Google ads

Ads Area

मी नापास विद्यार्थी बोलतोय | I am talking failed students | mi napas vidhyarthi boltoy

 मी नापास विद्यार्थी बोलतोय |I am  talking failed students | mi napas vidhyarthi boltoy

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आज आपण नापास विद्यार्थीं याचे मनोगत पाहणार आहोत या नापास झालेल्या विद्यार्थ्याने सांगितलेली  परवड खरोखरच तुम्हांस काहीतरी शिकायला मिळणार आहे .जरी तो नापास झाला असला तरी त्यातून त्याने कोणता बोध घेतला तसाच आपणही घेतला पाहिजे .हे आपण निबंधातून बघणार आहोत .


 " मला माझ्या वडिलांनी आदर्श विद्यालयात  शिकायला पाठवले .वर्गात नवीनच होतो ,शिवाय हुशारही त्यामुळे सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या . पण काही काळ असा असतो की तो आपल्याला सुधारता येऊ शकत नाही पण मी दहावीच्या परीक्षेत नापास झालो आपलं थोडं जरी अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तरी आपलं प्रचंड नुकसान होतं .




🏷️मी हुशार विद्यार्थी वर्गात चमकला की, ह्या चमकल्याबरोबर मी अत्यंत हवेत होतो, हुशार समजत होतो. अभ्यास करायचो पहिला क्रमांक  यावा म्हणून धडपड करायचो , त्यातच माझी मैत्री खूप वाढली . मित्रही खूप चांगले मिळाले .एकमेकांवर जीव  लावत होते कोणत्याही अडचणीत मदत करत होतो . सगळे मित्र हे मध्यमवर्ग कुटुंबातील होते त्यामुळे सगळ्या पालकांना आम्ही अभ्यास करावा म्हणून सांगणं असायचे .


 अभ्यास करता करता आम्हाला आजूबाजूला असलेल्या परिसरात फिरायची आवड निर्माण झाली आमचा अभ्यासापेक्षा फिरण्यातच  वेळ जास्त जात होता .


अभ्यासाला मित्राची खोली मोकळी आहे त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा म्हणून दोन -चार पालकांनी संमती दिली .हळूहळू  आमचा सगळा ग्रुपच त्याठिकाणी अभ्यासाला येऊन गप्पाच चालत राहिल्या .कोणी वर्गांतील मुलींच्या आठवणी सांगत होते तर कोणी शिक्षकांच्या नकला करत होते .कधीकधी रोमँटिक गप्पा, तर कधी आजोबांच्या काळातील  भुताखेताच्या गोष्टी काढत होते .संपूर्ण वेळ गप्पा मारण्यासाठी जात होता .


 🏷️अभ्यास करायला मुलं जातात म्हणून घरातील अधिकच काळजी घेत होते .चांगले खायला ,दररोज गोड पदार्थ ,यामुळे आमचे खाणे, गप्पा, मस्ती करणे हेच नित्याचेच होऊन बसले होते . सतत आई- वडिलांच्या धाकात राहिलेलो आम्ही अभ्यासाच्या नावाने मात्र इकडे धांगडधिंगा चालू ठेवला .


 एखाद्याला अभ्यासाची कल्पना सुचली तर त्याला वेड्यात काढत होतो ,अजून परीक्षा लांब आहे ,तुला आमच्यात यायचे असेल तर ये नाहीतर घरी बसून कर अभ्यास  कोणीतरी अभ्यास होत नाही म्हणून घरी अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी त्याची स्वारी आलीच आमच्याकडे त्यामुळे इतर मुले काय करत असतील खूप खूप गप्पा मस्ती यात दंग असतील यामुळे त्याचेही घरी मन लागत नसायचे .


एक गोष्ट मात्र खरी होती की आम्ही अभ्यासापासून दूर भरकटलो  होतो तरीही आधीच्या अभ्यासाच्या जोरावर जेमतेम पास होत होतो त्यामुळे आम्हाला बोलणं खावे लागत होते .


 आम्हीही ठरवले होते की परीक्षा जवळ आली की खूप अभ्यास करायचा आणि चांगल्या मार्काने पास व्हायचे असे ठरवले होते पण हे सगळे मातीमोल होऊन जात होते . हे सगळे आश्वासन देत होते एवढी मार्क पाडणारच पण कृती मात्र काहीच होत नव्हती .


परीक्षा झाली सगळेजण आनंदात होते ,पण मला इंग्रजी चा पेपर अवघड गेला होता त्यामुळे काळजी वाटत होती .माझे पहिल्यापासून इंग्रजी कच्चे होते tution लावावी म्हणून घरातील बोलत होते पण माझा आत्मविश्वास की माझ्या मित्रांना चांगले इंग्रजी चांगले येते ते शिकवणार आहेत म्हणून घरात सुद्धा मी वेगळे वातावरण केले होते .


 🏷️निकाल लागला आणि माझा इंग्रजी विषय दोन मार्कासाठी गेला .सगळे मित्र पास झाले ,त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता . कोणी येऊन सांत्वन देत होते ,"अरे यार दोन मार्क अजून असती ना 100 % पास झालाच असता" . काहींचे सूर असे होते की जास्त लिखाण कर म्हणत होतो ,तर काही म्हणत होते व्याकरण सरांनी दिलेले केले असते तरी चांगला पास झाला असता .असे बोलून बोलून मला चक्रावून सोडले .शेवटी एवढेही म्हणून गेले की आम्ही ज्या कॉलेजला आहे त्याच कॉलेजला 11 वी ला admission घे .आम्ही12 वीत असलो तरी आपली भेट होईल .मग जाता येता आपण सगळे एकत्रच असणार .


मी निकाल घेऊन कोणत्या तोंडाने घरी जाऊन सांगू की दोन मार्कासाठी विषय गेला म्हणून ,माझ्या शिक्षकांना सुद्धा माझ्यावर टाकलेल्या अपेक्षा ह्या हवेतच विरल्या गेल्या होत्या .माझे आई वडिलांना तर काय सांगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे .


सगळ्या मित्रांचा आनंदात पेढे वाटून जल्लोष चालू होता कोणी मामालापेढे दयायला जायचे आहे तर कोणी मंदिरात जाऊन येतो असे म्हणत होते काहीजणांना तर असे वाटत होते की पेढे घेऊन आमच्यासोबत फिरावे कारण माझ्याशिवाय त्यांना फ़िरायला चांगले वाटत नव्हते .एकाने तर मला देवाला सोबत यायला काय अडचण आहे म्हणून ओढून घेऊन गेला . तो नमस्कार करुन पेढा ठेवून मलाही देऊ लागला पण मी सुद्धा नाराज केले नाही ,अश्रू आवरत आवरत मी ही त्याचे दोन पेढे खावून टाकले .


मित्रांचा निरोप घेऊन घरी जायच्या अगोदरच माझी बातमी कळाली होती .घरातील नाराजीचा सूर उमटवत आता काय आरती करायची का ? असे बोलणे  ऐकायला आले .घरात एका खोलीत जाऊन ढसाढसा रडायला लागलो ,का आपल्याला दोन मार्क कमी पडली ? सगळी प्रश्नपत्रिका समोर उभी राहू लागली ,त्याठिकाणी हे लिहिले असते ,ते लिहिले असते तर आज मी सुद्धा पेढे वाटले असते .  काहीच जेवण न करता मी तसाच झोपी गेलो .


मनात एकच विचार होता कसे व्हायचे ,किती अभ्यास करावा ,किती सराव करावा यासाठी डोक्यात विचाराचे थैमान चालू होते .अभ्यास करण्यासाठी एका झाडाखाली बसून करत आहे .  सगळ्या लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या त्या सगळ्या मी नंतरच्या काळात पूर्ण करीन सध्या तरी माझ्या डोक्यात 10 वी पास होणं यापेक्षा दुसरे काहीच नाही ."


🏷️#आणखी वाचा

निवृत्त शिक्षकाचे मनोगत

मी आदर्श विद्यार्थी बोलतोय

मी वर्गाचा मॉनिटर बोलतोय 

शिक्षक दिन माहिती

मी शाळा बोलतेय

मी मुख्याध्यापक बोलतोय







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area