गोपाल गणेश आगरकर माहिती | Gopal ganesh aagarkar mahiti
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी जन्मलेले महान शिक्षण तज्ञ समाजसुधारक पत्रकार विचारवंत लाभलेले एक महत्त्वाचे समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध असलेले गोपाल गणेश आगरकर . आगरकर म्हटलं की टिळक यांचे नाव आठवते व टिळक म्हटले की आगरकर यांचे नाव आठवतेच असे हे दोन महान व्यक्ती महाराष्ट्राला समाज सुधारण्यासाठी लाभलेल्या आहेत, त्यांची जीवनमूल्य ,सामाजिक समता, विज्ञाननिष्ठा स्त्री -पुरुष समानता तसेच ते बुद्धीप्रमाणेवादाचे पुरस्कर्ते, एक क्रांतिकारी समाज सुधारक म्हणून खतनाम असलेले गोपाल गणेश आगरकर यांची ओळख आज आपण पाहणार आहोत.
गोपाल आगरकर(toc)
#आगरकरांचे बालपण
आगरकर यांचा जन्म टेंभू ,कराड, सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये झाला घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना हलाखीचे दिवस काढावे लागले. कधी त्यांना मामलेदार कचेरीत काम करावे लागले, तर कधी मधुकरी मागून आपले पोट भरून मॅट्रिक पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला डेक्कन कॉलेजला ऍडमिशन घेतले .त्या ठिकाणी त्यांची प्रतिभा शक्ती उपयोगी पडली. अनेक निबंध स्पर्धेमध्ये ,वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन शिष्यवृत्ती मिळवणे आणि बक्षीस मिळवणे यातून त्यांची गुजराण चालत होती.
गोपाल आगरकर माहिती | एका नजरेत |
---|---|
जन्मतारीख | 14 जुलै 1856 |
जन्म स्थळ | टेंबु |
प्राथमिक शिक्षण | कराड |
साप्ताहिक | केसरी व मराठा |
मुख्य कार्य | सामाजिक सुधारणा |
गाजलेली पुस्तके | विकार विलासित |
मृत्यू | 17 जून 1895 |
आगरकर आणि टिळक भेट
आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातच एम ए करत असताना 1879 मध्ये झाली .त्यांनी एकत्र शिक्षण घेतले. दोघांना विष्णुशास्त्री चिपळूणकर हेही मिळाले लोकमान्य टिळक आगरकर चिपळूणकर या तिघांनी केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते.
आगरकर हे केसरीचे पहिले संपादक 1880 ते ऑक्टोबर 1887 ला केसरी वृत्तपत्राचे संपादक सोडले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या मनामध्ये देशाविषयी प्रेम वाढत गेले. भारत हा पारतंत्र्याच्या तावडीतून सुटला पाहिजे, यासाठी दोघांच्या मनामध्ये स्वदेशविषयी प्रेरणा निर्माण होऊन वृत्तपत्र काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले. एम ए झाल्यावर आगरकर चिपळूणकर यांना भेटले त्यावेळेस चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
आगरकर व टिळक यांनी 1881 मध्ये इंग्रजीतून मराठा व मराठीतून केसरी अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. सुरुवातीस आगरकर हे केसरीचे संपादक म्हणून काम करत होते.नंतर सुधारक वृत्तपत्र 1888 मध्ये सुरु केले . पुढे टिळक आणि आगरकर यांनी 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुणे या ठिकाणी केली. त्यानंतर 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि त्याच महाविद्यालयात आगरकर हे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते आणि नंतर प्राचार्यही बनले.
आगरकर यांचे कार्य
आगरकर हे एक महान समाज प्रबोधन करणारे होते. बुद्धीप्रमाणीवादाचा पुरस्कार करणारे होते, आपले मत परखडपणे मांडणारे असे हे आगरकर एक उल्लेखनीय कामगिरी पार पाडण्यासाठी ख्यातनाम होते. विज्ञानिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याकडे आगरकर यांचा कल होता .
- स्त्री पुरस्कर्ते
- बुद्धीप्रमाणवाद
- आगरकर टिळक वैचारिक मतभेद
- गोपाल गणेश आगरकर यांची पुस्तके
स्त्री पुरस्कर्ते
पुरुषांच्या बरोबर स्त्रियांनाही बरोबरीचा हक्क मिळाला पाहिजे असे त्यांचे मत होते .स्त्रियांनी जाकीट घातले पाहिजे असा त्यांचा विचार होता, यावरूनच समाजामध्ये पुरुषांच्याबरोबर स्त्रियांना सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे हा विचार दिसून येतो.
बुद्धीप्रमाणवाद
कोणतेही कार्य करत असताना आपल्या बुद्धीला चे पटेल तेच केले पाहिजे. आंधळेपणाने कोणतेही काम करू नये असे त्यांचे मत होते .लोक जे करतात तेच आपण केले पाहिजे असे न करता स्वतःच्या बुद्धीला आवडेल पचेल ,पटेल अशाच पद्धतीचे काम स्वीकारणे गरजेचे आहे म्हणून बुद्धिवादाचा आधार घेऊन समाज सुधारणा करण्याचा त्यांचा विचार होता .
आगरकर टिळक वैचारिक मतभेद
राजकीय स्वातंत्र्याअगोदर सामाजिक सुधारणा महत्त्वाची मानली जाते .लोकमान्य टिळक यांचे असे विचार होते की राजकीय स्वातंत्र्य अगोदर मिळाले पाहिजे, तर आगरकर यांचे असे मत होते की सामाजिक सुधारणा अगोदर व्हावी. नंतर राजकीय स्वातंत्र्य मिळू शकते ज्यावेळेस ब्रिटिशांनी आपल्या भारतावर आपले वर्चस्व गाजवले तेव्हाच भारत देश हा गुलामगिरीमध्ये गेला होता या गुलामगिरीचे बंधन तोडण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली .अशा वेळेस त्यांच्या झोपड्यातून निसटणे हा सगळ्यांना महत्त्वाचा विषय वाटत होता.
लोकमान्य टिळक असे म्हणत होते की अगोदर राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे तर आगरकर यांना असे वाटत होते की राजकीय स्वातंत्र्य हे कधी ना कधी मिळणारच आहे जोपर्यंत इंग्रज आहेत त्या इंग्रजांचा ज्ञानाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा आपल्या देशाला झाला पाहिजे किंवा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी आपण आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणू नंतर राजकीय स्वातंत्र्य हे मिळणारच असल्याने टिळक आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते ते जरी चांगले मित्र असले तरी विचारांमध्ये मतभेद होते .
गोपाल गणेश आगरकर यांचे शिक्षण
आगरकर यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये झाले .1878 मध्ये त्यांनी बीए केले, 1880 मध्ये त्यांनी एम ए पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर आपले कार्य देशाची सेवा करण्यासाठी आहे हे जाणले असल्यामुळे लोकसेवा करण्याचे इच्छा होती.
गोपाल गणेश आगरकर यांची पुस्तके
- केसरीतील निवडक निबंध
- सुधारकातील लेख
- गुलामगिरीचे शस्त्र
- वाक्यमीमांसा
- डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस
- विकारविलसीत
Yatharth
उत्तर द्याहटवा