Google ads

Ads Area

शिक्षक दिन मराठी माहिती |Teacher day information in marathi | shikshak din marathi mahiti |शिक्षक -विद्यार्थी संबंध

 शिक्षक दिन मराठी माहिती २०२३|Teacher day information in marathi | shikshak din marathi mahiti |शिक्षक -विद्यार्थी संबंध

शिक्षक दिन म्हणजे सगळीकडे उत्सुकता असते विद्यार्थी शिक्षकांना गुलाबपुष्प द्यावे आणि शिक्षकांचा आशीर्वाद घ्यावा अशी आधीपासूनच तयारी करत असतात . शिक्षकांशी त्यानिमित्ताने आपली ओळख होईल आणि मला त्यांच्याकडून मार्गदर्शन, ज्ञान मिळेल यासाठी शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो ,तर काही विद्यार्थ्यांना शिक्षक हे आपले आदर्श ,आदरणीय असतात त्यामुळे त्यांना शिक्षक दिनादिवशी गुलाबाचे फुल देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा अशी मनोमन इच्छा असते असा हा शिक्षक दिन.

शिक्षक दिन मराठी माहिती
शिक्षक दिन मराठी माहिती


अक्र 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य

कालावधी व विशेष

1

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म

5 सप्टेंबर 1888

2

राधाकृष्णन यांचा मृत्यू

17 एप्रिल 1975

3

उपराष्ट्रपती

1952 - 1962 

4

राष्ट्रपती

1962 - 1967

5

शिक्षणातील योगदान

पाश्चात्य विचारांच्या तात्विक,विचारांच्या गुणात्मक, तर्कशुद्ध ,आणि रचनात्मक टीकासाठी ओळखले जात

6

बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू

1939 - 1948 

7

सोनियेत युनियन मध्ये भारताचे दुसरे राजदूत

1949 -  1952 

8

तत्त्वज्ञान

अद्वैत तत्वज्ञान 

9

राजकीय पक्ष 

भारतीय काँग्रेस पक्ष


10

पुरस्कार

भारतरत्न 1954  ,नाइटहूड 1931 

11

ग्रंथसंपदा

60 पेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके

12

पत्नीचे नाव

सिवाकामुअम्मा 

13

अपत्ये 

पाच मुली एक मुलगा ( सर्वपल्ली गोपाल ) 



शिक्षक दिनाची माहिती ( toc)

शिक्षक दिन का साजरा केला जातो |shikshak din ka sajara kela jato 

5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. या दिवशी संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला .डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक चांगले शिक्षक म्हणून कार्यरत होते.  भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक व्यासंगी, विद्वान असे शिक्षक होते त्यांनी आपली 40 वर्षे ही अध्यापनात घालवली .विद्यार्थ्यांना घडवण्यात राधाकृष्णन यांचा मोलाचा वाटा होता तसेच भारताचे राष्ट्रपती म्हणून ख्यातनाम होते.

 एके दिवशी त्यांचे विद्यार्थी त्यांचा म्हणजे वाढदिवस साजरा  करणार होते ,यावर त्यांनी "माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याचे शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल" अशा शब्दात आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले.  तेव्हापासून ५ सप्टेंबर 1962 सालापासून शिक्षक दिन हा त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कारही मिळाला अशा या महान विद्वान विद्युतप्रचूर, व्यासंगी, विद्यार्थीप्रिय शिक्षक यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो.

शिक्षक दिन का साजरा करावा|shikshak din ka sajra karava 

शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचे उत्तम कार्य करीत असल्याने त्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्याप्रति समाजात आदर, विश्वास निर्माण झाला पाहिजे. यासाठी सुद्धा शिक्षक दिन म्हणून साजरा करणे आवश्यक आहे .समाज घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका ही अत्यंत मोलाची असते. अशा समाजाचे ऋण शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून फिरण्याचे कार्य करत असतो. वर्षभर शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करत असताना एक दिवस विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक दिन म्हणून शिक्षक दिनाचे महत्त्व कळावे आणि शिक्षकांनाही स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी शिवाय अध्यापन करत असताना इतरही शिक्षकांप्रती आदरभाव ,शुभेच्छा, आशीर्वाद घेण्यासाठी शिक्षक दिन साजरा होणे आवश्यक आहे.


शिक्षक दिन असा साजरा करावा|shikashak din asa sajara karava 


५ सप्टेंबर रोजी प्रत्येक वर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यासाठी मुलांची उत्सुकता भरपूर शिगेला पोहोचलेली असते .एक दिवस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनअध्ययन दिन म्हणून अध्यापन न करता विद्यार्थ्यांना आपल्याच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असते. त्यासाठी अगोदरच याची तयारी सुरू करावी.

सकाळी परिपाठाचे नियोजन विद्यार्थ्यांना करायला सांगून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ किंवा हार घालून त्यांना अभिवादन करून तसेच  सरस्वती पूजन करुन शाळेत असलेल्या सर्व प्रतिमांना अभिवादन करणे.

  विद्यार्थी शिक्षक यांनी काही विद्यार्थ्यांचे नियोजनाप्रमाणे शिकवण्यासाठी तासिका लावून घ्याव्यात .त्यापैकी काही विद्यार्थी यांनी आपल्या आवडीचा विषयानुसार अध्यापन करावे. काही विद्यार्थी शिपाई म्हणूनही काम करत असतात, तर शाळेचा सर्वेसर्वा म्हणून मुख्याध्यापक हा ही महत्त्वाचा घटक असल्याने मुख्याध्यापक पद ज्या विद्यार्थ्यास शोभेल असाच विद्यार्थी मुख्याध्यापक होत असतो. हे अध्यापनाचे कार्य वरच्या वर्गाने खालच्या वर्गातील मुलांना करावे.

 दहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गात अध्यापन करतील .असे नियोजन असणे गरजेचे असते .दहावीच्या विद्यार्थ्यांनी नववीचा आणि आठवीचा अभ्यासक्रम अभ्यासलेला असल्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शिकवताना जसे आपले शिक्षक शिकवून गेलेले असतात तशाच पद्धतीने हेही विद्यार्थी अनुकरण करत असतात. काही विद्यार्थी आपल्या कौशल्याच्या जोरावर विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देण्यासाठी धडपडत असतात. अशा पद्धतीने त्यांनी तासिकांचे नियोजन करून अध्यापन करावे. संपूर्ण दिवस हा विद्यार्थी शिक्षक यांनीच अध्यापन करून शिक्षक दिन साजरा करत असताना त्यांना अध्यापन करत असताना आलेल्या अनुभवांचे कथन करण्यास सांगावे. 

 शिक्षकांना होत असणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणेही आवश्यक असते ,त्यावेळेस विद्यार्थी सुद्धा अध्यापन करत असताना अध्यापनात सुसूत्रता ,वर्ग नियंत्रण, समजून सांगणे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना अवघड वाटतात त्याच शिक्षकांनाही किती अवघड वाटत असतील याची जाणीव विद्यार्थ्यांना या दिवशी खरोखरच होत असते . तेव्हापासून ते असे ठरवतात की शिक्षकांना अध्यापन करत असताना कोणताही त्रास देणार नाही अशी ग्वाही देतात .

 विद्यार्थी शिक्षक यांचे मनोगत ऐकल्यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देऊन तुम्हीही असेच अध्यापन करावे यासाठी मार्गदर्शन, शुभेच्छा द्याव्यात आणि पसायदान म्हणून शिक्षक दिनाची सांगता करावी .

एकमेकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्यावात त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.


शिक्षक विद्यार्थी संबंध कसे असावेत

शिक्षक विद्यार्थी संबंध

शिक्षक विद्यार्थी संबंध 



 ✫ आत्मविश्वास निर्माण करणे 

 शिक्षकाने विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणे हा उद्देश असला तरीपण त्याच्याशी हितगुज साधने हे महत्त्वाचे असते. काही शिक्षक हे केवळ ज्ञान देणे एवढेच काम समजतात मात्र नंतर विद्यार्थी हा गेल्यानंतर त्याच्याशी कोणताही संबंध नसल्यासारखे वागत असतात. शिक्षक- विद्यार्थी आपुलकीचे नाते असावे .शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव दिसता कामा नये, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी नाते जपत असताना सर्व समान मानावेत. एखादा विद्यार्थी हुशार आहे म्हणून त्याचेच लाड पुरवणे हे शिक्षकाने टाळले पाहिजे,असे होत असेल तर विध्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड ,आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होत असतो .


✫ शिक्षकांची भीती नसावी 

आपणाला काहीच येत नाही  असा समज निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थी मागे रहात असतो. शिक्षकांनी त्याच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे .मुलांकडे भरपूर अशा समस्या असतात पण त्या सोडवण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी त्यांच्याकडे धाडस नसल्यामुळे ते शिक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत .त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे केवळ वर्गापुरतेच राहत असते.

* विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे 

 शिक्षकाने जाणीवपूर्वक त्याच्या भावना, समस्या त्याच्या घरगुती परिस्थितीनुसार अडचणी या जाणून घेऊन त्याच्यानुसार त्याच्या कृतीनुसार त्याला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

 * शिक्षण विद्यार्थीकेंद्री असावे 

  पूर्वीचे (शाळा )शिक्षण हे शिक्षककेंद्री होते आताचे शिक्षण विद्यार्थीकेंद्री असल्यामुळे शिक्षकांनी आपण खूप ज्ञानी आहोत विद्यार्थ्यांपेक्षा जास्त समजते असे समजू नये , कारण तसे समजत गेले तर आपण विद्यार्थ्यांसाठी आहोत ही गोष्टच बाजूला राहील .यासाठी त्याच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये रममाण होता आला पाहिजे. त्यांचा होऊन राहिला पाहिजे, त्यांच्या भावनामध्ये मिसळून राहता आले पाहिजे ; तरच  स्वतःला विद्यार्थी घडवत आहोत  याचा मनोमन आनंद वाटत राहील .अशातूनच ज्ञानदान करणे आवश्यक आहे ,नाहीतर त्यांच्या रममान होऊन त्यांच्यात मिसळून त्यांच्यामध्ये हसत खेळत गप्पा मारत राहिलो आणि ज्ञान देण्याचे विसरलो  तर चालत नाही .

या सगळ्या गोष्टीचा तोल सांभाळून जो शिक्षक राहतो तोच खरा शिक्षक होय. विध्यार्थ्यांना असं वाटते की हे शिक्षक वर्गावर आले पाहिजेत .अशा पद्धतीने शिक्षक वर्गात जाण्याअगोदरच मुलांना आनंद वाटला पाहिजे.अशा पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते असले पाहिजे .

* विद्यार्थ्याना आदर,आधार वाटला पाहिजे 

विद्यार्थ्यांनी कोणत्याही शिक्षकांशी बोलताना न घाबरता म्हणजेच आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रश्न विचारणे आवश्यक आहे .गप्पा मारत असताना शिक्षकांशी मैत्रीचे नाते  निर्माण होऊन त्यांच्यासमोर समस्या सोडवून घेण्यात कमीपणा वाटला नाही पाहिजे . विध्यार्थ्यांना आपला आधार आणि आदर वाटला पाहिजे  .


*. विद्यार्थी घडविताना संकोच नसावा 

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे एक विश्वासाचे आणि समतेचे असावे, शिक्षकाने विद्यार्थी घडवत असताना आपल्या मनामध्ये कोणताही संकोच ठेवता कामा नये ,तर तो विद्यार्थी आहे आणि त्याला ज्ञानाची भूक लागलेली आहे त्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजे एवढेच शिक्षकाच्या मनात विचार असले पाहिजे, तरच विद्यार्थी हे घडणार असतात.

 कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्याचे नुकसान होता कामा नये हे जर शिक्षकाच्या डोक्यात असेल तर कोणताच विद्यार्थी हा ज्ञानापासून आणि त्याच्या उत्कर्षापासून दूर राहणार नाही याची शिक्षकांना काळजी असली पाहिजे . 

*. विद्यार्थी देव समजून ( ज्ञानाची) भक्ती करावी 

विद्यार्थी हाच देव समजून जर शिक्षक असला तर त्याच्या ह्या देवाला प्रसन्न करण्यासाठी अतोनात कष्ट केले पाहिजे त्यासाठी झोप आली नाही पाहिजे, एवढी तळमळ स्वतःमध्ये असली पाहिजे . तरच खऱ्या अर्थाने म्हणजे शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी कार्य करत आहोत, सेवा करत आहोत, असा विश्वास देता येऊ शकतो .

** दुजाभव नको असतो 

शिक्षकांनी मुलांच्या बाबतीत कोणताच दुजाभाव केलेला आवडत नाही, एक वेळेस ते ज्ञान देण्यामध्ये कमी पडले तरी चालतील पण दुजाभाव करणारा शिक्षक कधीच त्यांना आवडत नाही ;म्हणून शिक्षकाने नेहमी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव कधीच करू नये.

** साधी राहणी उच्च विचासरणी 

विद्यार्थीं आपल्यासमोर अनुकरणप्रिय असतात म्हणून शिक्षकांनी नेहमी त्यांच्यासारखेच राहणे आवश्यक असते  हे कोणत्या स्तरातून येत आहेत, त्यांच्यासमोर जास्त हाय -फाय राहून जमत नाही,तसेच जास्त गबाळ्यासारखे राहूनही जमत नाही  मुलांना जसे आवडेल तशाच पद्धतीने म्हणजेच मुलांची शिक्षकाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो .म्हणजेच मुलांना हवं तसे राहणे आवश्यक असते तरच ते शिक्षकांच्या जवळ येऊ शकतात.

साधी राणी उच्च विचारसरणी असे शिक्षक विद्यार्थ्यांना खूप आवडत असतात, कपडे चांगली असून चालत नाही ,त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा असावा , जुनीच कपडे असली तरी स्वच्छ आणि इस्त्री केलेली कपडे जरी शिक्षकांनी दररोज घालून गेले तरी विद्यार्थ्यांप्रती आदर निर्माण होतो .दररोज आकर्षक झकपक कपडे घालून विद्यार्थ्यांच्या समोर गेले नाही पाहिजे . शिक्षकाने आपला विद्यार्थी जसा आहे तसाच पोशाख त्यांच्याप्रमाणे असावा त्यांनाही आपल्याशी बोलताना कोणताही संकोच वाटता कामा नये ,अशा पद्धतीने आपलाही पेहराव असला पाहिजे.


*  विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवणारा असावा

शिक्षक हा विद्यार्थ्यांना केवळ अध्यापन करून चालत नाही, एखादा पोपटासारखा बोलणारा शिक्षक आपल्या वक्तृत्वाच्या कलेने विद्यार्थ्यांना अध्यापनात समरस करून घेत असतो; परंतु ते तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता एखाद्या शिक्षकाने आपल्या कौशल्याच्या आधारावर विद्यार्थ्यांना गोड गोड न बोलता, गोड बोलून मनोरंजन न करता, स्वतःच्या कौशल्यावर विद्यार्थ्यांना ज्ञानाची भूक लागली पाहिजे ,त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, शिक्षण घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, नवे काहीतरी शिकावे, काहीतरी बनावे अशी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती आत्मसात करण्याची कला शिक्षकांनी करून घेणे गरजेचे असते.

 असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम स्थान निर्माण करून राहिलेला असतो. केवळ वक्तृत्व आहे म्हणून मुलांचे मनोरंजन होते पण विद्यार्थी मात्र ज्ञानाने कोरडेच राहतात. असा शिक्षक न होता विद्यार्थी कसा घडेल ? कसा यशाच्या शिखरावर जाईल? इथपर्यंत त्याची जिज्ञासा निर्माण करून त्यांना यशाची शिखरे पादांक्रांत करून घेण्यासाठी शिक्षकाची धडपड असावी. असा शिक्षक होणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे.

 केवळ पगार मिळतो म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांसमोर जाऊन आपले कर्तव्य पार पाडत असतो ,पण त्याच्यामध्ये सुद्धा तळमळ असणे गरजेचे आहे ,तरच विद्यार्थी यांची जी ज्ञानाची भूक आहे ती ज्ञानाची भूक आपण पूर्ण करू शकतो.

शिक्षक दिन केव्हा असतो ?

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असतो.


शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ?

शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.


शिक्षक दिन केव्हापासून सुरू झाला ?

शिक्षक दिन 1962 सालापासून सुरुवात झाला.


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


 राष्ट्रपती कोणते ज्यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन साजरा केला जातो ?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.


डॉ. डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? केंव्हा?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू या राज्यात झाला.५ सप्टेंबेर १८८८ 



#आणखी वाचा 

मी शाळा बोलतेय

मी आदर्श विद्यार्थी बोलतोय

मी वर्गाचा मॉनिटर बोलतोय

मी मुख्याध्यापक बोलतोय

मी नापास विद्यार्थी बोलतोय

मी निवृत्त शिक्षक बोलतोय






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area