गणेश भक्तांसाठी टोल नाका माफ|Ganesh bhaktasathi toll free| कोकणातील गणेशभक्तांना पथकर नाका माफ
गणेशोत्सव हा सर्व भारतीय लोकांचा महत्त्वाचा सण आहे .या सणाला अनेकांना वेगळाच आनंद असतो .लोकमान्य टिळकांच्या विचारातून साकारलेल्या गणेशोत्सवाला सगळ्या जणांचा सहभाग असलेला दिसून येत असतो . गणेशोत्सवानिमित्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात . म्हणून गावाकडे राहणारी लोक हे शहराकडे गणपती बघायला येतात तर शहराकडून लोक हे गावाकडे जातात हे सगळे उत्साहात चालूच असते .
मुंबई- पुणे शहरातून कोकणात जाणारी भरपूर लोक जातात त्यावेळी त्यांना वर्षभर वाट पहावी लागत असल्याने ,गणपतीचा सण हा दिवाळीच्या सणासारखा वाटत असतो .त्यामुळे गणपती सणाला एसटी बस ज्यादा सोडाव्या लागतात,कोकणातील अधिक लोक हे मुंबईत वास्तव्यास आहेत .नोकरीच्या निमित्ताने आपल्या गावातून शहराकडे आलेल्या लोकांना गावाकडे गणपती उत्सवाला जाण्याची प्रचंड ओढ असलेली दिसते .
असा हा सण वर्षातून एकदाच येत असल्याने ह्या सणाला कोकणात सर्व भागातून जाणारी भरपूर लोक असतात .काहीजण एसटी महामंडळ याने जातात तर काही रेल्वेने जातात काहींची स्वतःची वाहने असल्याने केव्हाही जाण्यासाठी तयार होत असतात, म्हणून अशा प्रवाशांना पथकर माफी( toll free ) करण्यात आली आहे .
याविषयी सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर Dowanload वर क्लीक करा.
ह्या pdf file ची प्रिंट काढून त्यावर स्वतःच्या पोलीस स्टेशन मधून सही शिक्का घ्या .
पथकर माफी माहिती ( टोल माफ ) Dowanload
👏गणपती बाप्पा मोरया 👋
👏 आपला प्रवास सुखाचा होवो👋
#आणखी माहिती वाचा