मी मुख्याध्यापक बोलतोय | Me headmaster bolatoy| mi mukhyadhyapak bolatoy| I am talking headmaster
विद्यार्थ्यांचे हित काय आहे हे मला माहीत आहे ;परंतु एखादा विद्यार्थी उशिरा येत असेल तर माझी जबाबदारी आहे की मुलगा उशिरा का येतो ? किती वाजता पोहोचतो ? पालकाशी संपर्क ह्या सगळ्या गोष्टी मुख्याध्यापक म्हणून मला सांभाळाव्या लागतात .माझे प्रशासन बघत असताना अभ्यास करुन घ्यायला थोडासा वेळ कमी पडतो ,पण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मुलांची त्या त्या वेळेस भरपूर देण्याचा प्रयत्न करतो .
माझ्या शिक्षक वर्गाने नेहमी आपण बरोबरीने आहोत एवढीच अपेक्षा असते . एखाद्याला म्हटलं वर्ग मोकळा सोडू नका ' वर्गावर जा ' म्हटलं तरी उत नाराजीचा सूर येतो . 'आम्हाला कळतंय की '! अशी भाषा ऐकावी लागते,मी शिक्षक म्हणून काम केले आणि त्यानंतरच मुख्याध्यापक झालो . शिक्षक होतो याचेही भान होते . काहींना मुख्याध्यापक पदाची लालसा असते, खुर्चीला चिकटून असतात, पण मला ह्या पदाला न्याय द्यायचा आहे.
मुख्याध्यापकालासुद्धा भावना असतात हे जाणून घ्या , मुख्याध्यापक हा सुद्धा विद्यार्थी, शिक्षक या पदापासून तो मुख्याध्यापकापर्यंत येत असतो याचेही जाणीव असणे गरजेचे हे मला माहीत आहे . मलाही माझं दुःख सांगावसं वाटतं की मुख्याध्यापक म्हणून मला जे काम पडतात त्या कामाचा थोडासा भाग केवळ तुम्हाला कळावा. मी प्रथम विद्यार्थी,शिक्षक होतो , शिक्षक झाल्यानंतर माझी निवड मुख्याध्यापक पदासाठी झाली ही आनंदाची गोष्ट आहे .
खरंतर शाळा चालवणे ही खूप मोठी जबाबदारी असते . हे मी अनुभवतोय शिक्षक असताना मला कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत नव्हती शाळा सुटली की बिनधास्त राहायचो. आपले विद्यार्थी, आपली शाळा, शाळेच्या बाहेर गेल्यानंतर बिनधास्त राहत होतो पण ज्यावेळेस मी मुख्याध्यापक झालो त्यावेळेस मात्र संपूर्ण बिल्डिंगमधील प्रत्येक घटक संपूर्ण परिवार एक विद्यार्थी ,शिक्षक, शाळा परिसर बंद झालीतरी गेट बंद केले असेल का? दरवाजे बंद केले? कोणी आजारी आहे का ?जाताना काय काम राहिले का या सगळ्या गोष्टी कोणाचा फोन येतो का ? या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात आणि म्हणून मुख्याध्यापक शाळेचा एक महत्त्वाचा प्रशासक असतो, तरीही वर्गावर जात नाही काहीच काम करत नाही असा अनेकदा शब्द ऐकायला मिळत असतो.
असू द्या! मी वर्गावर कमी वेळ जातो मी शाळेत कमी वेळ असतो ;परंतु बाहेरची मीटिंग असेल प्रशासन असेल ऑफिसचे काम असते यासाठी मला सतत बाहेर जात असतो परंतु मी माझे कर्तव्य विसरणार नाही, मी वेळेत येणार वेळेत जाणार हे माझं कर्तव्य आहे. मुलांची शिस्त, मुलांचे गैरवर्तणूक, उपस्थिती याकडे मात्र मी कटाक्षाने लक्ष देत आहे .
शिक्षकांमध्ये भेद होता कामा नये याकडे सुद्धा मी लक्ष देत आहे जास्तीचे काम केले म्हणून त्याला एक दिवस सुट्टीची सवलत दिली तर अनेकांच्या नजरा माझ्याकडे असतात .एखादा शिक्षक कामासाठी जवळ घेतला म्हणून दुसऱ्या शिक्षकांचे लगेच डोळे विस्फारले जातात किंवा एखाद्याला रजा नाही दिली तरी तो नाराज होणार .
परीक्षेच्या काळात जर शिक्षकांनी रजा घ्यायची नाही असं सांगावं लागतं. मला हे कळतं भावना आहेत ,काहीतरी कारण असेल म्हणून तर सुट्टी मागत आहे पण परीक्षा असताना अनेक जबाबदारी येतात.परीक्षेत वर्ग सोडून जमत नाही वर्गात सगळ्या गोष्टी पेपर आणण्यापासून धागा देण्यापासून सगळ्या गोष्टी जबाबदारीने पार पाडाव्या लागतात . तीन तासाचा पेपर असेल तर जास्त शिक्षक लागतातच त्यांना बाहेर सोडण्यासाठी शिक्षक मोकळा असावाच लागतो; नाहीतर तीन तासांमध्ये शिक्षकाला एकाच वर्गात बसून जमत नाही. यासाठी सुट्टी घ्यायची नाही असे जरी मी बोलत असलो तरी, अडचण आली तरी तडजोड करणे भाग असतेच.
मला शाळेच्या बाहेर अनेकदा बाहेर पडावं लागते, म्हणून एखाद्या शिक्षकाला बाहेर पाठवावे असे माझ्या मनात येणं चुकीचे काहीच नाही, पण "मीच का जाऊ ? प्रत्येक वेळेस मी जातोय त्या शिक्षकाला पाठवत नाही, तो ऐकत नाही म्हणून त्याला सांगायचं नाही, आम्ही ऐकतो म्हणून आम्हाला सांगायचं ." असंच ऐकायला मिळते हे एक टाळण्यासाठी मलाच बाहेर पडावे लागते.
घरी जायला शिक्षकांपेक्षा दोन-तीन तास उशीर होत असतो पण दुसऱ्या दिवशी एकही शिक्षक मला म्हणत नाही की किती वेळ लागला? झालं का काम ?एवढेच बोललं तरी मनाला समाधान वाटले असते पण कोणीही त्याविषयी बोलत सुद्धा नाही की काम झाले का नाही हे सुद्धा विचारत नाही. मला विचारावं अशी अपेक्षा काहीच नसते . पण दोन शब्द हसून गोड बोलावे.
मी मुख्याध्यापक आहे म्हणजेच मी कोणीतरी वेगळाच माणूस आहे असाच समज विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक यांच्यामध्येच झालेला असतो. खरं तर मी पण शिक्षक होतो मी पण विद्यार्थी होतो मी पण पालक आहे हे मी कधी विसरत नाही. पण मुख्याध्यापक म्हटलं की त्याला स्वतंत्र खाली प्रशासन चालवण्यासाठी वेगळा कायदा, शिक्षकांना बोलावणे, मिटींग लावणे, विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी सांगणे, अभ्यासाविषयी सांगणे म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे असाच सगळीकडे समज होत असतो .
जे वर्गात शिक्षक शिस्त, अभ्यास ,उपस्थिती या विषयावर बोलतात तेच मी बोलायला लागलो तर विद्यार्थी आपल्याकडे मोठे शिक्षक आले, शिक्षकांना वाटतं मुख्याध्यापकांनी बोलावे, म्हणजे मुख्याध्यापक बोलत असताना काहीतरी विशेष काहीतरी सांगणार आहे हे मात्र खरे झाले असले तरी वेगळ्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघून मला त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलता येत नाही .
अधिकाऱ्यांची शाळा भेट असते त्यावेळेस मात्र मुख्याध्यापक हाच घटक महत्त्वाचा असतो सगळ्या गोष्टीची इत्यंभूत माहिती माझ्याकडे नोंदवलेली असते .मुलांचा पट ,मुलांची उपस्थिती, मुलांच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या वर्गांच्या माहिती माझ्याकडे नोंदवलेली असते. यामुळे शाळा भेट कधीही झाली तरी शिक्षक वर्गात असले किंवा गैरहजर असले तरी त्या वर्गाची माहिती असतेच. मलाच सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लागत असते.
शिक्षकांनी माझ्या भावना ह्या कधीतरी समजून घेऊन म्हणून मोकळेपणाने गप्पा माराव्या ,बिनधास्तपणे बोलावे असे मला वाटते पण मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली असते हे तरी मला नको असते. शिक्षक -शिक्षक यांचे जसे नाते जुळते तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे नाते जुळत नाही शिक्षक -विद्यार्थी यांचे नाते जुळते तसे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांचे नाते जुळत नाही, पालक आणि शिक्षक यांचे नाते जसे जुळते तसे मुख्याध्यापक आणि पालक यांचे नाते जुळत नाही . एखादा पालक एखाद्या शिक्षकांशी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांविषयी चर्चा करून जात असतो ,पण ती चर्चा मुख्याध्यापक या नात्याने पालक माझ्यापर्यंत येऊच शकत नाहीत.
माझी इच्छा असते की पालकांनी त्यांच्या पाल्याविषयी मला विचारावे पण काय माहित पालकांना सुद्धा विचारायचे धाडस होत नाही . विद्यार्थ्यांना सुद्धा काही विचारायचे असेल तर अगोदर शिक्षकांना सगळ्या गोष्टी सांगतात. शिक्षक सुद्धा काही गोष्टी न बोलता अर्ज, विनंती या गोष्टीवरच संभाषण असते त्या पलीकडे कोणत्याच प्रकारचे संभाषण नसते .मात्र शिक्षक खोलीत गप्पा खूप चालतात . मात्र मलाही वाटतं त्यांच्यामध्ये जाऊन मिसळावे पण मी गेलो की लगेच चिडीचूप हे का? मी पण माणूस आहे मला तुमच्यासोबत घ्यावे अशी माझी इच्छा असते मला कोणीतरी वेगळं समजावे असं मला कधीच वाटत नाही. मी ही तुमच्यामध्ये मिसळून राहायला येतो; परंतु तुम्ही कोणीतरी विशेष म्हणून माझ्याकडे बघत असतात त्यामुळे संकोचल्यासारखे होते आणि मला शिक्षक खोलीमध्ये बसून गप्पा माराव्या अशी खूप इच्छा असते पणती सुद्धा पूर्ण होत नाही .
शाळेची घंटा वाजते तोच विद्यार्थी धूम ठोकतात ते पुन्हा शाळेचा विचार करत नाहीत आणि विद्यार्थी गेल्यानंतर त्या पाठोपाठ शिक्षकही निघायच्या घाईत असतात ,परंतु मला अशी घाई करून जमत नाही .मला सगळी शाळेची जबाबदारी पूर्ण करायला लागते. सगळे दरवाजे ,वीज, पाणी हे सगळं व्यवस्थित बंद केले का नाही याची पूर्ण खात्री केल्याशिवाय माझे पाऊल गेटच्या बाहेर निघत नाही .तरीही पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावे लागते काय विसरले का? आपले काय राहिले का ?कोणत्या विद्यार्थ्याचा पास राहिलाय का? कोणाचा दाखला राहिलाय का? हे सगळ्या गोष्टीचा विचार करत करतच प्रवास करत घरी येतो घरी आल्यानंतर हे चार शब्द गोड बोलावे अशी माफक इच्छा असते. पण त्या ठिकाणी सुद्धा जसे वातावरण असते तसेच वातावरण घरी सुद्धा बघायला मिळते.
मला वाटते मी का झालो असेल मुख्याध्यापक मला पण शिक्षक म्हणून राहायचे आहे, मला सुद्धा सगळ्यांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारायच्या आहेत असं वाटतं .पुन्हा विचार येतो आपल्यावर जबाबदारी घेतल्याचा म्हणून पूर्ण करणारच. नका मारू द्या गप्पा माझ्याशी, नका बोलू द्या मनमोकळेपणाने आपण पण एक प्रशासक म्हणून विद्यार्थी हाच देव म्हणून मी शिक्षण व्यवस्थेला चांगल्या पद्धतीने सांभाळणार ही माझी खात्री आहे.
माझी खात्री आहे शाळेतील एखादे काम एखाद्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सांगितले तर ते वेगळ्याच भूमिकेतून माझ्याकडे बघत असतात, म्हणून शिक्षकांसोबत त्यांचे चांगले नाते जुळते ,परंतु मुख्याध्यापक याच्याकडे दुर्लक्ष होते, कारण शाळा सांभाळायची म्हटलं की कामे तर सांगावीच लागतात. मग हे काम विद्यार्थी, शिक्षक ,पहारेकरी, शिपाई, माळी असो यांना तर काहींना काही जबाबदारी द्यावीच लागते . जबाबदारी देत असताना त्यांना एखादा बोजाच वाटत असतो. त्यामुळे हा बोजवारा म्हणजेच शिक्षक मुख्याध्यापक आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये दरी निर्माण होते ही दरी कायमची बंद करायची आहे, म्हणून मी मुख्याध्यापक आहे माझ्या भावना समजून मलाही तुमच्यामध्ये सामील करून घ्या. मलाही तुमच्यासारखे बोलावसे वाटते, तुमच्यासोबत गप्पा माराव्या लागतात .कामाच्या वेळी काम असतेच पण इतर वेळी संभाषण होणं खूप महत्त्वाचं असते .
असे संभाषण असेल तर सगळ्या कामाबरोबरच हसत खेळत दिवस घालवावा अशी माझी इच्छा असते ,परतु ह्या सगळ्या इच्छा ह्या इच्छाच राहतात .मुख्याध्यापकाशी हे सगळे कधी जुळवून घेतील याची मी वाट पहात आहे .मुख्याध्यापक त्या खुर्चीवर बसल्यावर असावा पण इतरवेळी मित्रत्वाचे नाते असावे .अशी मनोमन इच्छा असते ,पण जसे खुर्चीवर बसल्यावर अनुभव येतो तसाच अनुभव बाहेरही येतच असतो .
मी सुद्धा शिक्षक असताना मी सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून वागत होतो ,हसत खेळत दिवस जात होते मी मुख्याध्यापक झाल्यापासून माझे जवळचे मित्रही शिक्षक सुद्धा मला नीट बोलत नाहीत की कोणतीही गोष्ट पहिल्यासारखी बोलत नाहीत त्यामुळे मनाने नाराज होत असतो .शाळेत असूनही मला एकटेपणा वाटत असतो .कधी कधी वाटते हे मुख्याध्यापक पदच नको आहे .मला जसा अनुभव येत आहे तसाच इतर शाळेतील मुख्याध्यापक यांनाही येत असावा का ?असाच प्रश्न मला सतत सतावत असतो .सगळीकडे असाच नारा येत असेल तर हे पदच नको आहे . पण प्रशासन म्हणून काम करायचे तर त्यासाठी कोणीतरी नेतृत्व करणारा असावा लागतो याच हेतूने माझी निवड झाली आहे म्हणून मी हे काम जबाबदारीने करत आहे .मी मुख्याध्यापक पदाला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे .
#आणखी माहिती वाचा