शाळा प्रवेशोत्सव 2023 | School entry | shala praveshotsav 2023
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्वच ठिकाणच्या शाळा चालू होणार आहेत ,यासाठी महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ वगळता 15 जून 2023 रोजी शाळा चालू होणार आहेत .
"मुलं म्हणजे देवाघरची फुलं" असे म्हटले ते खरंच आहे ,मूल शाळेत आले तरच शाळा चालेल नाहीतर शाळा केवळ भिंतीच्या बघायला मिळतील ;म्हणून प्रत्येक मूल शाळेत येणे गरजेचे आहे .आणि तिची गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे .आजचा विद्यार्थी आदर्श असला पाहिजे
आजचे शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित शिक्षण असून ,विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या अनुषंगाने अधिनियम 2009 नुसार मुलांना आनंदी वातावरणात हसत खेळत शिक्षण हीच शिक्षण हक्क कायद्याची फलनिष्पत्ती आहे.प्रत्येक मूल नियमित शाळेत यावे यासाठी राज्यभर नवोपक्रम आयोजित केले जातात .
वार्षिक परीक्षा संपल्यापासून दीर्घ सुट्टीच्या कालावधीनंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा त्यांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी शाळेसंबंधी जे जे अधिकारीवर्ग,शिक्षक,पालक ,विद्यार्थी यांच्या सहकार्याने शालेय वातावरण आनंदी ,प्रसन्न ठेवून सभोवताली वर्गखोल्या आणि परिसर स्वच्छ ठेवून उत्साहाचे वातावरण ठेवणे .हा सगळा 'शाळा प्रवेशोत्सव ' चैतन्यमय झाला पाहिजे जेणेकरून मुलांना शाळेत यायला उत्सुकता निर्माण होईल .
शाळा प्रवेशोत्सव असा साजरा करावा
1 ) पूर्वतयारी
शासनाच्या पूर्वी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे.
2 ) संस्थांचे सहकार्य घेणे,(पुस्तक वाटप,प्रभात फेरी,स्वागत )
शासनाच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभात फेरी काढायची विद्यार्थ्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत करणे त्याच दिवशी मोफत पुस्तक वितरण इ. कार्यक्रम आयोजित करणे .यासाठी सर्व स्थानिक पातळीवरील शिक्षण संदर्भात असलेल्या संस्थांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे .
#3 ) विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत हे ज्या संस्थाचे पदाधिकारी ,सदस्य,स्थानिक पातळीवर जे जे म्हणून सगळे अधिकारी उपस्थित असतील त्यांच्याकडून सर्व विध्यार्थ्यांचे स्वागत करतील .
4 -5) शिक्षणाधिकारी यांचा आदेश (उपस्थिती संबंधी )
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्याचे संसद सदस्य, पालकमंत्री महोदय व स्थानिक मंत्री महोदय यांना जिल्ह्यातील एका शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करावी.
6) कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे
शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाची खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात यावे जेणेकरून पालक आणि विद्यार्थी यांनाही शाळेत जाण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे शेजारी असलेल्या परिसर आनंदाने फुलून गेला पाहिजे तसेच एका परिसरात असा उत्साह साजरा होत असल्याने दुसऱ्या परिसरात किंवा दुसऱ्या गावातील किंवा शेजारच्या शाळेतील शिक्षकांनी याच पद्धतीने उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी उत्सुकता अधिक प्रमाणात येईल.
7-8 ) अधिकारी यांची उपस्थिती
सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी उपसंचालक, सहसंचालक, डाएट प्राचार्य यांनी कमीत कमी एका शाळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे, तसेच शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे इतर विभागातील क्लास || किंवा त्या पुढील अधिकाऱ्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करावे.
9) विद्यार्थ्यांना गोड जेवण देणे
पहिल्या दिवशी शाळा चालू झाल्यावर मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचा आस्वाद घेता यावा याची तरतूद करणे आवश्यक आहे.
उदा .(शाळास्तरावर मुख्याध्यापक यांनी जिलेबी किंवा मिठाई वाटली तरी काही हरकत नाही ,मुलांच्या दृष्टीने सभेत ठरल्याप्रमाणे कोणताही निर्णय घ्यावा .)
10) सांस्कृतिक कार्यक्रम करावा
शाळेच्या प्रथम दिवशी स्थानिक कलाकार किंवा माजी विद्यार्थी यांनी शिक्षणासंबंधी सांस्कृतिक कार्यक्रम करतील असे नियोजन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
11) कार्यक्रम करण्यासाठी लागणारा खर्च
मला प्रवचोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी खर्च होणारच असल्याने हा खर्च सादिलनिधी तसेच सर्व शिक्षा अभियान नाच्या निधीतून भागविण्यात यावा तसे करावे
12) कार्यक्रम किती वेळ करावा
शाळेच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहाने स्वागत केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर तसेच अधिकारी यांचे मार्गदर्शनपर भाषण, या सर्व कार्यक्रमाचा कालावधी जास्तीत जास्त एक तास असावा, नंतर दैनंदिन कामकाजास सुरुवात करावी.
13 ) कोणत्या गावात राबविला जावा.
शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम 1000 ते 5000 एवढी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये हा शाळा प्रवेशोत्सव राबविला जावा.
तरी शाळेतील सर्वेसर्वा असलेले मुख्याध्यापक यांनी आपल्या पातळीवर शाळेतील नियोजन करुन आलेल्या शाळेत येणाऱ्या विध्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करणे आवश्यक आहे .जे नवीन मुले शाळेत येत असतील त्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच त्यांच्या आवडीचा खाऊ म्हणजे चॉकलेट किंवा कॅटबरी दिली तर मुलांना अधिक समाधान वाटेल .ज्या ठिकाणी मध्यान्ह भोजन मिळत नसेल म्हणजेच माध्यमिक विभागाने स्वनिर्णयाने घेऊन मुलांना गोड काहीतरी देणे आवश्यक आहे .
राज्य शासनाने ज्या पद्धतीने नियोजन करण्यास सांगितले आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे .
सर्व बालकांचे शाळांमध्ये माझ्याकडून शब्दसुमनांनी मनःपूर्वक स्वागत !
हे ही वाचा