महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम | police bharati 2022 syllabus
विद्यार्थी मित्रांनो बहुप्रतिक्षेत असलेली पोलीस भरती यासाठी अनेक विद्यार्थ्यांना मानसिकरित्या त्रास सहन करावा लागला आहे .पोलीस भरती ही कधी होणार यासाठी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणारे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे .
पोलीस भरतीसाठी करावी लागणारी शारीरिक कसरत आणि त्याबरोबर अभ्यास यासाठी अनेकांनी आपले घरदार सोडून सराव करण्यासाठी अकॅडमी किंवा अभ्यासवर्गाला प्राधान्य देऊन आपल्या जीवाची बाजी करत आहेत .
अनेक विद्यार्थी जाहिरात येण्याच्या प्रतीक्षेत असताना आणि तेथून पुढे तयारीला लागण्यासाठी कमीतकमी दोन महिन्यांच्या कालावधीत योग्य सराव करुन यश खेचून आणण्याची क्षमता आत्मसात करुन बसलेले आहेत .
9 नोव्हेंबर 2022 पासून पोलीस भरती अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे .
विध्यार्थ्यांना एकच गोंधळ नेहमी सतावत असतो तो म्हणजे अर्ज नक्की कोणत्या ठिकाणी भरायचा हा गोंधळ मात्र प्रत्येकवर्षी मुलांना सतावत असतोच .
पण ,विद्यार्थी मित्रांनो तुमची ज्या ठिकाणी इच्छाशक्ती होईल शिवाय घरातील लोकांचे। ,मित्रांचे आणि आपले मार्गदर्शक गुरुवर्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन घेण्यास विसरु नका .
ज्याठिकाणी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी भरती होणारच असा आत्मविश्वास निर्माण करा .नव्या उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण तयारीने तुमची जागा ( पोलीस बनण्याची इच्छा ) आपल्या कौशल्याच्या जोरावर खेचून आणा ,तुमच्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी आली आहे .या संधीचा फायदा करुन घ्या
विद्यार्थी मित्रांनो ! खाली दिलेल्या अभ्यासक्रमावरून तुम्हाला अभ्यास करुन लेखी परीक्षेची चांगली करायची आहे ,त्यासाठी सराव चाचण्या सोडवणं खूप गरजेचे आहे .अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका ह्या सतत समोर असल्या पाहिजेत जो घटक अवघड वाटतो त्या घटकांचे मार्गदर्शन घेत जा ,सगळे प्रश्न सोडविता आलेच पाहिजेत .
शारीरिक चाचणी झाल्यावर लेखी परीक्षा होणार असल्याने केवळ शारीरिक चाचणीचा सराव करत बसू नका ,दोन्हींचा मेळ तुमच्या पद्धतीने करुन घ्या .
अभ्यास आणि शारीरिक सराव याचे तुमचे स्वतःचे वेळापत्रक तयार करा मग त्यानुसार तुमच्या पद्धतीने अभ्यासाला लागा .वेळेनुसार त्यात लवचिकता सुद्धा ठेवा पण अभ्यासाचे एक चांगले नियोजन करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी सहज साध्य होतील .
अभ्यासक्रम
1 ) मराठी
1) समानार्थी शब्द
2) विरुद्धार्थी शब्द
3) म्हणी
4) वचन बदला
5) लिंग बदला
6) वाक्प्रचार
7) वर्णमाला ( मुळाक्षरे ) त्यांची उच्चारस्थाने
8) समास
9) काळ
10) शब्दांच्या जाती (सव्यय )
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
2) गणित
1) संख्या
2) बेरीज
3) वजाबाकी
4) गुणाकार
5) भागाकार
6) पूर्णांक संख्या
7) अपूर्णांक संख्या
8) वर्ग आणि वर्गमूळ
9) घन आणि घनमूळ
10) शेकडेवारी
11) नफा तोटा
12) घातांक
13) घड्याळ
14) सरळव्याज ,चक्रढव्याज
15) सरासरी
16) दशमान पद्धती
17) काळ वेग काम
18 )गुणोत्तर व प्रमाण
19) भागीदारी
20) मसावी
21) लसावी
22 ) कसोट्या
3) बुद्धिमत्ता चाचणी
1) तर्कावर आधारित
2) घड्याळावर
4) नातेसंबंध
5) दिशा
6) सांकेतिक लिपी
7) सांकेतिक भाषा
8) संख्या लिपी
9) अक्षरलीपी
10) व्हेन आकृती
4) सामान्य ज्ञान
■ भूगोल
अ ) महाराष्ट्राचा भूगोल
ब ) भारताचा भूगोल
■ इतिहास
1) समाजसुधारक
2) भारताचे व्हाइसरॉय
3) 1857 चा उठाव
4) भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास
5) ऑगस्ट क्रांती
6) चळवळी
7) कायदे
1909
1919
1935
8) हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
■ राज्यशास्त्र
1) भारताचे संविधान
2) लोकसभाB
4) राज्यसभा
4) विधानसभा
5) विधानपरिषद
6) राष्ट्रपती
7) पंतप्रधान
8) मुख्यमंत्री
9) राज्यपाल
10) परिशिष्टे
11) उपराष्ट्रपती
12) संसद
13) कर्तव्ये,हक्क
14) मार्गदर्शक तत्वे
15) ग्रामशासन
16) समित्या
17) घटनादुरुस्ती
18) पंचायत समिती
19) नगरपालिका
20) महानगरपालिका
21) ग्रामीण व मुलकी प्रशासन
22) जिल्हा परिषद
23) मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
24 ) गट विकास अधिकारी BDO
■ विज्ञान
1) शास्त्रीय उपकरणे
2) शास्त्रज्ञ कार्य
3) शोध
4) विविध शास्त्र
■ इतर
1) विकास योजना
2) पुरस्कार
महाराष्ट्र
राष्ट्रीय
3) क्रीडा
मैदाने
व्यक्ती
चिन्हे
प्रतीके
ठिकाणे
स्पर्धा
4 ) चालू घडामोडी
अभ्यासक्रम
1) मराठी व्याकरण : 25 गुण
2) गणित : 25 गुण
3) बुद्धिमत्ता चाचणी : 25 गुण
4) सामान्य ज्ञान : 25 गुण
शारीरिक चाचणी
पुरुष गट गुण
1 ) 1600 मीटर धावणे 20
2) 100 मीटर धावणे 15
3 ) गोळाफेक 15
एकूण 50
महिला गट गुण
1 ) 800 मीटर धावणे 20
2) 100 मीटर धावणे 15
3 ) गोळाफेक 15
एकूण 50
आणखी वाचा
1 ) पोलीस भरती सराव चाचणी 1 Click
2 2) पोलीस भरती माहिती Click