Google ads

Ads Area

गणेशोत्सव मराठी माहिती| Ganeshotsav marathi mahiti गणपती सण माहिती

 गणेशोत्सव मराठी माहिती| Ganeshotsav marathi mahiti
गणपती सण माहिती



गणेशोत्सव हा सर्व भारतीय लोकांचा महत्त्वाचा सण आहे .या सणाला अनेकांना वेगळाच आनंद असतो .लोकमान्य टिळकांच्या विचारातून साकारलेल्या गणेशोत्सवाला सगळ्या जणांचा सहभाग असलेला दिसून येत असतो . गणेशोत्सवानिमित्त  सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात . म्हणून गावाकडे राहणारी लोक शहराकडे गणपती बघायला येतात तर शहराकडून लोक हे गावाकडे जातात हे सगळे उत्साहात चालूच असते .

मुंबई- पुणे शहरातून कोकणात जाणारी भरपूर लोक जातात त्यावेळी त्यांना वर्षभर वाट पहावी लागत असल्याने ,गणपतीचा सण हा दिवाळीच्या सणासारखा वाटत असतो .त्यामुळे गणपती सणाला एसटी बस ज्यादा सोडाव्या लागतात,कोकणातील अधिक लोक हे मुंबईत वास्तव्यास आहेत .नोकरीच्या निमित्ताने आपल्या गावातून शहराकडे आलेल्या लोकांना गावाकडे गणपती उत्सवाला जाण्याची प्रचंड ओढ असलेली दिसते .

गणपती सण माहिती

गणपती सण माहिती



गणेशोत्सव माहिती ( toc)



सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची | 
 नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची|
 सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
 कंठी झळके माळ ,मुक्ताफळांची ||१||
           जय देव,जय देव जय मंगलमूर्ती | 
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||ध्रु ०||

 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
 चंदनाची उटी कुमकुमकेशरा ||
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा | 
रुणझुणती नूपरे चरणी घागरिया | 
जय देव जय देव जय मंगलमूर्ती||२||
 लंबोदर पीतांबर फणिवरबंधना |

 

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
 दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावें निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना  ||
 जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती | | 
दर्शनमात्रे मन कामना पुरती ||३||

 

अर्थ:

हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता गणपती, आपल्या सर्व विघ्नांना दूर करा.आपल्या प्रेमळ कृपेने आम्हाला सर्व सुख प्रदान करा.

तुमचे सर्व अंग सुंदर आहे.आपल्या शेंदुराने रंगलेली मानेवर मुक्ताफळांची माळ शोभते.

तुमच्या गौरीकुमरा, गणेश, तुमच्या चंदनाच्या उटी आणि कुंकुमकेशरामुळे तुम्ही अत्यंत सुंदर दिसता.

तुमचा हिरेजडीत मुकुट खूप सुंदर आहे. तुमच्या चरणवरील नूपुरे रुणझुणत आहेत.

हे मंगलमूर्ती, आम्हाला आपल्या कृपेने प्रसन्न करा. आम्हाला सर्व विघ्नांतून वाचवा.

आम्हा भक्तांना सर्व सुख प्रदान करा.आमच्या आरतीमुळे आमचे मन तृप्त करा.

अशा  शब्दात गणपतीचे आगमन मोठया थाटामाटात केले जाते .गणपती सणाला सर्व तयारी अगोदरच केली जाते . घरगुती गणपती असो की मंडळाचा तेवढाच उत्साह असतो .काहींच्या घरी गणेशाचे आगमन म्हणजे  एखादे लग्नकार्य असते तसाच उत्साह असलेला दिसून येतो . घराची साफसफाई करुन सगळे आंगण कपडे भांडी स्वच्छ केली जातात .

गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सुरुवात असते ती नव्या नव्या गोडधोड पदार्थांच. घरात दिवाळीचा सण जसा असतो तसाच आरास घरात केला जातो .

 मंडळाचा गणपती असेल तर अध्यक्ष आणि सोबतीचे कार्यकर्ते हे अधिकाधिक गणपतीची सजावट करण्याचा प्रयत्न करत असतात .गणपतीचा एकमेव सगळ्यात मोठा सण आहे की सार्वजनिक उत्साह असल्याने लहानापासून ते वृद्धांपर्यंत ह्या सणाचे कौतुक होत असते . 

दीड दिवसाचा गणपती

काहींच्या घरी हा दीड दिवसाचा  गणपती असतो काहींना कामाच्या धांदलीत वेळेअभावी दीड दिवसाचा गणपती बसवावा लागत असतो .तरीही त्यांची श्रद्धा असते म्हणून दीड का  दिवस होईना बाप्पाचे आगमन घरात आणतातच अशा या बाप्पाच्या उत्साहाची सुद्धा भरपूर तयारी केली जाते .गणपतीला हरळी ( दुर्वा ) आणि मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो .

तीन दिवसांचा गणपती

काहींना गणपतीसाठी थोडा अवदी मिळालेला असतो अशा वेळी काहींच्या घरात तीन दिवसांचा गणपती बसविण्यात येत असतो . गणपती आणि गौरी बसवत नसतील असे लोक तीन दिवसात गणपती मूर्तीचे विसर्जन करतात ,तरीही या तीन दिवसात आपापल्या पाहुण्यांना गणपतीला बोलवत असतात .एकमेकांना बोलविण्याची ही पद्धत खूप चांगली असते .

पाच दिवसांचा गणपती

ज्या घरामध्ये गणपती बसविला असताना पाच - सहा दिवस कामातून वेळ काढावा लागतो तसेच गौरीचे  आगमन घरात असते त्यावेळेस पाच दिवसाचा गणपती बसविला जातो . 

सात दिवसांचा गणपती

हा गणपती सार्वजनिक आणि घरातील गणपती सोबतच विसर्जन केला जातो ,पण या सात दिवसात खूप सारे कार्यक्रम होत असतात ,काही मंडळाचे हे गणपती सात दिवसच ठेवतात ,घरातील गणपती सुद्धा या सात दिवसात अनेक चांगले पदार्थ बनवून आलेल्या पाहुण्यांना खायला देत असतात .घरात उत्साहाचे वातावरण असते तसेच सार्वजनिक गणपतीची सुद्धा आरास खूप चांगल्या पद्धतीने करता असतात .

आकरा दिवसाचा गणपती

हा गणपती कधी कधी दहा दिवसच असतो तरीही आकरा दिवसच म्हणतात.  काहींच्या घरात सुद्धा आकरा दिवसाचा गणपती असतो तर सार्वजनिक गणपती सुद्धा आकरा दिवसांत उठला जातो ( लोकांच्या बोलण्यात येत असतो ) .

या दिवसात अनेक कार्यक्रम केले जातात आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद सर्व गावकरी आणि भक्त मंडळींना दिला जातो .

बाप्पाचे आगमन जसे थाटामाटात केले जाते तसाच उत्साह विसर्जन करतेवेळी असतो पण बाप्पा जातोय त्यामुळे उदासीन चेहऱ्याने निरोप दिला जातो . काहींच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते ,सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गणपतीमुळे सगळे लोक एकत्र येतात  आणि या एकत्र येण्याने सगळेजण जोमाने काम करत असतात .

लोकमान्य टिळकांच्या विचाराने सुरु झालेला गणेशउत्साह हा खऱ्या अर्थाने सफल झाल्याचे दिसत आहे .असा हा गणपती उत्साह सगळीकडे खूप जोरात साजरा केला जातो . 

            👏गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा👏


FAQ 

• गणपतीचे वडील कोण ?

>>भगवान शंकर

• गणपतीला कोणता पदार्थ आवडतो ? नैवेद्य कोणता ठेवतात ?

>>मोदक

• गणपतीचे वाहन कोणते आहे ? 

>> उंदीर

• गणपतीला काय वाहतात ?

 >> दूर्वा ( हरळी ) आणि जास्वंदीचे फुल

• गणपतीच्या भावाचे नाव काय ? 

>>कार्तिकेय

• गणपतीला कोणत्या प्राण्याचे तोंड लावले आहे ?

>>हत्ती

• अष्टविनायक गणपतीपैकी प्रथम मानाचा कोणता गणपती आहे ? 

>>मयुरेश्वर  ( मोरगाव )


#आणखी वाचा

गणपतीची आरती 

गणेश भक्तांसाठी टोल फ्री

विराट कोहलीचे विराट शतक 71 वे शतक



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area