Google ads

Ads Area

दलित म्हणजे काय ?दलित साहित्य म्हणजे काय ?| Dalit mhanje kay | Dalit Sahitya mhanje kay

 दलित म्हणजे काय ?दलित साहित्य म्हणजे काय ?|Dalit mhanje kay | Dalit Sahitya mhanje kay

दलित हा शब्द अनेकदा ऐकलेला असतो परंतु  दलित म्हणजे काय हे सांगता येत नाही .

दलित:   दलित म्हणजे वंचित असलेला समाजातील घटक होय

असा समाज की समाजाने शैक्षणिक ,सामाजिक ,आर्थिक ,राजकीय क्षेत्रापासून उपेक्षित ठेवला गेलेला घटक होय .

आपला समाज हाच जातीपातीच्या नावावरून एखाद्या समाजाला आपल्यापैकी न मानता कनिष्ठ दर्जाची वागणूक देऊन त्यांना आपल्यात सामावून घेत नाहीत असा समाज म्हणजे दलित समाज होय .

अशा दलित समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समजल्या  जाणाऱ्या लोकांना दलित असल्याची ,गुलाम असल्याची जाणीव करुन दिल्यानंतर त्यांना आत्मजाणीव येईल आणि समाजाने केलेल्या अन्यायावर मात करावी .आपला जगण्याचा हक्क हिरावून घेतलेल्या लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून माणुसपणाची जाणीव करुन द्यावी आणि सगळीकडे समतेचे राज्य निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती .

 डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ," गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करुन दया म्हणजे तो आपोआप बंड करुन उठेल .

दलित समाजावर सतत अन्याय होत असल्याने त्यांना या समाजविघातक कृत्यापासून सावध करणे त्यांचे कर्तव्य होते म्हणून शिक्षित होणे महत्त्वाचे आहे असा त्यांचा विचार.

 दलित म्हणजे एक विशिष्ट जात नव्हे तर दलित म्हणजे शोषित, पीडित असा समाज किंवा एखादी व्यक्ती असू शकते मग हा दलित कोणत्याही जातीचा कोणत्याही स्तरातील जातीचा असू शकतो परंतु पूर्वीच्या काळी समाजात वर्णव्यवस्था असल्यामुळे जातीची सवर्णांकडून खालच्या स्तरातील लोकांवर अन्याय अत्याचार शोषण होत होते; म्हणून त्या लोकांना आपण दलित म्हणत अशीच संकल्पना आजही समाजामध्ये रुढ होऊन बसली आहे, खरं तर विशिष्ट जात ही म्हणजेच दलित समाज असा जो गैरसमज लोकांच्या मनात बसलेला आहे तो प्रथम दूर झाला पाहिजे. 

दलित म्हणजेच विशिष्ट समाज जात धर्म हा नसून सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रापासून उपेक्षित राहिलेला समाज आणि त्याच्यावर होत असलेला अत्याचार, शोषण म्हणजे दलित समाज होय .या ठिकाणी विशिष्ट जात, धर्म आणि त्यातील लोकांचा समूह म्हणजेच दरीत असा याचा अर्थ होत नाही, ज्या लोकांनी या सगळ्या क्षेत्रापासून उपेक्षित जीवन जगले आहेत तसेच अन्याय,अत्याचार सोसलेले आहेत, असा समाज म्हणजे दलित. पूर्वीच्या काळी यालाच अस्पृश्य म्हणून संबोधले जात होते .

दलित साहित्य | Dalit Sahitya

दलित समाजातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जो अन्याय अत्याचार सोसलेला समाजातील घटक वाचू लागला, लिहू लागला ,अशा समाजातून आपले विचार ,गाऱ्हाणं लिखाणातून मांडू लागला यातून जे साहित्य निर्माण झाले ते दलित साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले .

दलित समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून लिहिले गेलेले साहित्य दलित साहित्य म्हणून ओळखले जात असले तरीही हे साहित्य वाचत असताना लोकांवर किती भयानक छळ ,अन्याय झाला असेल याची जाणीव होते ,म्हणून सर्व साहित्य प्रकारातील दलित साहित्य दर्जेदार साहित्य मानले जाते .

दलित साहित्यातून समाज कोणत्या यातना भोगत आहे ,तसेच कोणत्या अनुभवातून समाज चालला आहे याची जाणीव करून दिली गेली आहे .हे दलित साहित्यातील आत्मकथन वाचले तर कोणत्याही स्तरातील ,समाजातील व्यक्तीला दलित समाजावर झालेला अन्याय अत्याचार यावर वाचा फोडण्यासाठी सज्ज होईल एवढा भयानक अन्याय दलित समाजावर झालेला आहे .

दलित साहित्य निर्माण झाले ते डॉ.आंबेडकर यांच्या विचारातूनच होय; लोकांना अन्यायकारकतेची जाणीव करुन दिल्यामुळे विचार करु लागले ,मांडू लागले ,शिक्षण घेऊ लागले आणि अन्यायकारक परिस्थितीला तोंड देऊ लागले .तरीही आजही लोक गुलामीचे जीवन जगत आहेत .अशी गुलामगिरी वेळीच झटकून देऊन माणुसकीचे झरे निर्माण होण्याची गरज आहे .

#आणखी वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या नावाने ओळखले जाते

डॉ  बाबासाहेब आंबेडकर

महात्मा फुले मराठीत माहिती

पोलीस भरती संपूर्ण जिल्ह्याची माहिती 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area