Google ads

Ads Area

मी झेंडा बोलतोय|mi jhenda bolatoy |झेंड्याचे मनोगत |झेंड्याचे आत्मकथन

 मी झेंडा बोलतोय | MI jhenda bolatoy | झेंड्याचे मनोगत | झेंड्याचे आत्मकथन


हो मी झेंडा बोलतोय मला माझ्याविषयी ऐकण्याची खूप उत्सुकता लागली असेल ,म्हणून मी आज तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहे .माझा इतिहास जाणून तुम्हाला माझ्या बद्दल खूप काही समजेल पण माझी व्यथा समजणार नाही म्हणून मी आज तुमच्याशी केवळ माझ्याविषयी सांगणार आहे .

   मला निर्माण करण्यासाठीआणि मला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ,काहींनी आपल्या मातृभूमीसाठी हसत हसत फासावर गेले .खरोखर मला त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे ,पण मला मन मोकळे करायला कोणीच भेटले नाहीत .

 मला अबाधित ठेवण्यासाठी अनेक थोर व्यक्तींचा सहभाग लाभला आहे .त्यांचे ऋण खरंच खूप आहे .आज मी दिमाखात सगळ्यांना दिसत आहे ती सगळी  किमया देशासाठी झटले,लढले ,हुतात्मे झाले ,आजही शहीद होतात त्यांचेच श्रेय आहे रे मित्रांनो ! 

आज तुमच्या हातात झेंडा पाहून मला खूप गलबलून येत असते .मला असं वाटतं कीतुमच्याजवळ यावे ,खूप गप्पा माराव्या,तुमच्या भविष्यासाठी बोलावे त्यासाठी भूतकाळातील आठवणी सांगाव्या म्हणून माझे मन भरुन येते .

 तुम्ही झेंडा उंचा रहे हमारा असे माझे गीत गात असताना माझे आनंदाश्रू त्यामधील फुलांच्या रुपात खाली टपकत असतात .आज तुम्ही एवढ्या सुरक्षित ठिकाणी बिनधास्त झेंडा गीत म्हणत असताना ,त्याठिकाणी कोणाचे बंधन नसते,कोणाची भीती नसते त्यामुळे मला तुमच्याविषयी बोलावे वाटत असते .

 तुमच्यात असणारा उत्साहाने तर माझे उर भरुन येत असतात .तुमचा आवाज ऐकण्याची लागलेली आस मला  चातक पक्षासारखी (सहा महिन्यांची ) वाट पहावी लागत असते .तुम्ही केलेले भाषण ,गायन ,सत्कार अशावेळी मी सुद्धा कौतुकाने टाळ्या वाजवत असतोच .

 मला उंच पाहून सगळ्यांचे हात मला सलाम करत असतात ;पण ,मी सुद्धा त्यावेळी तुम्हाला नमस्कार करत असतोच .

 सकाळपासून दुपारपर्यंत मला खूप चांगले वाटते कार्यक्रम असतात ,भाषणे असतात कवायती असतात सगळ्यांचा मूड ताजेतवानाने  फुललेला असतो .दुपारनंतर मी मात्र उदास असतो कोणाचे लक्ष माझ्याकडे नसते ,सगळे खावून वामकुक्षी घेत असतात ,त्यावेळी मी सगळ्या गावभर नजर फिरवत असतो सकाळी जो उत्साह होता तो आता सहा महिन्यांनीच दिसणार असतो त्यामुळे माझे उर दाटून येत असतात .

  जसजसे सूर्य मावळतीच्या दिशेने निघत असतो तसतसे मला एखाद्या नववधूचे पाय जड अंत:करणाने सासरवाडीला जाण्यासाठी असतात तसेच माझेही होत असते .मला चांगल्या कपाटात ठेवून पुन्हा पुढल्या झेंडावंदनासाठी बाहेर निघत असतो .

  माझ्यासमोर मोठमोठी मंडळी भाषण करत असताना खूप चांगले वाटत असते ,त्यांनी दिलेली आश्वासने ही पुन्हा पुन्हा मला तीच ऐकायला मिळत असतात ,चेहरे फक्त बदलत असतात पण बदलाविषयीचे शब्द कधीच हवेत विरुन गेलेले असतात .

 तुमच्यात असणाऱ्या उत्साहाने तर माझे उर भरुन येत असतात .तुमचा आवाज ऐकण्याची लागलेली आस मला  चातक पक्षासारखी (सहा महिन्यांची ) वाट पहावी लागत असते .तुम्ही केलेले भाषण ,गायन ,सत्कार अशावेळी मी सुद्धा कौतुकाने टाळ्या वाजवत असतोच .

मला उंच पाहून सगळ्यांचे हात मला सलाम करत असतात पण मी सुद्धा त्यावेळी तुम्हाला नमस्कार करत असतोच .

माझ्या समोर अनेक मंडळी भाषण करत असताना खूप चांगले वाटत असते ,त्यांनी दिलेली आश्वासने ही पुन्हा पुन्हा मला तीच ऐकायला मिळत असतात ,त्यामुळे मला हसू आवरत नाही. त्यावेळी मला चेहरे फक्त बदलेले दिसत असतात पण बदलाविषयीचे शब्द कधीच हवेत विरुन गेलेले असतात . वर्षानुवर्षे असेच शब्द ऐकून खूप कंटाळा येत असतो .त्यावेळी मात्र तुम्हाला भाषणे ऐकून तुम्हाला कंटाळा येत असतो हे पाहून मलाही वाटत असते तुम्हाला आणलेला खाऊ ( गोळ्या बिस्कीट)  देऊन टाकावा.

खाऊ वाटपाचा कार्यक्रम चालू असताना किती मजेने तुम्ही तो खाऊ घेण्यासाठी लगबग करत असता ,तुम्ही त्यासाठी घरून आणलेला प्लास्टिक कागद हळूचबाहेर  काढून त्यात त्यागोळ्याघेऊन एक -दोनतोंडात टाकूनघरातील मंडळींना नेण्यासाठी तुमची असलेली ओढ दिसत असते ,येथूनच तुमच्यात असलेले संस्कार दिसायला लागत असतात.

सकाळपासून दुपारपर्यंत मला खूप चांगले वाटते कार्यक्रम असतात ,भाषणे असतात कवायती असतात सगळ्यांचा मूड ताजेतवाने  फुललेला असतो .दुपारनंतर मी मात्र उदास असतो कोणाचे लक्ष माझ्याकडे नसते ,सगळे खावून वामकुक्षी घेत असतात ,त्यावेळी मी सगळ्या गावभर नजर फिरवत असतो सकाळी जो उत्साह होता तो आता सहा महिन्यांनीच दिसणार असतो त्यामुळे माझे उर दाटून येत असतात .

 जसजसा सूर्य मावळतीच्या दिशेने निघत असतो तसतसे मला एखाद्या नववधूचे पाय जड अंत:करणाने सासरवाडीला जाण्यासाठी निघत असतात तसेच माझेही होत असते .मला चांगल्या कपाटात ठेवून पुन्हा पुढल्या झेंडावंदनासाठी बाहेर काढले जाते .

 माझ्या बाल मित्रांनो मला खूप खूप बोलायचे होते ते आज मी तुमच्यासमोर मन मोकळे केले .बऱ्याच दिवसांनी मला असा बोलण्याचा योग आला. तुम्ही हसा,खेळा बागडा पण अभ्यास करा आणि आपल्या शाळेला विसरु नका .तुम्हाला ज्या शाळेतून संस्कार मिळाले आहेत ते कधीच विसरू नका .एवढं माझे बोलणं ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद !

#  आणखी वाचा '

हर घर तिरंगा

स्वातंत्र्य दिन निबंध 

स्वातंत्र्य दिनाचे भाषण

शिक्षक दिन माहिती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area