Google ads

Ads Area

मराठी म्हणी सराव चाचणी 1|Marathi mhani sarav chachani 1|सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सराव चाचणी (म्हणी )

 मराठी म्हणी सराव चाचणी 1|Marathi mhani sarav chachani 1|सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सराव चाचणी  (म्हणी )

नमस्कार विद्यार्थी मित्रहो ,
आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव चाचणीघेत आहोत .
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असते. ही शिष्यवृत्ती परीक्षा जरी अनिवार्य नसली तरीही, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या मूलभूत संकल्पना पूर्ण होऊन तो शालेय जीवनात चांगल्या रितीने अभ्यासाचे कौशल्य प्राप्त करून तो स्वयं अध्ययनद्वारे आपला मार्ग निवडण्यासाठी आणि कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी या स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. 

आज आपण मराठी विषयातील शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वाचे विचारले जाणारे प्रश्न विचारात घेऊन सराव चाचणी घेत आहोत .चाचणी इतर विद्यार्थ्यांनाही पाठवा.

या सराव चाचणीनंतर उत्तरे खाली दिलेली आहेत ,आपली उत्तरे तपासून पहा .

1) बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ लिहा.

 अ) खोल पाण्यात बुडणे

 ब )अधोगती लागून जास्तच खाली जाणे

क ) जीव वाचविता न येणे 

ड ) खोल खड्ड्यात जाणे


2 ) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ लिहा .

अ) एकाच गावात खूप झाडे असणे

ब ) निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे

क ) शेजारी शेजारी वास्तव्य असणे 

ड) सहवासाने शेजाऱ्याचा गुण घेणे


3)  ओठात एक आणि पोटात एक  या म्हणीचा अर्थ काय ?

अ) एकाच व्यक्तीने दोन प्रकारे विचार करणे 

ब) खरे बोलणे व खोटे बोलणे

क) मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे

ड ) मनातील हेतू व बोलून दाखविलेला विचारात फरक असणे


4) बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता?

अ) बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा

ब) दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर

क) निरपराध माणसाला शिक्षा करणे

 ड) शहाणपणाचे सोंगआणणारा मूर्ख


5) हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते म्हणजे काय ?

अ भरपूर शिकून लवकर विसरणे

ब सुखापेक्षा दुःख अधिक असणे 

क आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते

ड लक्ष्मी हत्तीच्या पावलाने येते व मुंगीच्या पावलाने जाणे


 6) तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे म्हणजे काय ?

अ . विनाकारण छळ सहन करणे

ब .अगतिक स्थिती होणे

क .विनातक्रार छळ सहन करणे

ड. न बोलता मार सहन करणे


7 ) कानामागून येणे नि तिखट होणे याचा अर्थ काय?

अ ) मागून येऊन वरचढ होणे

ब ) कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे

क ) डोईजड होणे

ड ) मागून येऊन मोठेपण मिळणे


8) आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ ओळखा .

अ .दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

ब .स्वतःचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे

क . आईला बाईचा आधार असणे

ड . आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते.


9) कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा.

 अ .कोल्हा काकडी खातो

 ब. लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात

क . कोठेही गेले तरी  मनुष्य स्वभाव सारखाच

ड. चतुर माणसे संकटावर मात करतात.


10) दृष्टी आड सृष्टी याचा अर्थ काय?

अ . आपल्या मागे काय चालते, ते दिसू शकत नाही .

ब . दृष्टीशिवाय सृष्टी दिसत नाही

क.  दुर्लक्ष करणे

ड . दृष्टीत दोष असणे


11) पळसाला पाणी तीनच याचा अर्थ सांगा.

 अ . पळसाची झाडे सर्व सारखीच दिसतात.

 ब.  पळसाच्या देठाला तीनच पाने असतात

 क . पळसाच्या देठाला तीन पाने असली तरी झाड शोभून दिसते.

 ड .कुठेही गेले तरी तेथील परिस्थिती सामान्यत: सारखीच असते.


12) उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ लिहा.

 अ . उथळ पाणी खळखळ वाहते

 ब . अल्पज्ञान पण ताटा फार 

क . उतळ पाणी चांगले असते

 ड . उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते.


13) डोळ्यात केर आणि कानात  फुंकर या म्हणीचा अर्थ सांगा.

 अ . फुंकल्याने डोळ्यात केर जातो

 ब .  रोगावर अनेक उपाय 

 क . रोग एक आणि उपाय निराळाच

 ड . उपायाशिवाय रोग बरा होत नाही


14) नावडतीचे मीठ आळणी याचा अर्थ सांगा 

 अ  .नावडतीचे मीठ आळणी असते

 ब . नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

 क . ना आवडत्याने केलेले कार्य अळणी मिठासारखे असते.

 ड . वरीलपैकी एकही नाही


15) काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ सांगा.

 अ )  काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे

  ब  ) एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे

  क ) वस्तू जवळच असूनही ते शोधीत फिरणे

  ड ) नजीकच्या कामासाठी दुरचा मार्ग स्वीकारणे

# उत्तरे 

१ .   ( ब )

२.    ( ब )

3.    ( ड )

4.    ( ब )

5.   (  ड  )  

6.   (  क )

7.   (  अ )

8.    ( अ  )

9.    (  ब )

10.   ( अ   )

11.   (  ड )

12.   (  ब )

13.    (  ब )

14.    (  क )

15.    (  क )


आणखी वाचा

शिष्यवृत्ती परीक्षा सरावचाचणी

शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम,स्वरूप

मराठी सराव चाचणी

मी शाळा बोलतेय

मी वर्गाचा मॉनिटर

मी मुख्याध्यापक बोलतोय

मी नापास विद्यार्थी बोलतोय

मीआदर्श विद्यार्थी बोलतोय

मी निवृत्त शिक्षक बोलतोय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area