Google ads

Ads Area

ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 संपूर्ण माहिती | Online Senior Pay Grade & Selection Grade Training 2023 Complete Details

ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 संपूर्ण माहिती| Online Senior Pay Grade & Selection Grade Training 2023 Complete Details

आज आपण ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण  2023 कसे पूर्ण करावे  याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.



ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 संपूर्ण माहिती
ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 संपूर्ण माहिती



प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  लिंक 

ज्या शिक्षकांना ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण करावयाचे आहे त्या शिक्षकांना हे प्रशिक्षण ऑनलाईन करायचे आहे, त्यासाठी एससीआरटीमार्फत (SCERT ) मार्फत एका संस्थेमार्फत ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी लिंक देण्यात आलेली  आहे. त्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला आपल्या प्रशिक्षणाचे लॉगिन करायचे आहे.



ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लिंक 

https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login 


यावरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले प्रशिक्षण सुरू करता येईल. ते प्रशिक्षण सुरू कसे करायचे त्या संदर्भात सविस्तर माहिती पुढे दिलेलीच आहे.


प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी साधने 

आपल्याला ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने काम करत असताना मोबाईलच्या माध्यमातून त्याचबरोबर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून देखील आपले प्रशिक्षण पूर्ण करू शकता. या दोन्ही पद्धतीने आपले प्रशिक्षण कशा पद्धतीने पूर्ण करायचे किंवा त्याला लॉगिन कसे करायचे या संदर्भात संपूर्ण डेमो आम्ही खाली दिलेला आहे तो आपण पाहू शकता.


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी

शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दहा जुलै 2023 ते 24 ऑगस्ट 2023 कालावधी देण्यात आलेला आहे. सांगायचे झाले तर हे प्रशिक्षण 45 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे.



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण मोबाईलवर करण्यासाठी लागणारे ॲप 

आपल्याला हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्ले स्टोर मधून आपल्याला इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड ॲप (springboard app ) डाऊनलोड करावे लागेल. ते ॲप डाऊनलोड करण्यासाठी आपण खाली लिंक वर क्लिक करा. आणि तात्काळ प्ले स्टोर मधून हे ॲप डाऊनलोड करा.


स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस ॲप लिंक 



वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 प्रशिक्षणासाठी लॉगिन करणे 

शिक्षकांनी यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. या संदर्भात सर्व माहिती भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आपल्या मेलवर आयडी आणि पासवर्ड आला असेल. तो आयडिया आणि पासवर्ड टाकून आपण आपल्या प्रशिक्षणाला संगणक अथवा मोबाईलच्या माध्यमातून सुरुवात करायची आहे.


प्रशिक्षण चाचणी आणि स्वाध्याय 

शिक्षण पूर्ण करत असताना शिक्षकांना काही चित्रफिती दाखवण्यात येतील.  या चित्रफिती पाहून त्यावरती काही टेस्ट सोडवायच्या  आहेत. त्याचबरोबर स्वाध्याय देखील पूर्ण करायचे आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. आपल्याला सर्व modules  आणि  चाचण्यांमध्ये किमान 40 टक्के गुण मिळणे अनिवार्य असल्यामुळे प्रशिक्षणार्थींनी या चाचण्या चित्रफिती पाहून व्यवस्थित सोडवा.



वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023मोबाईलच्या मदतीने प्रशिक्षणाची सुरुवात 


1. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲप डाऊनलोड करणे 

प्रथम आपल्याला प्ले स्टोर मध्ये जाऊन infodys springboard  हा शब्द सर्च करायचा आहे. व हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.


2. ॲप परमिशन allow  करा

त्याला या ॲपच्या मदतीनेच संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करायचे असल्याने आपण ॲपच्या वापरा संदर्भात सर्व परमिशन allow करायचे आहेत. जर आपण तसे केले नाही तर व्हिडिओ पाहत असताना त्याचबरोबर टेस्ट सोडवत असताना आपल्याला अडचणी येऊ शकतात.


3.accept all cookies 

वात शेवटी एक्सेप्ट ऑल कुकीज यावरती आपण क्लिक करायचे आहे.


लॉग इन करणे 

आपण जो ईमेल आयडी नोंदणी करताना टाकला होता तो अचूक ईमेल एड्रेस त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. व आपल्याला मेल वरती प्राप्त झालेला पासवर्ड त्या ठिकाणी तुम्ही नमूद करून लॉगिन करायचे आहे.


प्रोफाइल दुरुस्ती 

आपल्याला जर आपल्या प्रोफाईल मध्ये काही बदल करायचा असेल तर त्यामध्ये देखील आपण प्रोफाईल अपडेट मध्ये जाऊन आपली माहिती बदलू शकतो. संदर्भात स्वतंत्र पीडीएफ आपल्याला मार्गदर्शनासाठी दिलेले आहे.


प्रशिक्षण वर्गाला सुरुवात 

इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यावरती अनेक वेगवेगळे प्रशिक्षणे सुरुवातीला आपण मात्र प्रशिक्षण या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण यावरती क्लिक करून जे आपल्यासाठी आवश्यक आहे तेच प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे.


प्रत्येक घटकाची चित्रफीत पाणी आणि टेस्ट सोडवणे 

आपल्याला दिलेल्या प्रत्येक घटकावरील चित्रफिती म्हणजेच व्हिडिओ आपण पाहिजे आहेत त्या व्हिडिओमधील माहिती समजून घेतल्यानंतर त्यावर वर असणाऱ्या टेस्ट आपल्याला सोडवायचे आहेत.


या पद्धतीने आपल्यालाही प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे आपल्याला 45 दिवसात प्रशिक्षण पूर्ण करावयाचे असल्याने आपले अध्यापनाचे नियोजन सांभाळून हे प्रशिक्षण पूर्ण करावे.


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाला नसल्यास काय करावे ?

1.आपण जर प्रशिक्षणासाठी लागणारे संपूर्ण शुल्क भरलेले असेल आणि त्या संदर्भात आपल्याकडे संपूर्ण डिटेल असेल तर ते आपण एसआरटीच्या मेल एड्रेस वर मेल करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो.


लॉगिन आय डी  आणि पासवर्ड मिळवण्यासाठी ई-मेल आयडी 

[email protected]



प्रशिक्षणासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक 

2.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे समाधान करू शकता.


राज्य परिषद संपर्क क्रमांक  020 24476938 


आपल्याला येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल यासाठी आपण वरील मेल आयडी व संपर्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपल्या अडचणींचे निवारण करू शकता.


3.ज्यांना अद्याप आपला लॉग इन password मिळाला नाही कदाचित तो आपल्या spam folder मध्ये आला आहे का चेक करा व आपले प्रशिक्षण पूर्ण करा.


 4.आपल्याकडे Infosys springbord app download  असेल तर आपण forget password वर क्लिक करून नवीन password तयार करावा.

तसेच Google बटणावर क्लिक करून आपला password तयार करून घ्या.


यापेक्षा हे करा

 

आपण आपला इ मेल यूजर आयडी म्हणून अचूक टाकल्यानंतर आपण Springboard!123 असा पासवर्ड टाकून आपल्या प्रशिक्षण सुरू करू शकता.


मोबाइल आणि संगणक यांच्या मदतीने असे करा प्रशिक्षण सुरू डेमो 


 

आपल्याला वरील डेमो पाहून log in आणि चल सुरू करता आले नसेल तर त्या संदर्भात एक अप्रतिम व्हिडिओ पहा आणि आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करा.


ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 लॉग इन आणि प्रशिक्षण सुरुवात यासाठी व्हिडिओ पहा.



 आपण वर दिलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्या सर्व शंकांचे समाधान झाले असेल तुम्हाला प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा!

लेखाच्या माध्यमातून आपण आपले प्रशिक्षण कशा पद्धतीने पूर्ण करावे या संदर्भात आम्ही आपल्याला मार्गदर्शन केले.


आमचे इतर लेख वाचा 

अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area