Google ads

Ads Area

बालदिन मराठी माहिती | Baldin marathi mahiti

 बालदिन मराठी माहिती | Baldin marathi  mahiti 

बालदिन हा संपूर्ण  जगात साजरा केला जात असतो .सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते ,लहान मुलांना यादिवशी खूप सारे लाड  पुरविले जातात .आजचे बालक उद्याचे भविष्य घडविणार असतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन जमत नाही हे ही सर्वजण जाणून आहेत .

बालदिन माहिती (toc)

बालदिनाचा इतिहास

बालदिन हा  जगभरात 1925 पासून साजरा केला जात आहे .याविषयी संयुक्त राष्ट्र संघाने  20 नोव्हेंबर मध्ये बालदिन साजरा करावा अशी घोषणा केली  .1959 च्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात बालदिन साजरा केला जात होता परंतु 1959 नंतर संयुक्त राष्ट्र  संघाच्या आमसभेने बालहक्काचीसनद स्वीकारली म्हणून 1959 नंतर 20 नोव्हेंबर हाच दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो 191 देशांनी त्यावेळी मान्यता दिलेली होती. अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना बालदिन  साजरा केला जात असतो.

  बालदिन भारतात केव्हा साजरा करतात 

आपल्या भारतात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी 1964 नंतर  14 नोव्हेंबर ला साजरा केला जातो.

 बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिवशी साजरा केला जातो. बालदिन हा दिवस नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा का करतात असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असतो पंडित नेहरू यांना सगळेजण लाडाने चाचा नेहरू असे म्हणत होते . नेहरू यांना लहान मुल आणि गुलाबाचे फुल खूप आवडत असे म्हणून लहान मुलांविषयी अत्यंत प्रेम आपुलकी असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस म्हणजे बाल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

बालदिनाचे महत्त्व

बालदिन हा चाचा नेहरूंच्या जन्मदिवशी साजरा करत असले तरी बालकांचे हक्क हे आपण हिरावून न घेता बालकांना बालकांप्रमाणे राहण्यासाठी स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, मुलांना संस्कार, शिस्त आणि मनोरंजनात्मक खेळ या गोष्टी ंचा धडा त्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक असते. आजचा बालक उद्याचा भावी नागरिक म्हणून देशामध्ये आपले व्यक्तिमत्व आपले करिअर करण्याचा प्रयत्न करत असतो आज जे बालक आहे ते उद्या देशाचे नागरिक म्हणून नावारुपास येणार आहे म्हणून अशा बालकावर संस्काररूपी शिदोरी देणे आवश्यक आहे ;म्हणून बालक हा देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजून त्याच्यावर सुसंस्कार घडवणे आपल्या हाती आहे .

आजच्या आधुनिक युगात बालकांवर संस्कार होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण प्रत्येक कुटुंबामध्ये पैसा कमावणे हे जरी महत्त्वाचे असले तरीही मुलांवर संस्कार घडवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे . पूर्वीच्या काळी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती असल्याने मुलांवर आपोआपच संस्कार घडत होते .समाजात, घरात बालकाला न सांगता ,न शिकवता, संस्कार घडत होते. आज-काल माझे कुटुंब एवढेच आहे हे बालकाच्या मनावर बिबवले गेले असल्याने विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुद्धा बालमनावर परिणाम होताना दिसतात.

आज सगळीकडे बालदिन साजरा केला जातो ,बालदिनाला योग्य संस्कारक्षम वातावरण निर्माण करुन दिले पाहिजे .

आजचे बालक उद्याचे भविष्य घडवणार आहे याची जाणीव प्रत्येक घरात शाळेत ,समाजात, गावोगावी होणे अपेक्षित आहे मात्र तशी अपेक्षा त्याच्याकडून ठेवलीन जाता त्याला एका विषयी साच्यात अडकवला जातो आणि या साच्यातून बाहेर येणार नाही अशीही सोय केलेली असते 

आजच्या बालकांच्या अंगी नवनिर्माण करण्याची ताकद आहे पण आपण त्याच्या नवनिर्मिती क्षमता आधीच काढून टाकतो  हे बालदिन साजरा करताना तेवढं तरी स्वातंत्र्य बालकांना मिळाले पाहिजे याचा विचार होणे अपेक्षित आहे  कोणतेही ओझे त्यांच्यावर लादू नये ही समज सगळीकडे निर्माण व्हायला पाहिजे .

बालकाचे मन काहीतरी बनण्याचे असते परंतु शाळा ,कुटुंब यास त्यांच्या क्षमतेनुसार करिअर न होऊ देता त्याचेच मन परिवर्तन करुन आवडत नसलेल्या मार्गाला लावण्याचा ध्यास  घेतलेला असतो .त्यामुळे मुलांमध्ये आजकाल  गुणवत्ता दिसेल पण त्यात त्यास अरुची असलेली दिसेल .त्याच्या संकल्पना पक्क्या झाल्या नाहीत तर पुढे जाऊन त्यास त्रास होत असतो .

पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाही मुलास नाहक त्रास होत असतो ,त्याच्या कुवतीपेक्षा पालक ,शिक्षक जास्त अपेक्षा  ठेवत असतात . त्यामुळे तो दबून जात असतो.


हे ही वाचा

बालदिन निबंध

बालदिनाचे महत्त्व




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area