Google ads

Ads Area

आयटीआय प्रवेश 2023 -24| iti admission 2023-24||आयटीआय मधून रोजगार|iti मधून स्वविकास

| iti admission 2023-24| आयटीआय ऍडमिशन 2023 -24 |आयटीआय मधून रोजगार|iti मधून स्वविकास 


आटीआय म्हणजे झटकीपट आपल्या पायावर उभे राहण्याची सोय करुन घेणे .


तसेच असाही लोकांच्या मनात गृह झाला आहे की पुढे शिकून काहीही होणार नाही त्यापेक्षा आताच शहाणे होऊन  स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहण्याची उत्तम सोय म्हणून iti कडे पाहिले जाते .


अजून असेही म्हटले जाते की ज्याची परिस्थिती कमजोर आहे ,डॉक्टर ,इंजिनिअरिंग,स्पर्धा परीक्षा करण्याची ज्यांची क्षमता नसते त्यांनी सरळ iti ला जायचे आणि स्वाभिमानाने जीवन जगायचे .असे समज काहीही असले तरी आपले ध्येय निश्चित करुन त्याप्रमाणे मार्ग निवडणे महत्त्वाचे आहे .



हे काही असले तरी iti मधून स्वतःचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो ,कंपनी ,छोटेमोठे  उद्योग करु शकतो , त्यातून मिळणारी व्यवसाय करण्याची संधी,तसेच iti करुनही पुढे diploma करु शकतो ,diploma करुन इंजिनिअर करु शकतो हे सगळे फायदे आहेत .


परंतु iti करुन दोन वर्षात कामाची संधी मिळू शकते किंवा स्वतःचा व्यवसाय करु शकतो .बेरोजगार राहण्यापेक्षा iti करुन लगेच आपल्या आईवडिलांना आर्थिक सहकार्य करु शकतो .


 आजच्या स्पर्धेच्या युगात सगळ्या ठिकाणी नोकरी मिळणे खूप मुश्किल झाले आहे त्यामुळे खूप सारे शिक्षण घेऊन आज कितीतरी मुले बेरोजगार म्हणून  कोणत्या ना कोणत्या दुकानात ,मॉलमध्ये मदतनीस म्हणून काम करतात तरीही त्यांना उपासमारीची वेळ येत असते ,


ज्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची आहे ,बाहेर जाऊन शिकणे अशक्य आहे, घराची जबाबदारी ज्यांच्यावर येऊन पडली आहे अशा विद्यार्थ्यांना iti ह्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करण्याचे उत्तम पर्याय आणि खात्रीशीर व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी मिळू शकतात .


ज्यास नोकरी करण्यात रस नसेल त्यांनी iti करुन  आपला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची iti ही एक महत्त्वाची संधी आहे .आपला स्वतःचा व्यवसाय करून आपला परिवार सांभाळू शकतो अशा अनेक फायद्यासाठी iti अनेकांना उपयोगी आहेच .

iti ची संपूर्ण माहिती pdf     click

iti विषयी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध  आहे      click







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area