कामगार दिनाची माहिती | kamagar dinachi mahiti
कामगार दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच जागतिक कामगार दिन असेही म्हटले जाते .
या दिवसात म्हणजेच 1 मे रोजी हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो कामगारांच्या हक्काचे जे मानधन वेतन ,काम करण्याच्या तासिका यासाठी सगळ्या कामगारांनी संघटित कामगार संघटित होऊन चळवळी उभ्या केल्या प्रमुख मागणी अशी होती की आठ तास काम म्हणजे प्रत्येक कामगार हा आठ तासांपेक्षा जास्त काम करणार नाही यासाठी पहिली मागणी 21 एप्रिल1856 ऑस्ट्रेलिया या देशातील कामगारांनी केली. तेव्हापासून या देशात हा दिवस सुट्टीचा दिवस ठरला गेला
या देशाच्या पावलावर पाऊल ठेवून अमेरिका, कॅनडा देशातील आराजाकातावादी संघटनांनी 1 मे 1856 रोजी आंदोलने सुरू केली असेच आंदोलन सुरू असताना हे आंदोलन बंद करावे म्हणून आंदोलन कर्त्यांना दूर करण्यासाठी 4 मे 1856 रोजी शिकागोमध्ये 6 आंदोलन करते मृत्युमुखी पडले.
ही घटना कामगारांच्यासाठी झालेली होती म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रिमांड लेविन यांनी केली ही मागणी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत 1989 मध्ये केली. म्हणून या परिषदेतच 1 मे 1890 हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे .तेव्हापासून आज तागायत 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो .हा जागतिक कामगार दिन हा दिवस जगभरात 80 देशाहून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.
# कामगार आणि त्यांच्या हितासाठी नवीन नवीन अशी नियमावली तयार करून कामगारावर अन्याय शोषण होणार नाही याची दक्षता या दिवसानिमित्त करण्यात येते म्हणजे कोणताच कामगार हा अन्याय सहन करणार नाही तसेच या कामगाराला बारा तास काम करावे लागणार नाही तरीही आजही आपल्याकडे बारा तास लोकांना काम करावे लागत आहे .याची दखल सगळ्या कामगारांनी घेणे गरजेचे आहे. आजही प्रत्येक सोसायटीमध्ये वॉचमेन म्हणून जे लोक काम करत असतात त्यांना कमी वेतन देऊन बारा तास काम करावे लागत आहे याची दखल शासन आणि कामगार चळवळ यांनी घेणे गरजेचे आहे .