माझा आवडता सण नागपंचमी | my favourate festival Nagpanchami| majha aavadata san Nagpanchami
नागपंचमी हा श्रावणतील महत्त्वाचा आणि सुरुवातीचा सण आहे .या सणाची खूप दिवसापासून तयारी चालूच असते .
नागपंचमी हा सण स्त्रियांसाठी खास असतो .नवीन लग्न झालेल्या नववधू माहेरी जाऊन नागपंचमीला खेळण्याची उत्सुकता लागलेली असते.
नागपंचमीला लहान मुलींपासून मोठया स्त्रियांना उत्सुकता लागलेली असते .या सणाच्या अगोदर एक दिवस भावाचा उपवास म्हणून स्त्रिया हा उपवास करतात आणि वारुळाला पुजायला जातात .त्याठिकाणी जाऊन नागाला दूध पाजण्यासाठी नेले जात असते .प्रत्यक्ष जरी नाग त्या ठिकाणी येऊन दूध पीत नसला तरीही वारुळात दूध सोडून महिला येत असतात .
दिवसभर उपवास पकडून दुसऱ्या दिवशी महिला पुरणपोळी करुन हा उपवास सोडत असतात .
नागपंचमी आली की मोठया झाडांना झोके बांधले जातात .त्याठिकाणी लहानापासून मोठया महिला यांना झोका खेळण्याची लगबग झालेली असते .
सकाळी उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी केली जाते . पुरणपोळ्या खाऊन दिवसभर झोका खेळून नटून थटून संध्याकाळी गावातील सगळ्या महिला ह्या एका ठिकाणी एकत्र येत असतात .त्याठिकाणी गाणी, फुगडी,झिम्मा असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जात असतात .
मुलांसाठी सुद्धा हा सण महत्त्वाचा असतो . काही भागात या दिवशी पतंग उडवली जाते तर काही भागात पतंग उडवत नाही . तरीही ज्या भागात उडवत असतात त्या भागात आठवडा भर अगोदरच मुले पतंगी उडवत असतात .
मोठ्या पुरुषांच्या दृष्टीने हा सण महत्त्वाचा असतो ,ज्यावेळी घरातील महिला खेळण्यासाठी गावात जमा होतात त्याचवेळी तसेच पुरुष सुद्धा कबड्डी,सुरपाट्या खेळत असतात .
असा सण खूप आनंद देत असतो . नागपंचमीच्या शुभेच्छा !
# वाचा [ हे ही वाचायला आवडेल ]
.