Google ads

Ads Area

मी आदर्श विद्यार्थी बोलतोय |mi aadarsh vidhyarthi boltoy|I am talking ideal students

 मी आदर्श विद्यार्थी बोलतोय |mi aadarsh vidhyarthi boltoy|I am talking ideal students
 

मी आदर्श विद्यार्थी बोलतोय ! मी एक गोंडस ,हुशार विद्यार्थी आहे मला शाळेत पाठविताना आईवडील नेहमी काळजी घेत असतात, वेळेवर जाणे ,शिस्त पाळणे ,दररोजचा अभ्यास करणे प्रत्येक विषयाचा अभ्यास करुनच शाळेत पाठवत होते .वर्गात टापटीप असायचो  कधीही दंगा मस्ती नसायची .शिक्षकांनी कोणतेही काम सांगितले तर ते एकदम खूश व्हायचे.  मला त्यांनी दिलेली शाब्बासकी ही अधिकच काम करण्यास हुरूप येत होता .


ज्यावेळी शाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून माझी निवड करण्यात आली मला खूप खूप आनंद झाला त्या आनंदात मला शाळेविषयी खूप आवड निर्माण झाली मला कोणतेही काम करण्यास अधिकाधिक उत्साह ,ओढ वाढत गेली त्यामुळे मला शिक्षक आणि विद्यार्थी यांचा मी लाडका झालो होतो .माझ्यात चांगल्या सवयी वाढीस लागत गेल्या ,माझ्यात नेतृत्वगुण आत्मसात झाला .


शाळेतील कोणताही उपक्रम असला तरी जबाबदारी म्हणून माझ्यावर सोपवून टाकायचे . मला सुद्धा ही जबाबदारी महत्त्वाची वाटत असायची आणि अगदी बिनधास्तपणे हे काम करत असायचो ,माझे मित्र माझ्यासोबत असले तरी काही ना काही उद्योग करत राहायचे त्यामुळे मी सुद्धा त्यांना ओरडत राहायचो.मलाही त्यांच्यासारखे मजा करु वाटत होती ,पण मला करायची हिम्मत होत नव्हती .माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी निभावणार असाच माझा पवित्रा असायचा .


मी आदर्श विद्यार्थी आहे मला थोडसं आहे मी आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला. सगळ्यांनी कौतुक केले, आई-वडिलांनी शाब्बासकी केली. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या. पण खरं सांगू मी आदर्श विद्यार्थी आहे पण आदर्श राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. एका चौकटीत मला बसवले जाते. या चौकटीतून मला बाहेर पडायचे आहे. मला वर्गामध्ये असताना त्याप्रमाणे मला बोलता येत नाही. चेष्टामस्करी करता येत नाही की कुणाशी मनसोक्तपणे गप्पा मारता येत नाही . कारण मी आदर्श विद्यार्थी आहे आणि आदर्श विद्यार्थी असल्यामुळे मला वर्गात शांतच बसायला लागते.


 सगळ्या गोष्टी अपडेट ठेवायला लागत असतात. एक दिवस जरी मी गैरहजर राहिलो तरी शिक्षकांचे बोलणे बसतेस. "बघा आदर्श विद्यार्थी" म्हणून हे ऐकण्यापेक्षा माझी उपस्थिती अनिवार्य असते. शालेय शिस्तीमध्ये तर माझ्याकडूनच जास्त अपेक्षा असतात. मी कोणाशी गप्पा मारायच्या नाहीत, मी कोणाशी फिरायचे नाही.


 मी खेळत असताना सुद्धा शिस्तीमध्ये जायचं, कधीतरी माझ्या मित्रासारखे उड्या मारल्या, कागदाचे गोळे करावे ते टाकावे कोणाला तर काहीतरी बोलावे, पण नाही ,मी आदर्श विद्यार्थी आहे आणि आदर्श विद्यार्थी असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे गैरवर्तन नक्कीच आहे. म्हणून मी एका चौकटीत गुंतलो आहे.. मला आदर्श विद्यार्थी गौरव दिल्यामुळे एका चौकटीत बसलो जातोय. मी त्यामुळे माझ्यातील सृजनशीलता, कौशल्य आहेत ती बाहेर काढण्यासाठी मी धडपडतोय पण वेळीच मी कासवासारखे बसून मला कंटाळा येतोय.


 मी आदर्श विद्यार्थी मी शाळेत जीवनात आहे; परंतु कॉलेज जीवनात तसाच राहिलच असे नाही. मी आता कॉलेज जीवनात आदर्श विद्यार्थी मी आदर्श विद्यार्थी म्हणून हा नावच घेणार नाही .


अभ्यासात जरी पुढे असलो तरी एखादा मार्क कमी झाला तरी आदर्श विद्यार्थी असा सूर ऐकायला मिळत असतोच .मी काही शिक्षकांचा आवडता असतो तर काही शिक्षकांचा असेलच असे नाही त्यामुळे माझा गौरव ,सन्मान होणे काहींना रुचत नाही म्हणून सारखे टोचून बोलत असतात . मॉनिटर वर्गाचा असून असं का होते ?म्हणून तर बदलायचा का? वर्ग सांभाळता येतो का ? वर्गाची शिस्त पाहता येते का? असेच मला बोलणे खावे लागते .


मी एक आदर्श विद्यार्थी म्हणून मला जो सन्मान मिळाला आहे, त्याची पुंजी मला आयुष्यभर मिळणार आहे. शिस्त म्हणजे काय हे ? हे मला समजले आहे ,मी नेहमी आदर्श राहणार ,अभ्यासात अव्वल असणार  फक्त मला एका चौकटीत बसवू नका मलाही खेळावं वाटते ,गप्पा माराव्या वाटतात , आदर्श विद्यार्थी म्हणलं की मला एका चौकटीत बसवले जाते . हे मला मान्य नाही म्हणून माझी इच्छा आहे तुम्ही आदर्श विद्यार्थी करा ; पण एका चौकटीत त्याला बांधून ठेवू नका. बांधून ठेवला की त्याचे सगळेच पंख हे आखडले जातात .जसं एखादं रोपटे हे आपल्या कुंडीत लावलं तर तेही फळ देत असते , पण जशी  वाढ नैसर्गिक असते ती वाढ होण्यास मर्यादा येतातच.

 #आणखी माहिती वाचा 

शिक्षक दिन माहिती

मी शाळा बोलतेय

मी वर्गाचा मॉनिटर बोलतोय

मी मुख्याध्यापक बोलतोय

मी नापास विद्यार्थी बोलतोय

मी निवृत्त शिक्षक बोलतोय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area