मराठी वर्णमाला सराव चाचणी 10| marathi varnamala sarav chachani 10
Iमराठी वर्णमाला मराठी वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते . काही अभ्यासाकांच्या मते वर्णमालेची संख्या यात तफावत असलेली दिसून येते, तरीही वर्णमाला दोन अंकाने वाढली किंवा आहे तीच असली तरीही वर्णमाला खूप महत्त्वाची आहे.स्वर, स्वराधी,व्यंजने ही महत्त्वाची आहेत यामध्ये वर्णमाला पाहत असताना यांची आपणास ओळख असणे गरजेचे आहे .
प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा होतो शिवाय त्याची उच्चारस्थाने आपणास माहिती असणे आवश्यक आहे
उत्तरे प्रश्न संपल्यानंतर खाली दिलेली आहेत
आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते जाणून घ्या
1) कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो ?
अ ) क वर्ग
ब ) प वर्ग
क ) त वर्ग
ड ) ट वर्ग
2 ) खालील महाप्राण व्यंजने ओळखा
अ ) ख फ ध
ब ) क ट प
क ) च र व
ड ) ज च न
3 ) क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले आहे ?
अ ) दादोबा
ब ) दामले
क ) सबनीस
ड ) चिपळूणकर
4 ) वर्णमालेत या व्यंजनांचा समावेश केला जात नाही .
अ ) श , स
ब ) ह , ळ
क ) क्ष , ज्ञ
ड ) अं , अ:
5 ) तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती आहेत?
अ ) क
ब ) च
क ) छ
ड ) ज
6 ) क च त ट प या गटातीलव्यंजनांना काय म्हटले जाते.
अ ) स्पर्श व्यंजने
ब ) अंतस्थ व्यंजने
क ) उष्म व्यंजने
ड ) मृदू व्यंजने
7 ) विसर्ग हा वर्ण आहे .
अ ) तालव्य
ब ) ओष्ठय
क ) कंठ्य
ड ) दंततालव्य
8 ) दोन विजातीय स्वर एकत्र येऊन निर्माण होतो .
अ ) संयुक्त व्यंजन
ब ) संयुक्त स्वर
क ) ऱ्हस्व स्वर
ड ) दीर्घ स्वर
9 ) म हे व्यंजन कोणत्या प्रकारात येते .
अ ) तालव्य व्यंजन
ब ) सजातीय स्वर
क ) अनुनासिक
ड ) अघोषवर्ण
10) निभृत म्हणजे काय ?
अ ) ऱ्हस्व उच्चार
ब ) दीर्घ उच्चार
क ) लांबट उच्चार
#ड ) तोकडा उच्चार
उत्तरे
1. ( अ )
2. ( अ )
3. ( क )
4. ( क )
5. ( ब , ड )
6. ( अ )
7. ( क )
8. ( ब )
9. ( क )
10. ( ड )