स्वातंत्र्य दिन भाषण मराठी|Independence speech in marathi
अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या साऱ्या देश बांधवांनो माझा सादर प्रणाम आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो .
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपला भारत गुलामगिरीतून मुक्त झाला ;म्हणून आजही आपण लोकशाही पद्धतीने सर्व राज्यकारभार पाहत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान थोर व्यक्तींनी आपले प्राणाचे बलिदान दिले आहे. बलिदान देत असताना त्यांनी आपल्या देशाचा फक्त विचार केला .
आपल्या घरादाराचा विचार न करता त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आणि त्यांचे हे बलिदान आज सार्थक ठरले आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असताना मला खूप बोलावेसे वाटते की आजही आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरीही अजूनही खऱ्या अर्थाने भारत देशातील प्रत्येक नागरिक हा जातीपातीच्या भेदभावामध्ये दिसत आहे .काही ठिकाणी अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .
स्वतंत्र भारतात कोणी कोणावर कोणत्याही प्रकारची पिळवणूक करणार नाही याची आपण काळजी घेणे हेच भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे यासाठीआपण भारतीय संस्कृती,संस्कार जपले पाहिजेत.आजही कितीही माणूस सुस्थितीत असला तरी एकमेकांविषयी कुरघडया करणं हे चांगले लक्षण नाही ,हेच महत्त्वाचे संस्कार जपणे आहे .
आपण भारतीय आहोत याचा मला खूप अभिमान वाटत आहे आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र आलो आहोत असेच आपला एकोपा हा जरी सहा महिन्यातून येत असला तरीही आपण मात्र एक जीवाने राहिले पाहिजे.
आपला भारत देश एवढा महान आहे की या भारत देशात अनेक धर्म, प्रदेश, भाषा ,संस्कृती जरी अनेक असल्या तरी भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजेच विविधतेत एकता हे असून भारत देश हा संपूर्ण जगासमोर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि संस्काराच्या बाबतीत अग्रेसर आहे. जरी आपला भारत देश विकसनशील असला तरीही विकसित होण्यासाठी काही पावलेच दूर आहे. आपला भारत देश महासत्ताक बनण्यासाठी प्रयत्नशील आहे .सगळे भारतीय नागरिक जरी कोणतेही काम करत असला तरीही देशाला पुढे नेण्यासाठी सरसावलेला दिसून येत आहे .
आपण सगळे भारतीय आहोत आणि मानवता ही आपली खरी ओळख आहे हे आपल्या थोर पुरुषांनी साधुसंतांनी आपणास दिलेली संस्काराची देणगी आपण जपत राहूया! आणि आपला आज झेंडा जसा फडकत आहे असाच हा विकासाच्या मार्गाने फडकताना दिसला पाहिजे .अशा या भारत देशाला माझा मानाचा मुजरा !
माझे हे शब्द स्वातंत्र्य दिनानिमित्त मला तुमच्यासमोर जमेल तसे छोट्या शब्दात विचार मांडता आले ,मला संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र!
# आणखी वाचा ;
स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सव सूत्रसंचालन