शालेय शिक्षण व क्रीडा विभागात अधीक्षक पदासाठी भरती | shaley shikshanv krida vibhagat adhikshak padasathi bharati
महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागातील अधीक्षक व इतर तत्सम पदे ही सामान्य राज्य सेवा गट ब ( प्रशासन शाखा) मध्ये काही पदे भरावयाची असल्याने विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज जे इच्छुक आहेत त्यांनी भरावा .
शालेय व क्रीडा विभागात अधीक्षक पदासाठी ही जाहिरात असून या पदासाठी जे शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांनी 3 वर्षे सेवा पूर्ण केलेली असून त्यांची पदव्युत्तर परीक्षा ब श्रेणीत उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी अर्ज करून आपल्याच क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी आली आहे .
शासकीय कर्मचारी म्हणलं की एका जागेवरुन पदोन्नती होणे खूप अवघड असते ,सेवेत रूजू झाल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत एकाच जागी सेवा करुन काहींना कंटाळा आलेला असतो ,नोकरी सोडून देऊ शकत नाहीत व आलेल्या दिवसाला सामोरे जाऊन आपली सेवा पूर्ण करत असतात ,असे दिवस आपल्यालाही बघायला नको यासाठी ज्यांना आपल्या सेवकार्यात बदल हवा असेल तर लगेच अर्ज भरायला सुरुवात करा .
काहींना असेही वाटत असेल की आपले वय झाले ,संसारात स्थीर झालो आहे आणि आहे त्या पगारापेक्षा नवीन ठिकाणी कमी पगार असू शकतो ह्या सगळ्या गोंधळात आपण राहत असतो असा प्रश्न तर सगळ्यांना पडणार ,पण जर खरंच बदल करायचा असेल तरच असा अर्ज भरा जेणेकरून तुम्हांला अधीक्षक पद मिळाले ,अधिकारी झालो, नवीन कामाची सुरुवात म्हणजेच जीवनात सुद्धा नावीन्य असणारच .
अशीही मानसिकता असू शकते की कमी पगार असला तरीही आपल्या अधिकाराखाली आपण या पदास योग्य न्याय देऊ शकतो ,जे तुम्हाला अगोदरपासून बदल करावासा वाटला असेल त्यांना मात्र कमी वेतनात का होईना संधी आहे .ज्यांची सेवा नुकतीच सेवा 3 वर्षे झाली आहे त्यांनी तर या गोष्टीचा विचार न करता अर्ज केला तर हरकत नाही .राहिला प्रश्न ज्यांनी सेवा भरपूर केली आहे पण नवीन ठिकाणी जाऊन स्थिर होण्यासाठी अवधी लागेल त्यासाठी आहे त्याच ठिकाणी समाधान मानून आपले सेवा सातत्य पूर्ण करा .
नवीन उत्साही सेवकार्यात बदल करू इच्छित आहेत त्यांनी अर्ज भरुन आपल्या कौशल्याचा फायदा करुन घ्यावा
जाहिरात आणि इतर सर्व माहिती पाहण्यासाठीखाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरुन सविस्तर माहिती जाणून घ्या .
अर्ज भरण्याचा कालावधी 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत
तसेच खाली दिलेल्या link वरूनही अर्ज करा
हे ही वाचा