मराठी वर्णमाला |Marathi varnamala |स्वर म्हणजे काय| swar mhanje kay| व्यंजने म्हणजे काय | vyanjane mhanje kay
मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे .
मराठीत वर्णमाला यांची संख्या अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे ,त्यामुळे निश्चित संगत येत नाही तरीही 48, 50, 52 अशीच संख्या दिलेली आहे .
पारंपरिक पद्धतीनुसार 48 वर्णमाला पाहायला मिळते .
आधुनिक पद्धतीनुसार 52 दिलेली आहे
स्वर म्हणजे काय ?
ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा तोंडातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात
स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात
स्वरांचे प्रकार
1) ऱ्हस्व स्वर
या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो ,म्हणजेच उच्चार आखूड होतो म्हणून त्यास ऱ्हस्व स्वर म्हणतात .
उदा . अ, इ, उ, ऋ, ऋ,
2 ) दीर्घ स्वर
या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजेच लांबट उच्चार होतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात.
उदा.
आ , ई, ऊ
3 ) संयुक्त स्वर
हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात .
संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात .
ए = अ + इ /ई
ऐ= आ + इ /ई
ओ = अ + उ /ऊ
औ = आ + उ /ऊ
अशा रीतीने एकूण 14 स्वर आहेत
स्वरादी म्हणजे काय
अं व अ: अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो,म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात.
स्वरादी 2 आहेत
अनुस्वार म्हणजे काय
एखादया अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्याअक्षराचा उच्चार करावा लागतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो .
अनु + स्वार = दुसऱ्यावर स्वार झालेला किंवा पाठीमागून आलेला
विसर्ग म्हणजे काय
विसर्ग म्हणजे मुक्त होणे अ : चा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो ,म्हणून या वर्णाला विसर्ग म्हणतात
अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाहीत,कारण त्यांचा उच्चार वर्णानसार बदलतो .
व्यंजने म्हणजे काय
वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत .
उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श व शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाचा व्यंजनात समावेश होतो .
* व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी 'अ ' या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते,म्हणून त्यांना स्वरांत म्हणतात .
* व्यंजने हो अपूर्ण उच्चारांची असल्याने त्यांचा पाय मोडून लिहितात .
उदा. म्
* त्यात स्वर मिळवल्यास ती पाय मोडून लिहिली जात नाहीत .
* दैनंदिन वापरात व्यंजनात स्वर मिळवूनच त्यांचा उच्चार करावा लागतो.
** उच्चार पूर्ण होण्यासाठीव्यंजने स्वरांवर अवलंबून असतात म्हणून त्यास परवर्ण म्हणतात .
**व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजनात स्वर मिसळणे गरजेचे असते .
व्यंजनाचे प्रकार
कठोर व्यंजने
क ,ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ यांचा उच्चारकरावयास कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हणतात .
श, ष, स या वर्णाचाही कठोर वर्णात समावेश होतो .
यांनाच श्वास/ अघोष वर्ग म्हणतात.
#मृदू व्यंजने
तसेच य,र ,ल ,व ,ह ,ळ तसेच सर्व स्वर स्वरादी,अनुनासिके यावर्णाचाही मृदू वर्णात समावेश होतो ,यांनाच नाद / घोषवर्ण म्हणतात .
विशेष संयुक्त व्यंजने
2 आहेत क्ष ,ज्ञ
FAQ
1) मराठीत स्वर किती आहेत ?
>> 12- 14
2 ) स्वरादी किती आहेत ?
>> दोन
3 ) व्यंजने किती आहेत ?
>> 34
4 ) महाप्राण किती आहेत ?
>> 14
5 ) अनुनासिके किती आहेत ?
>> 5
6 ) मराठी वर्णमाळेत किती वर्ण आहेत ?
>>> 48- 50-52 वेगवेगळी मते पहावयास मिळतात
7) संयुक्त व्यंजने किती आणि कोणती आहेत ?
>> 2 आहेत क्ष ,ज्ञ