मी वर्गाचा मॉनिटर बोलतोय |mi vargacha moniter boltoy|
मी वर्गाचा मॉनिटर बोलतोय ! माझ्याकडे काय जबाबदारी (शाळेत) दिली असावी हाच मला प्रश्न पडतो मी हुशार विद्यार्थी नाही मी आदर्श विद्यार्थी नाही पण मला सगळे घाबरतात .वर्गात मला प्रेमाने पद दिले आहे ,म्हणून तर अनेकांनी माझ्यासारखी हुज्जत घातली असेल तर असेच मॉनिटर बनविले असेल का ?
शिक्षक जरी पाच मिनिटांसाठी बाहेर गेले तरी सगळा वर्ग गलका करायला लागतो . त्यावेळी माझे खरंच काम असते शांत बसा नाहीतर नावं लिहिणार आहे असे सांगितले तरी वर्ग शांत बसत नसायचा, असाच गोंधळ शिक्षक आल्यावर असला तर मलाच ओरडायचे, कधी कधी मॉनिटर आहे तर वर्ग शांत बसव नाहीतर तुलाच मार मिळणार .म्हणून नावं लिहायला लागलो तरीही गोंधळ करत असतात .लिहिलेली नावे सरांना वाचून दाखवली तर निम्म्याहून जास्त वर्ग उभा राहतो आणि माझ्याच नावाने खडे फोडायला सगळा वर्ग तयार असतो त्यामुळे सर हे सगळ्या मुलांना शिक्षा देण्याऐवजी मलाच मार देतात .
अशा वेळी एवढं चांगले काम करुनही मला अशी शिक्षा होत असेल तर हे पद मला नकोच असा नाराजीचा सूर मी सरांकडे केला पण काहीही उपयोग झाला नाही .मी टार्गेट मुलगा म्हणून मी शांत बसावे म्हणून मलाच ते पद ठेवून दिले .दुसऱ्या वेळेस नाव लिहिले तरीही निम्मा वर्ग उभा राहिलेला असतो मग निम्मा वर्ग माझ्यावरच ताशेरे ओढत होता ." सर! हाच आपल्या शेजारील मुलाशी बोलत होता त्याचं नाव लिहिले नाही, त्याच्या मित्रांची नावे लिहीत नाही ."असा आवाज सगळे काढत राहायचे. जरी मी कितीही प्रामाणिकपणे काम केले तरीही मला असंच बोलणं खावं लागत आहे.
मला वाटतं वर्गाचा मॉनिटर नसलेला बरा अनेक वेळा वर्गाचा मॉनिटर दहा -दहा वेळा बदलावा लागतो पण पुन्हा माझ्याकडेच हे पद आणि सगळ्या वर्गांची इच्छा आहे की मॉनिटरचे ऐकायचे. शिक्षकांनी सांगितलं मॉनिटर म्हणजे शिक्षक नसताना शिक्षकांच्या ऐवजी जबाबदारी पार पाडणारा, पण मुलांना वाटते मॉनिटर हा दुजाभाव करत आहे पण खरं तर मला दुजाभाव करायचा नसतो. माझ्या मित्राचे सुद्धा मी नाव टिपण करत असतो. शिक्षकाचा मार खावा लागत असल्यामुळे तो ही मित्र माझ्यासोबत बोलायचे टाळत असतो. कारण की मी त्याचे नाव लिहिले की त्याला मार बसला किंवा त्याला ओरडणे बसले म्हणजे त्याला थोडासा माझ्याबद्दल राग येतोच.
वर्गशिक्षकांनी मला मॉनिटर केले तर इतर शिक्षक वर्गात आल्यावर त्यांचे मॉनिटरविषयी चांगले मत नसते. मॉनिटरच असा आहे तर वर्गही बेशिस्त असणार . मला नेहमी बोलणं बसत असते ,परंतु मला ज्या विश्वासाने वर्गशिक्षकाने मॉनिटर केले त्याच जबाबदारीने काम पार पाडेल. माझ्याकडून वर्ग शांत बसावा आणि कोणत्याही कामाची दखल घेतली जावी यासाठी मी जबाबदारी स्वीकारावी यासाठी भाग पाडले जाते. मलाही हे काम खूप आवडते ,परंतु जबाबदारी पार पाडत असताना इतरांचं बोलणं खावंच लागते.
वर्गशिक्षक सोडून दुसऱ्या शिक्षकांचा रोष पत्करावाच लागतो. हे माझ्या चांगले लक्षात आले; पण मी वर्गात असताना कोणाचे भांडण होता कामा नये, कोणी कोणाला चेष्टेची मस्करी करून दुखावणार नाही याची काळजी घेत असतो ,कोणी हुज्जत घालणार नाही हे मी बारकाईने लक्ष देत असतो. मॉनिटर म्हणले की स्वतः मात्र शिस्तीमध्ये राहणे याची मला जाणीव झाली.
मी मॉनिटर आहे! शिक्षक नसताना मला जबाबदारी पार पाडावी लागते हे असताना सगळा वर्ग व्यवस्थित शांततेत बसवणं आणि अभ्यास आपापला करत राहणे हेच महत्त्वाचे असते.पण शेजारी विद्यार्थी गप्पा मारत असले तर मी त्यांची नावे टिपली तर आणि शिक्षकांचे बोलणे बसल्यानंतर "आम्ही अभ्यासाचेच विचारत होतो,तो सुद्धा अभ्यास न करता इकडे तिकडे फिरत असतो त्याचं स्वतःचं नाव नाही लिहीत ". असेच त्यांचे सूर येतात आणि मलाच खोटे ठरवत असतात . मी जे नाव लिहितो ते काय वेडा म्हणून नाही तर खरोखरच त्यांच्याही गप्पा चाललेल्या असतात.
शिक्षक वर्गाच्या बाहेर काही कामानिमित्त गेल्यानंतर असा कोण असतो की अभ्यासाविषयी चर्चा करत आहे सगळ्यांनाच माहीत असते , आम्ही अभ्यासाची चर्चा करत होतो असाच ठपका मारत असल्यामुळे माझा शिक्षकासमोर पोपट केला जातो. त्यामुळे मलाच खूपच नाराजगी येत असते. असं वाटतं की नको मला हे पद मला हे तुमच्यासारखेच बोलायचे आहे ,बसायचे आहे असे मला वाटत असते ,वर्गशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मला निवडून दिले . विद्यार्थ्यांचा विश्वास माझ्यावर चांगला होता.
मी चांगला वर्ग सांभाळतोय आणि तो सांभाळण्यासाठी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे . तो मी पार पाडत आहे एखादे कार्य पार पाडत असताना त्या कर्तव्याला जागे राहणे ,एकनिष्ठपणे प्रामाणिक राहणे हे आपले कर्तव्य आहे त्या पदाला न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे मग त्यासाठी अनेकांचा रोष पत्करावा लागला तरी चालेल हे मला वाटते आहे .पण जे काम मॉनिटर म्हणून हातात दिले आहे त्याचा चांगलाच उपयोग करणार आहे .
#आणखी माहिती वाचा