मराठी वर्णमाला सराव चाचणी 3 | marathi varnamala sarav chachani 3
मराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
1) भाषा म्हणजे काय ?
अ ) बोलणे
ब ) लिहिणे
क ) संभाषणाची कला
ड ) विचार व्यक्त करण्याचे साधन
2 ) म या वर्णाचे स्थान कोणते?
अ ) कंठस्नान
ब ) तालुस्थान
क ) मूर्धास्थान
ड ) ओष्ठ्यस्थान
3 ) कंपित वर्ण हा आहे?
अ ) र
ब ) ट
क ) फ
ड ) अ
4 ) नाकातून होणाऱ्या ङ्म ण म न या वर्णाच्या उच्चाराला काय म्हटले जाते ?
अ ) अनुस्वार
ब ) अनुनासिक
क ) विसर्ग
ड ) शब्द
5 ) इ, ए ,ऋ ,हे कोणते स्वर आहेत
अ ) ऱ्हस्व
ब ) दीर्घ
क ) संयुक्त
ड ) विजातीय
6 ) इंग्रजी स्वरांची जोडी ही आहे .
अ ) अं ,अ:
ब ) ऋ , ल
क ) अँ ,ऑ
ड ) ए , ऐ
7 ) ऱ्हस्व वर्णाचा गट कोणता आहे .
अ ) आ , ई ,ऊ
ब ) ऋ ल ,ए
क ) ए ,ओ ,औ
ड ) अ ,इ, उ
8 ) कठोर वर्णाचा गट कोणता आहे ?
अ ) ङ्म ,ण ,म
ब ) द , ध ,भ
क ) क, ट ,प
ड ) ग ,ज , ब
9 ) ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो
अ ) जास्त लांबीचा
ब ) कमी लांबीचा
क ) मध्यम लांबीचा
ड ) यापैकी नाही
10) कोणता असा वर्ण आहे की जो दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो ?
अ ) व्यंजन
ब ) स्वर
क ) स्वरादी
ड ) अनुनासिक
# उत्तरे
1. ( ड )
2. ( ड )
3. ( अ )
4. ( ब )
5. ( ड )
6. ( क )
7. ( ड )
8. ( क )
9. ( ब )
10. ( ड )