे नाही खोटा अभिमान बाळगायचा नाही..


ब्रह्म सत्य जगंनमिथ्या  याप्रमाणे फक्त ब्रह्म हे सत्य आहे बाकीचे जग हे मिथ्या  आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगायचा नाही ,आपले मात्र सत्व जपत राहायचे एवढेच या ठिकाणी सांगायचे आहे..




मुखी हरी  वसो तुझी कुशलधामनामावली

 क्षणात पुरविल जी  सकलकामना मावली 


मुखी -म्हणजे तोंडात मुखात

हरी -देवाचे नामस्मरण

 वसो -वसु दे 

सकल- सर्व,-अवघी 

कामना- इच्छा, आकांक्षा


आपल्या मुखामध्ये भगवंताचे नाम सतत येत राहीले पाहिजे.. माझे हे जे शरीर आहे ते तुझ्या नामाने  पवित्र झाले पाहिजे ,पावन झाले पाहिजे.. भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला या संसारातून तरुन  जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही; म्हणून मला ह्या संसारात राहून  परमार्थ साधला  पाहिजे.


 भगवंताचे नामस्मरण सतत घडले पाहिजे .त्यामुळे माझे हे जीवन भक्तीमय होऊन जाईल माझे शरीर हे पावन होईल ..तुझ्या ह्या नामस्मरणाने  माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत राहतात. म्हणजे या ठिकाणी नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे भगवंताचे नाम उच्चार  केल्याने आपले सर्व मार्ग, क्रिया भगवंताच्या नावाने चांगल्या घडत जातात.. भगवंताचे नामस्मरण केले तर भगवंत सुद्धा माझ्या मनातील  इच्छा क्षणात पूर्ण करत असतो; म्हणून नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे.. 



कृपा करिशी तू  जगत्रयनिवास दासावरी 

तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सावरी



कृपा -आशीर्वाद  

करिशी -कर

 जगत्रयनिवास दासावरी- तिन्ही जगात ( स्वर्ग ,मृत्यु, पाताळ ) राहणारे दास

प्रगट- दिसणे, प्रत्यक्ष

 निजाश्रीतजना- तुझ्या आधाराची आश्रयाची असल्याची गरज असणारी भक्त 

सावरी- आधार द्यावा, सांभाळावी


हे भगवंता, हे ईश्वरा ! तू आता कृपा कर या दासांवर, तिन्ही जगात राहणारे( स्वर्ग मृत्यू पाताळ ) या ठिकाणी असणाऱ्या भक्तांवर कृपा करत असतो.. तुला शरण आलेल्या तुझा  आधार घेणाऱ्या, जे निराश्रीत आहेत जे तुझी भक्ती करायला आले आहेत, तुला शरण आले आहेत , अशा सर्व भक्तांवर तुझा आशिर्वाद राहू दे त्यांच्यावर कृपा कर आणि त्यांना या भव सागरातून बाहेर काढण्यासाठी मदत कर, तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर सतत राहू दे!


अशाप्रकारे मोरोपंत यांनी सज्जन माणसांच्या संगतीमध्ये राहुल आपला उद्धार केला पाहिजे ..त्यांच्या सहवासात राहून चांगले विचार आपल्या म नावर ठ सविले पाहिजेत.. चांगले विचार आपल्या कानावर पडल्यामुळे आपले भक्तीची वाट सुकर होत असते.. जसा भुंगा  कमळामध्ये गुंतून पडतो, तसा आपला  मार्ग हा परमार्थात लागला पाहिजे, त्यामध्ये गुंतून राहण्यातच खरा आनंद आहे ..


आपले मन हे भक्तिमार्गापासून कधीही विचलित होता कामा नये, कोणतेही संकट आले  तरी ते  टळून जाऊ शकते; जर आपण भगवंताचे नामस्मरण, भजन करत राहिलो तर आपल्याकडे  चांगले विचार येत राहतात.. आपले सत्व आपल्याला कळाले पाहिजे, खोटा अभिमान धरला नाही पाहिजे, आपले मन हे कधीही वाईट मार्गाला जाऊ न देता मलीन होऊ न देता ,आपल्या  मनातील वाईट कृत्य, आत्मज्ञानाने  दूर झाले पाहिजे., आपल्या मनामध्ये सतत नामस्मरण असले पाहिजे, भगवंताच्या  नामस्मरणाने हे शरीर पवित्र पावन झाले पाहिजे अशा या मोरोपंत यांनी असा उपदेश या कवितेमध्ये केला आहे. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area