बालदिनाचे महत्त्व निबंध | Baldinache mahattv nibandh
14 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात भारताचे पंतप्रधान पंडित नेहरु यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो .या बालकांवर योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे आहे .
या दिवसामुळे अनेकांना बालकांचे हक्क,त्यांचे मनोरंजनात्मक शिक्षण ,या सर्व गोष्टींची सगळ्यांना जाणीव करुन देणारा महत्त्वाचा दिवस आहे.
काही ठिकाणी अनेक लहान मुले बालमजूर असलेली दिसतात या बालदिनाला लोकांना समजून यायला लागले आहे की मुलांवर अन्याय होता कामा नये, जर अशी मुले कामावर दिसली तर त्या मालकावर गुन्हादाखल होऊ शकतोयासाठी कोणीही लहान मुलांना कामावर ठेऊ शकत नाहीत .
दुसरी गोष्ट अशी आहे की घरात जरी आईवडिलांच्या धाकात मूल असले तरी त्यावर अन्याय होत असेल तर समाज त्यास अद्दल घडवत असतो .त्यामुळे बालकांचे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेत नाहीत.
हे सगळे असताना मुलांवर संस्कार घडविणे पालकांच्या आणि शाळेतील शिक्षकांना असते .अशा मुलांच्या बालमनावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे त्यासाठी शाळा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांच्यातून थोर पुरुषांच्या कथा ,चरित्रे सांगून सुसंस्कारित बालके बनविणे महत्त्वाचे आहे .
#हे ही वाचा