शाळा प्रवेशोत्सव 2023 घोषवाक्ये | school entry 2023 ghoshvakye| शाळा प्रवेशोत्सव
शाळेचा पहिला दिवस म्हणजे बालकांना आनंदाचा बहर आलेला असतो. शाळा ही संस्काराची खरी शिदोरी असली तरी त्याचा सर्वांगीण विकास घडविणे हे शिक्षक ,पालक यांच्यावर असते हे विसरुन चालणार नाही .
शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित आहे ,शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी हाच गुरू समजून त्याची मनोभावे पूजा करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे .याची जाणीव सतत असावी लागते .
उन्हाळी सुट्टीनंतर मुलांना आनंदी वातावरणात शिक्षण द्यावे यासाठी त्यांना शाळेची आवड व्हावी म्हणून शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करुन त्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी काही घोषवाक्ये .
#★★आईचे स्वप्न मराठी शाळेत शिकून करु पूर्ण
★★ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा
★★जिच्या हाती शिक्षणाची दोरी
★★शिकलेली आई घरादाराला पुढे नेई
★★अडाणी बाप घरादाराला ताप
★★अक्षर कळे संकट टळे
★★साक्षर जनता भूषण भारता
★★मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण
★★आमची शाळा किती छान की आम्ही सारे शाळेला जाणार
★★6 वर्षाचे प्रत्येक मूल शाळेत आलेच पाहिजे
★★लाजू नका भिऊ नका शिक्षणाची कास सोडू नका
★★वय कितीही असू द्या शिकता येईल तेवढे शिकू द्या
★★सारे शिकूया पुढे जाऊया
हे ही वाचा