मी शाळा बोलतेय|mi shala bolatey|I am talking about school
मी शाळा बोलतेय!कसे आहात विद्यार्थी मित्रांनो.शाळा म्हणलं की शिक्षक, विद्यार्थी, वर्ग ,मैदान, झाडे, खेळाची साधने एवढेच सगळ्यांच्या लक्षात येते, परंतु शाळा म्हटलं की मलाही वाटते मला बोलावं. तुमच्याशी सहा वाजल्यापासून माझ्या अंगणात येत असतात .चालता,बोलता, खेळता उड्या मारता मला किती खूप बरं वाटतं. माझी झोप पूर्ण होईपर्यंत माळी आणि शिपाई हजर राहतात. साफसफाईचे काम करायला लागतात .जसा माणूस उठल्यानंतर आंघोळ पाहिजे असते तसेच मलाही रात्रभर धूळ ,कचरा याने माखलेले असते . अशा वेळेस मला स्वच्छ करण्यासाठी उठवायला येत असतात .
मी सुद्धा तुमच्याच स्वप्नात होते ,काल तुम्ही स्पर्धा होती म्हणून खूप दमला असणार म्हणून तोच विचार माझ्या मनात झोपताना आला आणि स्वप्नातही तुम्ही तसाच दिसत होता . स्वप्नात मी खूप खूप तुमच्यासोबत उड्या मारत होते ,खो- खेळताना तर मलाच असं वाटत होते की तुम्ही मोठमोठ्या हरणासारख्या उड्या मारुन गडी out करता त्यावेळी तुम्ही पडता त्यावेळी मलाच वाटते पडताना तुम्हाला सावरायला आले असते .तुम्ही जखमी होता तरीही मोठया आवेशाने जिंकून राहताच .मला तर खूप आनंद होत असतो मी सारखी तुमच्याच खेळाकडे लक्ष देऊन होते कोणाला काही लागू नये म्हणून मी सुद्धा काळजी घेत होतेच हे तुम्हाला कसे समजणार .
मी साखरझोपेत असतानाच मला जागे करुन माझ्या भोवती फेऱ्या मारुन हळूहळू झाडू हातात घेऊन शाळेतील मुख्याध्यापक येण्याच्या अगोदर मला स्वच्छ करायची जणू काही स्पर्धाच चाललेली असते .जशी आई मुलाला आंघोळ घालते तशीच माझी जणू आंघोळ घालत असतात तसतसा माझा चेहरा माखलेला होता तसा स्वच्छ दिसू लागला .
मुलेही हळूहळू यायला लागतात, मला तुम्हाला बघून खूप आनंद होतो, तुमच्याबरोबरच काही शिक्षक धावत पळत उशीर झाला म्हणून घड्याळाकडे ,मोबाईल हातात घेऊन इकडे तिकडे बघत बघत मला नमस्कार करुन आत शिरतात .ही सगळी गडबड मला सगळी दिसते . किती गडबड ,किती घाई आणि विद्यार्थी तर बिनधास्तपणे धावत पळत येतात.
काहीजण निवांत येतात आपला मित्र यावा म्हणून माझ्यासमोरच वाट बघत बसत असतात, पण तुम्ही आल्यानंतर तुमचा आवाज, तुमचा वर्ग ,तुमचा खेळ, शिक्षकांचे शिकवणे ओरडणं असेल या सगळ्या गोष्टी मला खूप आनंद देऊन जातात कारण माझ्या परिसरात राहून तुम्ही काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी, संस्काराच्या गोष्टी गोष्टी असतात आणि ह्या संस्काराच्या गोष्टी तुमच्या कानावर पडल्यामुळे तुम्ही एक आदर्श माणूस बनणार आहात ,उत्तम नागरिक बनणार आहात याची कल्पना माझ्या डोक्यात येत असते आणि म्हणून मी आनंदी होत असते .
माझ्या घरात लहान मोठे होत आहात संस्कार होता हात याचा मला खूप आनंद वाटत असतो , खेळताना मुलांना पाहून खूप आनंद वाटत असतो .मलाही फुटबॉल खेळावासा वाटतो तुमच्यासोबत गप्पा माराव्या असं वाटतं. पण खेळण्याकडे खूप लक्ष असते खेळ म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी चालतात. गेली किती वर्षे माझ्याकडे कोणाचे लक्ष नसते ,पावसामुळे, वाऱ्यामुळे, हवेमुळे, माझ्यावर परिणाम माझ्यावर झालेला आहे . माझ्यावरचा रंग निघून चालला आहे माझ्या अंगात पक्ष्याने खाल्ललेले बी पडलेले असते .पण माझ्याकडे कोणीही बघत नाही.त्यातून नवनवीन अंकुर माझ्या अंगावर उगवत आहेत.
मला वाटते विद्यार्थ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे, माझे कसे तुकडे तुकडे निघाले आहेत. मधूनच माझ्यावरती छोटे छोटे गवत आणि झाडेही उगवायला लागली आहेत, त्यामुळे माझे अंग दुखून येत आहे. हे मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण प्रशासन मात्र माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. चांगली इमारत बनवण्यासाठी मी तग धरून आहे. पण येत्या पाच- सहा वर्षात मला उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे. मी खूप तंदुरुस्त आहे , तरीही मला उध्वस्त करून बेचेराख करण्याचे स्वप्न बाळगतात .
मला खूप रडायला येते. मी एवढे वर्षे तुम्हाला संभाळले, सगळ्यांना सांभाळून घेतले आणि माझ्यामध्ये अजूनही चांगले दिवस असताना, भक्कमपणा असताना केवळ रंग उडाला म्हणून मला उद्ध्वस्त करायला चालले आहेत . हे मला सहन होत आहे अरे अजूनही माझ्यात भक्कमपणा आहे .
मला एका निर्मात्याने खूप चांगल्या पद्धतीने सिमेंट, वाळू ,विटा, दगड ,चुना, लाकूड यापासून भक्कमपणे उभा केला आहे. मी अजून डगमगत नाही मी अजून कित्येक वर्ष तुम्हाला साथ देणार आहे पण आज मात्र माझे आयुष्य बदलणार आहे .माझ्यावरचा रंग गेल्यामुळे मला पाडायचा विचार मला सहन झाले नाही .
मी उद्ध्वस्त होणार आहे मला या ठिकाणाहून हलवणार आहेत . मला तुम्ही मला दिसणार नाही . नवीन इमारत या ठिकाणी त्यावेळेस मात्र जीवन वेगळेच असेल. मी शरीराने आता जशी आहे तशी नसेल मी ही अनेक बहुतेक सुविधांनी सुसज्ज असेल पण तरीही मला याचा खेद वाटतो . तुमच्या सुविधासाठी जे करतात ते चांगलेच आहे, असे समजून मलाही आनंद वाटत आहे.
मला गरज आहे शाळेत संस्काराचे गीत ऐकायला मिळावे, राष्ट्र देशाचे भक्ती गीत ऐकायला मिळावे. या राष्ट्रगीत आहे वंदे मातरम आहे आणि तेही चांगल्या पद्धतीने पण आज काल असे याकडे अनेक जण दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
#आणखी वाचा
छोरी
उत्तर द्याहटवा