Google ads

Ads Area

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 तिसरी यादी जाहीर |11th Online Admission 2023 24 third List Released

 

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 तिसरी यादी जाहीर |11th Online Admission 2023 24 third List Released

अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षा 2023 24 साठी  विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीसाठी आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक आणि भाग दोन व्यवस्थित रित्या भरून आपला फॉर्म लॉक केलेला आहे. आता विद्यार्थी प्रतीक्षा करत आहेत की ,अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी यादी कधी जाहीर होणार? आम्हाला कोणते कॉलेज मिळणार? याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. त्याचबरोबर ही यादी जाहीर झाल्यानंतर आम्हाला कोणते कॉलेज भेटले ? हे आम्ही कसे चेक करायचे असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत.असे चेक करा आपल्याला कोणते कॉलेज मिळाले.चला तर तिसऱ्या फेरीत कोणते कॉलेज भेटले ते पाहूया.


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 तिसरी यादी जाहीर
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 तिसरी यादी जाहीर 



अकरावी प्रवेश तिसरी यादी (toc)


अकरावी ऑनलाइन प्रवेश तिसरी यादी 

अकरावी प्रवेश तिसऱ्या राउंड मधील अलॉटमेंट जाहीर झाले आहे. हे अलॉटमेंट आपण खालील प्रमाणे पाहू शकता.


#अकरावी अधिकृत संकेत स्थळ 

अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 च्या संपूर्ण  प्रक्रियेसाठी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाची निवड करण्यात आली आहे आणि याचा अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पार्ट 2 भरलेला आहे. काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव आपले रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरता आला नाही आणि तो भाग एक न भरल्यामुळे त्यांना भाग 2 देखील भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला राऊंड पूर्ण झाल्यानंतर सर्वांसाठीच ही प्रवेश प्रक्रिया खुली होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी तात्काळ अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग एक भरायचा आहे.



💥अकरावी प्रवेश 2023 24 मार्गदर्शिका pdf  👈



अकरावी प्रवेश रजिस्ट्रेशन व भाग 1 असा भरा 


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 1 भरण्यासाठी डेमो 👈



वरील निळ्या अक्षरांवर क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अध्यापर्यंत भाग एक भरला नव्हता त्या विद्यार्थ्याला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.


अकरावी ऑनलाइन प्रवेश २०२३२४ भाग 2 असा भरा 

ऑनलाइन प्रवेशाच्या पार्ट 2 मध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेस निवडायची  आहेत. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या माध्यमांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. ते देखील या भाग दोन मध्ये भरायचा आहे तर विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या डेमो पाहून तात्काळच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भाग दोन भरला नाही त्यांनी भाग दोन भरून घ्यावा.


💥अकरावी प्रवेश भाग 2 असा भरा 👈


आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया तो विषय म्हणजे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या राऊंड साठी विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले ? याची यादी ऑनलाईन जाहीर झालेली आहे. ती यादी कशी बघायची ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया.


अकरावी ऑनलाइन प्रवेश कोणते कॉलेज मिळाले ते असे पहा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण आपला फॉर्म भरत असताना आपण  जो मोबाईल नंबर दिला असेल. त्या मोबाईल नंबर वरती निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला कोणते कॉलेज मिळाले? यासंदर्भात मेसेज येईल. परंतु बऱ्याचदा काही तांत्रिक अडचणी आल्या की मात्र तो मेसेज कधी कधी आपल्याला येत देखील नाही म्हणूनच ऑनलाईन कशा पद्धतीने आपल्याला कोणते कॉलेज मिळाले ते कसे चेक करायचे ते आम्ही आपल्याला सांगत आहोत.


1.संकेत स्थळावर जाणे

विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायचे आहे.आपला विभाग निवडा.


2. लॉग इन करा 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला जो लॉगिन आयडी प्राप्त झालेला आहे तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉगिन करायचा आहे. 



3.तीन आडव्या रेषांवर क्लिक करा 

आपण लॉगिन केल्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती खाली फोटो दाखवल्याप्रमाणे तीन आडव्या रेषा दिसतील त्या आडव्या रेषांवरती क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक डॅशबोर्ड ओपन होईल.


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिली यादी जाहीर
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिली यादी जाहीर


4. चेक अलॉटमेंट स्टेटस 

डाव्या बाजूच्या डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्टेटस टॅब त्यावरती आपण क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जर आपल्याला कॉलेज लागले असेल तर त्या कॉलेजचे नाव पत्ता या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. आणि जर आपण टाकलेल्या कॉलेज पैकी नाव लागले नसेल तर आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्यांसाठी नव्याने ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे.

💥कॉलेजला प्रवेश घेताना ही document सोबत हवीत 👈


अकरावी प्रवेश आपल्या मनातील प्रश्न 

1.11 वी प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास  हेल्प लाइन नंबर कोणता आहे ?  

अकरावी प्रवेशावेळी जर आपणास काही अडचण आली खाली  दिलेल्या हेल्प लाइन नंबर वर संपर्क करा. 


अकरावी हेल्प लाइन नंबर    09823009841

जर आपणास प्रवेशाबाबत कोणतीही अडचण आली तरी वरील 11 वी हेल्प लाइन नंबर वर संपर्क साधा. 

2. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष फेरी यादीच्या वेळी  पसंती क्रम बदलता येतात का?

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये समजा विद्यार्थ्याला तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही, आणि त्याला विशेष फेरीमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यावेळी तो पूर्वीचे जे पसंती क्रम दिलेले आहेत त्या पसंती क्रमामध्ये अकरावी प्रवेशात प्रत्येक फेरी वेळी पसंती म्हणजे  बदलता येतात.विद्यार्थ्यांना त्यात  बदल करून विशेष फेरीत प्रवेश घेता येऊ शकतो.


3. अकरावी प्रवेश विशेष फेरी म्हणजे काय ?
अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर एक चौथी  फेरी होते तिला विशेष फेरी  म्हटले जाते. या चौथ्या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे या फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण विचारात घेतले जात नाही. ही सर्वांसाठी खुली असते जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा हाच हेतु या फेरीमागचा येतो असतो.




4. 11 वी प्रवेश प्रवेश घेण्यासाठी  ऑनलाइन अर्ज आवश्यक आहे का? 

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी घेत असताना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक  आहे.आपण कुठल्याही राखीव कोट्याचा फायदा घेत असाल,कोणत्याही विद्यालयात प्रवेश घेत असला  तरी देखील आपल्याला उचित अर्ज करणे गरजेचे आहे.


5. अकरावी प्रवेश पहिला पसंतीक्रम दिलेल्या कॉलेजला प्रवेश  घेतला नाही तर काय होईल ? 

11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत जर पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळून जर आपण प्रवेश घेतला नाही, तर आपल्याला त्यानंतर एका फेरीत सहभाग घेता येणार नाही. मात्र नंतरच्या तिसऱ्या फेरीत आपण पुन्हा  ऑप्शन फॉर्म भरू शकता. क्लिक करा . 



6. 11 वी प्रवेशात जर पसंतीक्रम 2 ते 10 यातील कॉलेजला प्रवेश घेतला नाही तर काय होईल ?

काही नुकसान होणार नाही अशा विद्यार्थ्याना दुसऱ्या फेरीत पुन्हा ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी असणार आहे. 



7. आतापर्यंत ज्या मुलांनी पार्ट  १ भरला नाही त्यांना 11 वी ऑनलाइन प्रवेशात सहभाग घेता येईल का?

 ज्या मुलांनी अजून एकदाही फॉर्म भरला नाही ती मुले कोणत्याही फेरीच्या वेळी 11 वी प्रवेश घेऊ शकतात.प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर भाग १ भरण्याची संधी दिली जाते. 



8. प्रत्येक फेरीच्या वेळी ऑप्शन फॉर्म भरता येतात का ? किंवा त्यात बदल करता  येईल का ?

11 वी प्रवेश प्रक्रियेत 3 नियमित फेऱ्या होतात.यात आपण प्रवेश प्रक्रियेचा तो टप्पा सुरू होण्या आधी त्यात बदल करू शकता तसेच दर फेरीला ऑप्शन पसंती क्रम देखील बदलू शकता. 


9.अकरावी ऑनलाइन प्रवेश  ATKT /नापास मुलांची  फेरी कधी होईल?

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नियमित 3 फेऱ्या झाल्यावर एक विशेष फेरी होईल व त्यानंतर ATKT साठी एक विशेष फेरी होईल. आता ती फेरी सुरू होईल.



#10 एखाद्या मुलाने पहिल्या फेरीत पसंतीक्रम भरले मात्र पहिल्या फेरीत प्रवेश घेतला नाही  तर दुसऱ्या फेरीला कोणते पसंतीक्रम ग्राह्य धरले जातील ?

अशा वेळी पहिल्या फेरीला जे पसंती क्रम भरले आहेत तेच  ग्राह्य धरले जातील. 


11. एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेऊन तो रद्द केला तर नंतरच्या फेरीत त्याला सहभागी होता येईल का ?

जर एकदा प्रवेश घेतला व तो रद्द केला तर नंतरच्या एका फेरीत सहभाग घेता येणार नाही.मात्र पुढच्या फेरीत तो फॉर्म भरू शकतो. 



12. आपला अकरावी ऑनलाइन प्रवेश  पक्का करण्यासाठी काय करावे ?

11 वी प्रवेश संकेत स्थळावर जावे व त्यातील PROCEED FOR ADMISSION यावर क्लिक करा व विहित वेळेत कागदपत्रे घेऊन त्या महाविद्यालयाला भेट द्या. 



13. पसंतिक्रम देऊन कॉलेज मिळाल्यावर  झाल्यावर काय करावे ?

अकरावी ऑनलाइन वेबसाइट  वर जाऊन जाऊन आपली उर्वरित कागदपत्रे अपलोड करा.तसेच मूळ कागदपत्रे घेऊन त्या कॉलेज ला भेट द्यावी. 



14. अमुक एका जातीचा असून ते प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही काय करावे ?

जर अशी अडचण असेल त्या मुलांनी खुल्या गटातून प्रवेश अर्ज करावा . 


15. महाराष्ट्रा बाहेरील मुलांना जातीय आरक्षनाचा फायदा मिळेल का ?

नाही आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपण आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. a

तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला  प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी आमचा wtp ग्रुप जॉइन करा. 


अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


आमची ही माहिती इतरांना देखील नक्की पाठवा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area