इ .10 वी कर्मधारय समास | ssc exam karmadharay samas
5 ) कर्मधारय समास | karmadharay samas
ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून, पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषणे असतात.
उदा .
नीलकमल- निळे असे कमल
घनश्याम। घनासारखा श्याम
मुखकमल- मुख हेच कमल
पितांबर पिवळे असे वस्त्र
भाषांतर अन्य भाषा
श्यामसुंदर- सुंदर असा शाम
विद्याधन - विद्या हेच धन
हिरवागार- खूप हिरवा
तपोबल तप हेच बल
महाराष्ट्र - महान असे राष्ट्र
महादेव- महान असा देव
रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
चरणकमल - चरण हेच कमल
वेषांतर - दुसरा वेश
नरसिंह - सिंहासारखा नर
भवसागर - विश्वरूपी सागर
लालभडक खूप लाल