Google ads

Ads Area

माझा भारत देश निबंध | majha bharat desh nibandh | my country india essay

 माझा भारत देश निबंध | majha bharat desh nibandh | my country india essay

माझा भारत देश महान आहे .माझ्या भारतात सगळे लोक बंधू भावाने वागत असतात .त्यामुळे विविधतेत एकता हे भारत देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे .

माझ्या भारत देशाची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे ,जरी अनेक प्रांत असले तरीही एकोपा हाच गुण आहे .वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म असले तरीही भारतीय संस्कृती जपून ठेवली आहे .

आपल्या भारतात पाश्चात्यकरण झाले असे वाटत असले तरी संस्कृती,संस्कार या ठिकाणची असलेली ,मानवता हे सगळे एकदम झक्कास आहे .या देशात वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोकसुद्धा गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

 माझ्या भारत देशाचा इतिहास खूप मोठा आहे .देशासाठी बलिदान देणारे अनेक महान देशभक्त होऊन गेले . जसजसा काळ बदलत गेला तसतसे लोकांनाही आपल्या भारताविषयी अधिकाधिक प्रेम ,निष्ठा वाढत गेली .

 खेळाच्या माध्यमातून आपल्या देशातील इतर देशातील लोकांशी संपर्क होऊ लागला ,त्यांची संस्कृती याचाही आदर करू लागला .यामुळे भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे हे जागतिक दृष्ट्या महत्त्व भारत देशाला मिळाले आहे .

अजून एक वैशिष्ट्य असे आहे की माझ्या भारत देशातील अनेक धर्म जातीतील महान पुरुषांच्या सहवासातून आणि शिकवणीतून आजही आपले लोक कधीही कोणाला तुच्छ समजत नाहीत,कोणावरही अन्याय करणार नाहीत ,सगळ्या संस्कृतीचा आदर करत असतात .यामुळे सगळ्यांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत .

नवनवीन लागत जाणारे शोध ,आपली होत जाणारी प्रगती यामुळे अनेक लोक परदेशी सुद्धा कामानिमित्त जाताना दिसतात ,तर काही परदेशी लोक भारतात शिक्षण घेण्यासाठी येत असतात . यामुळे विचारांची देवाणघेवाण चांगली होत असते .

भारत देश हा विकसनशील देश म्हटले आहे ,पण कोणत्याच क्षेत्रात माझा भारत कमी नाही . जागतिक पातळीवर विकसनशील असेलही पण मात्र प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी भारताने केली आहे आणि करत आहे .

भारतीय तत्त्वज्ञान ,संस्कृती ,कला,साहित्य ,स्थापत्य, शेती,प्रशासन,खेळ असे अनेक प्रकारचे महत्त्वाचे ऐतिहासिक वारसास्थळ यामुळे माझा भारत देश जगाच्या पातळीवर महत्त्वाचा देश मानला जातो .

असा हा भारत देश अनेक दृष्टीने महान आहे .ज्यांनी ज्यांनी या भारत देशाला घडविले अशा म्हणून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला असे महान व्यक्तीस कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करतो की ज्यांच्यामुळे आज भारत देश सुरक्षित आणि भक्कमपणे ताट उभा आहे .जय हिंद !  ; 


#आणखी वाचा 

स्वातंत्र्य दिनाचे भाषण

शिक्षक दिन माहिती

मी शाळा बोलतेय



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area