नवी मुंबई महानगरपालिकेत गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती 2023-24 |Navi Mumbai Municipal Corporation Merit Based Teacher Recruitment 2023-24
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती केली जाणार आहे. या शिक्षक भरतीच्या संदर्भात आम्ही आज महत्वपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागांसाठी खूप मोठी भरती निघालेली आहे.ही भरती तात्पुरत्या स्वरूपात आणि तासिका तत्त्वावर असली तरी शिक्षण क्षेत्रात कामाची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोलाची संधी आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती |
नवी मुंबई शिक्षक भरती (toc)
नवी मुंबई शिक्षक भरती जागांचा तपशील
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे त्यांचा तपशील खालीलप्रमाणे.
नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग शिक्षक जागा
- मराठी माध्यम ८८
- हिंदी ३१
- उर्दू माध्यम ३
अशा 122 जागा प्राथमिक विभागात शिक्षक भरतीसाठी आहेत.
या जागांसाठी अर्ज करण्याची पद्धत ,अटी, निवड प्रक्रिया या संदर्भात संपूर्ण परिपत्रक आम्ही आपल्याला सोबत दिलेले आहे. त्या परिपत्रकाचे अवलोकन करून आपण तात्काळ आपला अर्ज करावा.
माध्यमिक विभाग जागा तपशील
- मराठी माध्यम ३७
- हिंदी माध्यम ११
- उर्दू २
- इंग्रजी १०
अशा एकूण ६० जागा
या माध्यमिक शिक्षण विभागासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपलब्ध आहेत.
नवी महानगरपालिकेच्या भरतीसबाबत काही अटी देण्यात आलेल्या आहेत. यासाठी आपण आम्ही सोबत दिलेले परिपत्रक पहा. त्यातील काही महत्त्वाच्या अटी आम्ही आपणाला देत आहोत.
💥 अकरावी ऑनलाइन प्रवेश तिसऱ्या राऊंड ला सुरुवात 👈
सविस्तर माहितीसाठी आणि अर्जाच्या तपशिलासाठी आपण सोबत दिलेल्या पीडीएफ आवर्जून पहाव्यात आणि लवकरात लवकर अर्ज करावा.
शिक्षकांची गुणवत्तेच्या आधारे निवड
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक भरती नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी जी निवड होणार आहे, ती निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. परंतु जे शिक्षक प्राथमिक विभागासाठी अर्ज करणार आहे त्यांना सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
शिक्षक भरती निवड प्रक्रिया माहिती
2. सदर पदाची निवड ही पुर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात आणि तासिका तत्त्वावर आहे.
(उमेदवारास मनपा सेवेत कायम राहण्याचा अधिकार सांगता येणार नाही. सदरची नेमणूक शैक्षणिक वर्ष 2023 -2024 पुरती मर्यादित राहील.)
3.नोकरीत कायम दावा करण्याचा अर्जदाराला हक्क प्राप्त राहणार नाही.तसेच याबाबत सदर्भात न्यायालयात दाद मागता येणार नाही.
4. आपण कोणताही दावा करणार नाही याबाबत रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करावे लागेल.
5. प्राथमिक शिक्षक प्रती तास 125 व जास्तीत जास्त दिवसाला 6 तास अर्थात 750 रुपये असेल, माध्यमिक शिक्षकाकरीता तासिका तत्वावरील मानधन प्रती तास रु.150/- याप्रमाणे प्रती दिन जास्तीत जास्त 6 तास तासिकाचे कमाल शुल्क रु.900/- एवढे राहील, जेवढे तास सेवा दिली तेवढ्या तासाचे मानधन देय राहील.
6.जागा कमी जास्त झाल्या काही तांत्रिक अडचणी आल्यास सदर कोणतीही सूचना न देता सदर सेवा समाप्त करण्याचे सर्व अधिकार आयुक्त राखून ठेवत आहेत.
7. शिक्षण विभागात आवश्यकतेनुसार शिक्षकांची संख्या कमी वाढविण्याचे अधिकार आयुक्तांना असतील.
अर्जदाराने महानगरपात्तिकेच्या जाहिरातीत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक असेल.
8.आपला अर्ज उपायुक्त शिक्षण या नावाने करावा.
9. अर्जासोबत कागदपत्राच्या सर्व मूळ कागदपत्रे सादर करावीत. आपले अर्ज पोस्ट कुरिअर किंवा ई-मेलद्वारे अर्ज स्विकारले जाणार जाणार नाहीत.
10.आपल्याला दिलेल्या फॉरमॅटमध्ये करावा लागेल तो फॉरमॅट सोबत जोडलेला (pdf) आहे.
अर्ज करण्याचा कालावधी
ज्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा आहे.त्या उमेदवारांनी अंतिम दि. 10/07/2023 असल्याने तत्पूर्वी आपला अर्ज प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमा करायचा आहे.
अर्ज जमा करण्याचे ठिकाण
आपले अर्ज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तिसरा माळा, ज्ञानकेंद्र सी.बी.डी. बेलापूर येथे सकाळी 10:00 से 05:00 या वेळेत उपस्थित रहावे.
नवी मुंबई मनपा प्राथमिक विभाग शिक्षक भरती परिपत्रक pdf
नवी मुंबई मनपा माध्यमिक विभाग शिक्षक भरती परिपत्रक pdf
आमचे इतर लेख वाचा
अकरावी प्रवेश कॉलेजला प्रवेशासाठी ही कागदपत्रे सोबत ठेवा