शाळा प्रवेशोत्सव 2023 चारोळ्या | school entry 2023 charolya| शाळा प्रवेशोत्सव
"मुलं म्हणजे देवाघरची फुले " म्हणून मुलांना सांभाळणे हे फुलासारखे समजून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे महत्त्वाचे आहे .शाळेचा पहिला दिवस म्हटले की बालकांना आनंदाचा बहर आलेला असतो. शाळा ही संस्काराची खरी शिदोरी असली तरी त्याचा सर्वांगीण विकास घडविणे हे शिक्षक ,पालक यांच्यावर असते हे विसरुन चालणार नाही .
शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित आहे ,शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी हाच गुरू समजून त्याची मनोभावे पूजा करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे .याची जाणीव सतत असावी लागते .
उन्हाळी सुट्टीनंतर मुलांना आनंदी वातावरणात शिक्षण द्यावे यासाठी त्यांना शाळेची आवड व्हावी म्हणून शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करुन त्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी काही चारोळ्या .
★शाळेची घंटा वाजली
मला शाळेला जायला
कामाला नको जायला
शाळेला नको उशीर व्हायला
★ मायेच्या पदराखाली लपून राहिली
मला शाळेची आवड लागली
ज्ञानाच्या संगती बागडू लागली
घरोघरी ज्ञानाचा दिवा लावू लागली
★ शाळा शिकून होऊ गर्वाने छोटे
इतरांना विद्या देऊन होऊ मनाने मोठे
★ चूल आणि मूल म्हणण्यापुरते राहिले
सगळेच मोबाइलने सुस्त राहिले
इंटरनेटच्या जमान्यात सगळेच व्यस्त राहिले
तरीही वर्गातील नाती मस्त राहिली
★ विद्यार्थी माझा देव
त्याची सेवा मनोभावे करु
तुझी भक्ती कमी न होऊ देऊ
भक्तीने जीवन उजळून देऊ
★ संस्काराची खाण
आई आणि शाळा
हे ही वाचा