Google ads

Ads Area

महाराष्ट्र शासनाकडून गाईच्या दुधासाठी 34 रुपयांचा हमीभाव जाहीर | Government of Maharashtra has announced a guaranteed price of Rs 34 for cow's milk

महाराष्ट्र शासनाकडून गाईच्या दुधासाठी  34 रुपयांचा हमीभाव जाहीर |Government of Maharashtra has announced a guaranteed price of Rs 34 for cow's milk


खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध खरेदी करीत असताना त्यांना मिळत असलेल्या दरामध्ये खूप घसरण होत असे.ज्यावेळी दुधाला मागणी जास्त  असेल तर दुधाचे दर वाढत होते, परंतु कधीकधी दुधाची  मागणी कमी झाल्यानंतर दुधाच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत होती. यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार खाजगी दूध संकलन करणाऱ्या त्याचबरोबर सहकारी दूध संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या दरामध्ये आढळणारी तफावत कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दुधासाठी हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे..चला तर मग याची सविस्तर माहिती आपण पाहूया.


महाराष्ट्र शासनाकडून गाईच्या दुधासाठी  34 रुपयांचा हमीभाव जाहीर


दूध दर वाढीबाबत बैठक 

राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत दि. २२.६.२०२३ रोजी मा. मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धविकास) यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांनी दूधाच्या दरामध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झाली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, असे नमूद केले. राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संस्थांकडून करण्यात येते. दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन कमी असल्याने, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळतो. तथापि, दुधाच्या पुष्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने, विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्विकारले जाते. यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्यात जातो.


वरील सर्व बाबी लक्षात घेता, खाजगी / सहकारी दूध संघांचा परिचालन खर्च तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा याअनुषंगाने दूध दर निश्चित करण्यासाठी शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये सहकारी व खाजगी दुग्धक्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सदर समितीने दि.३.७.२०२३ रोजी बैठक घेऊन राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचेद्वारे खरेदी होणाऱ्या ३.५/८.५ गुणप्रतिकरीता सर्वानुमते किमान खरेदी दर निश्चित करून शासनास शिफारस केली आहे. सदर समितीने शासनास केलेल्या शिफारशी विचारात घेता, राज्यातील गाय दूधासाठी (३.५/८५) किमान खरेदी दरास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



दूध दर वाढीबाबत शासन निर्णय


१.उपरोक्त समितीने शिफारस केल्याप्रमाणे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या ३.५/८.५ या गुण प्रतिच्या गाय दुधाकरीता किमान रु.३४ प्रतिलिटर या दरास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदरचे दर विनाकपात दूध उत्पादक शेतकरी यांना अदा करणे अभिप्रेत राहील.



२. सदरचे दर हे दिनांक २१.०७.२०२३ पासून अंमलात येतील.


३. देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्यात यावी. परंतू, विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्यापूर्वीही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करणे आवश्यक राहील.


४. सदरचे निर्देश हे दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, याकरीता लोकहितास्तव देण्यात येत आहे. 



५. उपरोक्त निर्देशाप्रमाणे किमान दुध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांचेमार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा.


गायीच्या दुधाला हमीभाव सविस्तर आदेश 


 


दूध दर वाढ हमीभाव परिपत्रक pdf |Government of Maharashtra has announced a guaranteed price of Rs 34 for cow's milk


DOWNLOAD 

महाराष्ट्र शासनाकडून दुधाच्या दरातील हमीभावाबाबत जो आदेश काढण्यात आलेला आहे तो आदेश आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवण्यासाठी सोबत देत असलेली पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी.


शासनाचा दूध हमी भाव परिपत्रक क्रमांक 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२३०७१४१३२९१५७५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


आमचे इतर लेख वाचा 

अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area